क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवा व्यापार नावाचं एक भारतीय व्हर्जन होतं मोनोपॉलीचं.. आणि मोनॉपोली खेळायला यायलाच हवं असं नाही!

खेळणार्‍यानं फासे टाकायाचे असतात आणि जितकं दान पडेल तेवढी घरं सोंगटी चालवायची असा शिंपल नियम. आता १४च्या संदर्भात - त्या घरात काय आहे ते नीट बघा. उत्तर सापडेल. दान किती पडलं यासाठी कॉल सोकोजी!

नंदिनी चित्तरपट पाहिला नसेल तर विकीवर त्याचा प्लॉट वाचा. चित्रातलं उजवीकडचं चित्र त्या चित्रपटातील एका महत्त्वाच्या गोष्टीकडे पॉईंट आऊट करतं. ती गोष्ट कोणती ते शोधा. ते सगळे मिळून कसला शोध घेतायत ते शोधा! Explore the unknown! I think this is more than enough! Wink

देवचार, मी विसाव्या लेव्हलबद्दल बोलतेय. तुम्ही जे सांगताय ती लेव्हल पार झाली.

हिम्सकूल - X कसा शोधलात? विपू करा. आणि X शोधला असेल तर मग Y लगेच म्हणजे लग्गेच्चच मिळायला हवा..
नंदिनी - ओह ती झाली होय? मग २०व्यात कुठला चित्रपट?! Wrong track I'm afraid.. Sad त्या चित्रातल्या झेंड्यांमध्ये उत्तर आहे. विकी शुड हेल्प यू अ लॉट! आणि आधी मामी किंवा निलिमा यांनी एक सॉलिड क्लू दिला आहे. Happy

आता ड्वायलाक मारायचा आमचा टैम : "कुणी मदत करता का मदत?! या द्येवचाराला कुणी लेव्हल २२ वर मदत कराल का?" Wink

..

मोनोपोलीची, तुम्हाला ती खेळायला लागेल.
बोर्ड गुगल इमएजेस मध्ये मिळेल.
ह्या लेव्हल ने माझा खुप वेळ खाल्ला
२१ वी चुकीची लेव्हल आहे कारण १५व्याची २ बरोबर उत्तरे आहेत.
मला क्लुलेस च्या ब्लॉग मध्ये कळले मग पुन्हा सोडवली १५ वी.

२४ व्याचा खेळ ओळखा सुमेनिष.
या खेळात कोण उडतात.

Pages