कोलंबीच सार

Submitted by कल्पु on 14 October, 2011 - 19:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप साफ केलेली कोलंबी
वाटण्याकरता:
१ १/२ कप टॉमेटोचे तुकडे
१/२ कप नारळ
२ लसणाच्या पाकळ्या (अमेरिकन साईझचा लसूण)
१/३ कप कापलेला कांदा
१ टेबस्पू धणे
४ लाल मिरच्या
१ टिस्पून काश्मिरी मिरची पावडर (रंगा करता)
फोडणीकरता:
१ १/२ टेबल्स्पून तेल, मोहरी, मेथी, हळद, हिंग, ४-५ कढिपत्त्याची पान
चविपुरत मीठ
२ कोकमं

क्रमवार पाककृती: 

वाटण्याकरता दिलेले सर्व जिन्नस थोडस पाणी घालून मिक्सरमधे गंध वाटून घ्या. तेल तापवून अनुक्रमे मेथी, मोहरी, हळद, हिंग फोडणीत घाला. वाटलेला मसाला फोडणीत टाकून १ मिनीट परतून घ्या. १ कप पाणी, चवीपुरत मीठ, कोकम, आणि कढीपत्ता टाकून साराला उकळी येउ द्यात. उकळत्या सारात कोलंबी सोडा. १० मिनिटानी गॅस बंद करा-सार तयार!

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना पुरत
अधिक टिपा: 

हे सार खूप पातळ नसत. तेव्हा पाणी बेतान घाला. मस्त लाल रंगाच सार गरम गरम भाताबरोबर छान लागत.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान आहे. आम्ही मिरची, मेथी वगैरे नाही वापरत. आमचा मिक्स मसाला असतो तो टाकतो.

हे सार खुप मस्त लागते.

श्रावणात आई असेच करायची फक्त कोलंबी भाग वगळून. आम्ही मनातल्या मनात कोलंबीचेच सार खातोय असे कल्पुन सार्-भात खायचो.