कणकेच्या वड्या

Submitted by मनःस्विनी on 22 January, 2006 - 00:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटी कणीक
१ वाटी देशी घी,
साल काढलेले बदाम तुकडे,
काजु तुकडे,
वेलची,
१ tbs कच्च दूध
1/2 वाटी किसलेला गूळ

क्रमवार पाककृती: 

कणीक खंमग तूपात भाजुन घेवुन जराशी लालसर वाटली की त्यात दूधाचा हबका मारायचा किसलेला गूळ टाकुन परतून जरासा घेवुन काजु, बेदाणे, बदाम काप घालुन एका तूपाचा हात लावलेल्या थाळित थापाव्या आणि साधारण गार झाल्यावर वड्या कापाव्या

दुसरी एक पद्धत म्हणजे गूळ घालुन oven मधे 20 minute 300c ठेवुन नंतर वड्या पाडाव्या

अधिक टिपा: 

दूधाचा हबका मारल्याने खरपुस कणीकेला जाळी पडते कणीक चिकट लागत नाही. पौष्टीक पण आहेत तश्या मस्त लागतात

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

मनु, मी काल तुझ्या पद्धतीने वड्या केल्या होत्या. गूळाचे प्रमाण फक्त दुप्पट घेतले. छान झाल्यात.

आम्ही ह्याला गुळपापडी म्हणतो. अजुन १-२ पद्धती आहेत ह्या वड्या करण्याच्या. मी स्वयंपाकाचे धडे गुळपापडी आणि मुरमुर्‍याच्या चिक्कीने सुरु केलेत (आणि त्यापुढे फारशी प्रगति नाही ;))

मनु, तुझ्या रेसिपी मधेच माझी घुसडते आहे.

गुळपापडी: दोन वाट्या कणिक, अर्धी वाटी बदाम/आक्रोड/काजूचे काप, १ वाटी गुळ, ३/४ वाटी पाणी, अर्धी वाटी तूप- कणिक भाजायला, पाव वाटी तूप- पाक करायला. कणिक भरपूर तूप घालुन खरपूस भाजून घेणे. भाजतानाच त्यात ड्रायफ्रुट्स घालावेत म्हणजे ते पण भाजले जातात. थोडेसे नंतर वरुन थापायला बाजूला ठेवावे. मग पाणी गरम करायला ठेवुन त्यात गुळ घालावा. थोडा वितळत आला की तूप घालावे. दोन तारी पाक झाला की कणिक त्यात घालुन मग चिक्कीला करतो तसे भराभर तुपाचा हात लावलेल्या ताटात पसरुन वरुन उरलेले काप लावावे. गार झाले की वड्या काढाव्यात.

ह्या प्रमाणात एक ताट भरुन वड्या होतात. मॉडरेट गोड होतात, फार गोड होत नाहीत.

आई पाकात पाणी घालत नाही. पण तूपात केलेला पाक बिघडला तर फार कडक होतील ह्या भितीने मी पाणी जास्त घातले. तुम अपने जबाबदारी पे तेल/तूप कुछ भी डालो.

माझी आई वड्या करायची त्याची आठवण झाली. एकदम मस्त लागतात.
कणके प्रमाणेच कोंडा ही वापरतात काही वेळा. त्याही मस्तच लागतात.

........