आज जाहिर समारंभात पुरस्कार स्विकारताना
तुझ्या चेहर्यावरचं समाधान आणि आनंदाने भरून वाहणारे तुझे डोळे पाहिले
टचकन डोळ्यात पाणी आलं,
राहून राहून एवढंच वाटलं.....
तू अशक्य आहेस...!
परकर पोलकं नेसलेली तू माझा हात धरून
दर संध्याकाळी चिंचेच्या झाडाखाली यायचीस
सगळ्या पोरांनी गलका केल्यावर,
हाती लागलेली एखादी चिंच अर्धी तोडून माझ्या हातावर ठेवायचीस
तुझ्या त्या दाताने तोडलेल्या अर्ध्या चिंचेकडे पाहून नेहमीच वाटायचं,
तू अशक्य आहेस...!
शाळेत मास्तरांची खाल्लेली छडी असो,
मैदानात खेळताना गुढग्याला झालेली जखम असो,
किंवा घरात आईचा खाल्लेला मार....
प्रत्येक वेळी आईच्या बरोबरीनं धावत तू हजर व्हायचीस,
माझ्या जखमेला मलमपट्टी करायला
आईच्या नजरेत मी कित्येकदा वाचलंय.... तिलाही वाटायचं,
तू अशक्य आहेस...!
गावभर उनाडक्या करत फिरताना, कॉलेजात टवाळक्या करताना
विविध स्पर्धा गाजवताना..... सावलीसारखी माझ्या बरोबर होतीस
आजुबाजुला चार मुली जमल्या की तुझ्या नाकाचा शेंडा पार लाल व्हायचा
तुझा तो लटका राग... ते वादविवाद, आणि जीवापाड केलेलं प्रेम पाहून नेहमी जाणवायचं,
तू अशक्य आहेस...!
माझी वाट न पहाता स्वतःच पुढाकार घेऊन व्यक्त केलेलं प्रेम,
माझा होकार मिळताच आनंदाने मारलेली ती मिठी
आईबाबांशी झालेल्या लुटूपुटूच्या लढाया
आणि मग आंतरपाटाच्या आड उभ्या असलेल्या तुला पाहताना
कानात घुमलेलं "शुभमंगल सावधान"
तेंव्हाच्या तुझ्या चेहर्यावरचा निस्सीम आनंद..... जग जिंकल्याचा तुझा आविर्भाव,
पुन्हा पुन्हा एकच जाणीव करून द्यायचा....
तू अशक्य आहेस...!
दोघांनी मिळून सजवलेलं काड्या काड्या आणून जमवलेलं घर
त्या घरात लागलेली चिमण्या पावलांची चाहूल....
अगदी शेवटच्या क्षणी माझं धावत्-पळत हॉस्पिटलमधे पोचणं...
जीवाची झालेली घालमेल.....
अचानक माझ्या हातात आलेलं आपलं चिमुकलं प्रेम......
अर्धवट ग्लानीत सुध्दा तुझं स्मितहास्य..... "तुझ्यासारखी आहे का रे?? "
हे अस्फुट शब्द...... अक्षरशः आनंदानं फुटलेलं रडू...... एकच मनात येतेय,
तू अशक्य आहेस...!
वेगळ्या वाटेवर मी सुरू केलेली वाटचाल.....
आधीचा विरोध मावळून तुझं खंबीरपणे माझ्याबरोबर उभं रहाणं...
सोसलेले उन्हाळे, भिजवून गेलेले पावसाळे.....
आणि अखेर आपल्या वाटणीचा तो वसंतातला बहर.....
आज सारं सारं आठवतेय मला..... कधीही न विसरता येणारं.....
आज जे काही मी कमावलय.... ते सारं तुझ्यामुळेच शक्य आहे....
पण तरीही पुन्हा पुन्हा सांगतो......
तू मात्र अशक्य आहेस...!!!!
भुंग्याची प्रेमकहाणी !!!
भुंग्याची प्रेमकहाणी !!!
(No subject)
व्वा! अगदी आतून उमलून आलीय
व्वा! अगदी आतून उमलून आलीय कविता.
सुंदर..प्रामाणिक!! पु.ले.शु
सुंदर..प्रामाणिक!!
पु.ले.शु
अ-प्र-ति-म
अ-प्र-ति-म
फार सुंदर..!!!
फार सुंदर..!!!
खरच भुंग्याची प्रेमकहाणी
खरच भुंग्याची प्रेमकहाणी
आवडली!
मिलिंद छान आहे मुक्तक.
मिलिंद छान आहे मुक्तक.
छान आहे रे हे
छान आहे रे हे
तूपण अशक्य आहेस रे..!
तूपण अशक्य आहेस रे..!
शब्द अपुरे.पडतात .. तुझ्या
शब्द अपुरे.पडतात .. तुझ्या कवितेला....... सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!
"अचानक माझ्या हातात आलेलं
"अचानक माझ्या हातात आलेलं आपलं चिमुकलं प्रेम......
अर्धवट ग्लानीत सुध्दा तुझं स्मितहास्य..... "तुझ्यासारखी आहे का रे?? "
हे अस्फुट शब्द...... अक्षरशः आनंदानं फुटलेलं रडू...... एकच मनात येतेय,
तू अशक्य आहेस...!"
..... छान
मस्त लिहिलयं..आवडल.
मस्त लिहिलयं..आवडल.
पैसे वाचवले भुंगेश
पैसे वाचवले भुंगेश >>>बरोब्बर.
घे 
बायका वाचतात त्यांचे नवरे असलं काही लिहित नाहीत, आणि ज्यांच्या बायका वाचत नाहीत तेच नवरे असलं काहीतरी लिहितात" >>>>>अच्छा म्हणजे फक्त इथे भाव खाण्यासाठी लिहिलिस तर.
अप्रतिम आहे,
अप्रतिम आहे,
असं "खरं" व्यक्त व्हायला,
असं "खरं" व्यक्त व्हायला, तिचं स्थान मान्य करायला, प्रत्येकालाच जमेल असं नाही, म्हणून तुझं विशेष अभिनंदन!
अनुमोदन खूप सुंदर आहे कविता!!
मस्त च कविता... खुपच छान.. (
मस्त च कविता... खुपच छान..:)
( पण खरच तुमची बायको वाचत नाही का एवढी सुंदर कविता ? :):) पटत नाही....
तरल लिहीली आहे कविता.....
तरल लिहीली आहे कविता..... सुंदर.... !
खूप खूप आवडली.
खूप खूप आवडली.
प्रत्येक वेळी आईच्या बरोबरीनं
प्रत्येक वेळी आईच्या बरोबरीनं धावत तू हजर व्हायचीस,
.... ते सारं तुझ्यामुळेच शक्य आहे....
- इतकी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करणारे कविमन वाचून पुढे आणखी काही लिहिणे शक्य आहे का!
फार सुरेख व्यक्त झाला आहेस
फार सुरेख व्यक्त झाला आहेस रे........ !!
आतपर्यंत पोचली
अतिशय सुन्दर ......अभावाने
अतिशय सुन्दर ......अभावाने असे वाचायला मिळते ...खर तर अभावानेच असे लिहीले जाते ...:) अप्रतिम आहे
भुंग्या, अरे मागच्या
भुंग्या, अरे मागच्या महिन्यात पाहिली होती ही कविता. पण एखादं विडंबन किंवा विनोदी काहीतरी असेल असं assume करुन सोडुन दिलं. मला वाटलं काहीतरी लाटणं, शॉपिंग, बायकी हट्ट यावरचे टिपीकल (नवरे स्पे.) जोक्स असलेली कविता असेल. चुकलंच माझं. पान उघडुन तरी पहायला हवं होतं. खुप सुंदर लिहिली आहेस. अत्तिशय आवडली. असं बायकोला मनापासुन सांगणारा नवरा विरळाच. पुरुष बहुतेक वेळा मनातच ठेवतात.
ऐक जरा, ती माबोवर वाचत नसेल तर प्रिंट काढुन तिला अचानक दिसेल अशी ठेवुन दे. तिला नक्कीच आवडेल. आपल्याला मनापासुन वाटत असेल ते त्या माणसाला कळवावं. छान वाटतं.
खूप छान कविता!
खूप छान कविता!
भुंग्या काढलीच रे मी हिला
भुंग्या काढलीच रे मी हिला वर


माझी मोस्ट फेवरेट
नविन आलेल्या लोकांसाठी आणि ज्यांनी दुर्दैवाने मिसलीये त्यांच्यासाठी
प्रिया खुप खुप धन्यवाद. भुंग
प्रिया खुप खुप धन्यवाद.
भुंग अप्रतिम लिहिलय. खुप भावपुर्ण. हळुवार. भिडली मनाला.
(वहिनींनी वाचली की नाही?
)
हो .. मझ्या वहिन्यांनी वाचली
हो .. मझ्या वहिन्यांनी वाचली ना
एकदम क्लास - आणि झाक तोडलस
एकदम क्लास - आणि झाक
तोडलस भूंग्या
आधी वाचली होती ही कविता.
आधी वाचली होती ही कविता. तेव्हा प्रतिसाद दिलाय की नाही आठवत नाहीये. म्हणून इथे लिहितेय "भुंग्या, तुझी बायको अशक्य आहे."
कवितेची मूळ प्रेरणा बायकोची असल्याने तिचं क्रेडीट तिलाच मिळायला नको का?
निंबे
निंबे
Pages