एक मोठी वाटी भरून तांदळाचे पिठ
पाऊण मोठी वाटी गव्हाचे पिठ
१ मोठी वाटी गुळ
२ चमचे तिळ
२ चमचे गोड तेल
तळण्यासाठी तेल
तांदळाचे पिठ, गव्हाचे पिठ व तिळ एकत्र मिसळून घ्यावे. २ चमचे कच्चे
गोडेतेल (गरम न केलेले) वरून टाकावे. गुळ बारीक चिरून किंवा किसुन
घ्यावा. एका भांड्यात पाणी कोमट करावे. हे कोमट पाणी हळू हळू त्या
मिश्रणात टाकुन पिठ घट्ट मळून घ्यावे. मग लगेच त्या पिठाचे बोरांच्या
आकारा एवढे गोळे वळायचे.
कढईत तेल चांगले कडकडीत तापवायचे आणि मंद आचेवर
मधून मधून हलवत ही बोरे तळायची.
दिवाळी जवळ आली की बायकांची फराळ बनवण्याची लगबग चालू होते. ह्या वर्षी
काहीतरी नविन बनवू असा संकल्प सुरुवातीला आपण करतो. काही वेळा नेहमीचे
प्रकार करण्यातच सगळा वेळ निघुन जातो तर कधी कधी एखादा नविन प्रकार केला
जातो. पण हे नविन प्रकार करण्याच्या उत्साहात आपण जुने पदार्थ मात्र
कालबाह्य करतो. अश्याच जुन्या प्रकारातून मला माहीत असलेला एक प्रकार
म्हणजे बोरं.
बोरं हा जुना व हटके प्रकार मी पहिल्यांदा सासरी पाहीला. ह्या बोरांच्या
रेसिपीच्या आमच्या घरातील स्पेशालिस्ट आहेत माझ्या सासूबाई सौ. शालिनी
दत्तात्रेय म्हात्रे. सासूबाईंनी केलेली ही बोरं ज्या घरात आमची दिवाळी
जाईल तिथे जुना व हटके प्रकार म्हणून कौतूकाचे स्थान मिळवतात. मला
पाकशास्त्राची पहिल्या पासूनच आवड आहे. माझी आई सौ. शामला शशिकांत घरत
हिच्या हाताखाली मी सगळे
दिवाळीचे फराळ शिकले. लग्नानंतर दुसर्या वर्षापासून मी दिवाळीच्या
फराळांची जबाबदारी स्वीकारली. सासूबाईंनी सगळे प्रकार माझ्या आवडीनुसार
करण्यास परवानगी दिली पण बोर मात्र मिच करणार हे त्यांनी आवर्जुन
सांगितले. अजुनही ही बोरे त्याच करतात. आम्ही फक्त बोरे वळायला मदत करतो.
सासूबाईंच्या मते बोर ही कडकच चांगली लागतात. नरम बोरांना तेवढी चव लागत
नाही. अगदी सासूबाईंनी
केलेली ही बोरे चावत चावत खाताना ह्यांची गोडी अधीक वाढते. तर आता पाहूया
ही बोर कशी करतात.
गुळ कमी वाटल्यास थोड्या कोमट पाण्यात विरघळवून ते पिठात कालवावे.
गॅस मोठा ठेऊ नका त्यामुळे आतून न शिजता बोरे करपतील.
ही बोरांची रेसिपी मी चतुरंग ह्या पुरवणीसाठी दिली होती ती आज प्रकाशीत झाली आहे.
अरे वा जागु! अभिनंदन! हा
अरे वा जागु!
अभिनंदन!
हा प्रकार माहितच नव्हता.
जागू, अभिनंदन
जागू, अभिनंदन
वाह... फार छान.
वाह... फार छान.
जागुतै,अभिनंदन. माझ्या बायकोतर्फे सुद्धा अभिनंदन.
हे अग तु दिलेस होय. सा.बु
हे अग तु दिलेस होय. सा.बु सांगत होते संध्याकाळी की बोर म्हणुन १ पा.क्रू आली आहे. पण मी सांजोर्याच्या मागे होते दिवसभर त्या मुळे फक्त ऐकले त्यांनी सांगितले ते. मस्त. नी हो अभिनंदन.
किट्टू अगदी १०-१५ दिवस आरामात
किट्टू अगदी १०-१५ दिवस आरामात टिकतात जसे दिवाळीचे पदार्थ टिकतात तसेच.
पराग, सुहास, आरती, नलिनी, मैना, अश्विनी धन्यवाद.
अमि डांबोर्या नाही ग बनवत.
डॉ. कैलास व वहीनी दोघांनाही धन्यवाद.
सासू- सुनेचे अभिनंदन मी
सासू- सुनेचे अभिनंदन
मी पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार.. मस्तय
गुळ कधी घालायचा?
गुळ कधी घालायचा?
अभिनंदन जागु, आधी वाटलं होतं
अभिनंदन जागु,
आधी वाटलं होतं जागु फक्त मासे क्वीनच आहे
अभिनंदन जागू!
अभिनंदन जागू!
रश्मी पाण्याने मळण्या आधीच
रश्मी पाण्याने मळण्या आधीच गुळ घालायचा.
श्री
स्वाती धन्स.
करुन बघेन नक्कीच.. धन्स
करुन बघेन नक्कीच..
धन्स जागुतै
पहिल्यांदाच ऐकली / वाचली ही
पहिल्यांदाच ऐकली / वाचली ही रेसिपी. धन्यवाद जागू
जागू, अभिनंदन !!!! मी पण
जागू, अभिनंदन !!!!
मी पण पहिल्यादांच पाहिला हा प्रकार .
मि सुद्धा वाचली पण तुमची आहे
मि सुद्धा वाचली पण तुमची आहे हे लक्शात नाही आले. अभिनंदन. नक्की करणार. मला आवडतो हा प्रकार. एखाद्या सोप्प्या पदार्थाच्या शोधातच होते.
मस्त!
मस्त!
रश्मि, अगो, नुतन, श्रद्धा,
रश्मि, अगो, नुतन, श्रद्धा, अंजली धन्यवाद.
ही बोरं थोडी गोड भज्यांसारखी
ही बोरं थोडी गोड भज्यांसारखी लागतात. मला आवडली. लेकाने मात्र एक घास खाऊन उरलेले बोर परत ठेवून दिले
आज त्या बोरांचं 'आरतीमावाशी-मंचकिन्स' असं बारसं झालं आणि डंकिन डोनट्सचे मंच्किन्स जास्त छान लागतात असं सांगण्यात आलं 
सिंडे अग आजच्या पिढीला ह्या
सिंडे अग आजच्या पिढीला ह्या चवी नाही आवडणार. आता फास्टफुडचा जमाना आहे. मुलांना त्याच गोष्टींचे अप्रुप असते. हा प्रकार जुना आहे. आपण अशा पदार्थांच्या चवी घेतल्या आहेत. म्हणूनच तर तो तुला मला आवडतो पण आपल्या मुलांना नाही आवडत. पण सगळीच मुले सारखी नसतात म्हणा. काहींना हे जुने प्रकार म्हणण्यापेक्षा जुन्या चवी आवडतात.
अभिनंदन जागू, आणि तुझे आणि
अभिनंदन जागू, आणि तुझे आणि तुझ्या सासूबाईंचेही!......... मी पण पहिल्यांदाच बघितली ही पा कृ
जागूताई, मी करुन बघितला हा
जागूताई, मी करुन बघितला हा प्रकार. मला आवडला. घरीही गरम असताना सगळ्यानी खाल्ला. आता ते चांबट लागतायत. काही तरी चुकलंय बहूतेक. पिठ पातळ झालं थोडसं म्हणून मी गव्हाचं पिठ घातलं होतं वरुन.
अभिनंदन जागूतै.........
अभिनंदन जागूतै.........
मस्तच प्रकार..... करून बघते....
वाचले तीथेही आणि इथेही. जागू
वाचले तीथेही आणि इथेही.
जागू तू म्हणजे अगदी सव्यसाची आहेस.... व्हेजभी और नॉनव्हेजभी
Pages