पालक वड्या (फोटोसहित)

Submitted by दिनेश. on 17 October, 2011 - 05:42
palak wadya
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) एक जूडी मोठ्या पानांचा पालक किंवा वडीचे अळू
२) १ कप बेसन
३) आवडिप्रमाणे हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले लसूण वाटण, गूळ वा साखर
४) आंबटपणासाठी एक टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा दोन टेबलस्पून दही (अळू असेल तर कोळच )
५) एक टिस्पून तेल (वरुन फोडणी द्यायची असेल तर जास्त + फोडणीसाठी तीळ, मोहरी, हिरवी मिरची)
६) वरुन पसरण्यासाठी कोथिंबीर आणि ओले खोबरे

क्रमवार पाककृती: 

हा काही नवीन पदार्थ नाही. पुर्वी फॉईलवर पालकाची पाने पसरून त्यांचा अळुवडीप्रमाणे रोल केला होता. पण त्यापेक्षा हि कृति खुपच सोपी आहे.

१) पालकाची किंवा अळूची जी पाने घेतली असतील त्याचे शिरा वगळून मोठे मोठे तूकडे करून घ्या.
२) बेसनात दही वा कोळ आणि बाकी मसाले घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट भिजवा. (हे थोडे जास्त तिखट / आंबट असू द्या)
३) कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा.
४) त्यावर पालकांच्या पानाचा एक थर द्या
५) पण बाकिचे तूकडे बेसनात घोळवून वर पसरत जा आणि त्याचे थर करा.
६) वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता (जे काही उरेल त्यावर अवलंबून)
७) कूकरमधे शिटी न ठेवता २० मिनिटे वाफवा.
८) पूर्ण थंड झाले की आवडीप्रमाणे वड्या कापा.
९) पथ्यासाठी या नुसत्यास कोथिंबीर घालून खाता येतील, नाहीतर तेलाची तीळ, जिरे मिरची घालून फोडणी करून वर ओता, व खोबरे कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

तेल / तळणे वगळले तर हा पथ्याचा प्रकार होईल. उपहार म्हणून भरपेट होतो.

माहितीचा स्रोत: 
अळुवड्या वळायचा आळस आला म्हणून हा प्रयोग केला.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश,
यावेळेस करताना मी मधेपण एक कोरड्या पालकाच्या पानांचा थर दिला. त्यामुळे झाले काय, चाळणी उलटी केल्या बरोबर, मस्त २ गोल ताटात पडले. एकदम जास्त प्रमाणत करण्यासाठी हा उपाय आवडला मला. Happy

मस्त रेसिपी. वळकट्या उलगडण्याची गडबड होणार नसल्याने हमखास चांगल्या होतील.

मी यावरुन प्रेरित होउन, पालक + अळु + पुदिना + कोथिंबीर + जराशी मेथी असे सगळे एकत्रित केले, न चिरता Happy
त्यावर मसाले व बेसन टाकुन कणिक भिजवतो तसे करुन उंडे ठेवले कुकरला. झाल्यावर चकत्या केल्या. मस्त.

कित्ती ते सोपे झाले काम Happy नी उरलेल्या सगळ्या पालेभाज्या पण संपल्या. Proud

तुम्ही सांगितल्या पद्धतीने बरोबर तेवढ्याच वेळेत ह्या वड्या झाल्या. फक्त मी भाजी साठी पालक आधी बारीक चिरला होता त्यामुळे एकावर एक थर न देता मला कोथिंबिरीसारख्या कराव्या लागल्या.

IMG_8667.jpg

Pages