शुभेच्छा आणि शुभेच्छूक!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

ICHUK.jpg

बहुत काय लिहावे, म्हणावे? केवळ अगत्य असो द्यावे!! Lol


हे प्रचि मी काढलेले नाही, कोणी काढले आहे मला ठाऊक नाही, पण ज्याने कोणी काढले आहे त्याच्या विनोदबुद्धीला आणि सामाजिक व्यंग टिपण्याच्या कलेला दाद द्यावीशी वाटली.

विषय: 

Biggrin

खरं तर जिथे तिथे पोस्टरवर झळकणारे 'दादा','भाउ' यांच्यापेक्षा हा कित्येकपटींनी बरा म्हणायचा >>>>+१

भ्रमरला अनुमोदन!
खर म्हणजे हा फ्लेक्स लावणार्‍याच्या मनात देखिल तसाच उद्देश असावा! आयडीया भारी हे.
म्हणजे उद्या कोण ते दादापादान्चे फोटुच्या फ्लेक्स शेजारी एखाद्या कुम्भाराने आपल्या गाढवाचा फोटु लावुन त्याला शुभेच्छा दिल्यात तर किती भन्नाट दिसेल? नै? Proud [मी कुम्भारकाम देखिल उत्कृष्ट करु शकतो पण माझ्याकडे गाढव नैये शुभेच्छा द्यायला Sad Proud ]

विशेष म्हणजे ब्यानर पुण्यातील हडपसर मधील दिस्तोय.... म्हणजे आता पुणेरी पाट्यान्च्या जोडिला पुणेरी ब्यानर देखिल येणार वाट्टे!

इतके बॅनर पुण्यात आहेत की बास, एक एक बॅनर पाहून चिड येते. आणि ते शुभेच्छा देणारे अन घेणारे, त्यांचे चेहरे पाहिले की तळपायाची आग मस्तकाला जाते.

बरं आहे, मी तर म्हणतो असे २ एकशे बॅनर आपणच वर्गणी करून पुण्यात सगळ्या ठिकानी लावू. निदान त्यावरून तरी. .. पण शक्य नाही. नेते अन त्यांचे चमचे. सगळे साले गुंठा मंत्री! (गोळ्या घालायला पाहिजेत असे म्हणनार होतो, पण ते किरण्यके लगेच त्यावरून बाफ काढतील म्हणून नाही लिहित. फक्त मोठ्याने म्हणतो. Happy

अशक्य आहे.त्या मॅक्सीदादाला कपाळावर नाम पण काढला आहे, वास्तव मधल्या संजूबाबा सारखा!! खरंच दाद दिली पाहिजे बॅनर लावणार्‍याला.

हा हा हा.
किमान शब्दात कमाल अपमान म्हणावा की सौम्य शब्दात 'जागा दाखवून देणे' म्हणावे समजत नाहिये.;)
असे फलक लावल्याने श्वान जमातीने अब्रूनुकसानीचा खटला भरला तर?;)

Pages