गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')

Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 October, 2011 - 05:30

'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!

तुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय?
उत्कृष्ठ स्थापत्यशास्त्राचा नमुना? माणसाच्या श्रद्धेचं मोहवून टाकणारं रूप? अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा? अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था? पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार? कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्‍या परंपरा-रीती-भाती? 'देऊळ' हा सर्वात मोठा विसावा असलेले, देवधर्म नित्यनेमाने आणि प्राणपणाने पाळणारे गावकरी?

खेळू या हा मस्त खेळ. 'देऊळ' या विषयाशी संबंधित तुमच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं, तुमच्या मनात कायमचं घर करून गेलेलं कुठचंही छायाचित्र इथे टाका.

स्पर्धेचे नियम -
१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.
२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.
३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.

स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!!!
पहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी
दुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.

Groups audience: 

IMG_0434.JPG

पंजाबात, आमच्या गावी लक्ष्मीपुजनाच्या दुसर्‍या दिवशी आमच्या घराण्याच्या मंदिरात झेंडा चढवून पूजा (जग म्हणतात तिथे) करतात.त्यावेळचा फोटो. मोठं देऊळ देवीचं आहे आणि छोटं नागांचं. मंदिरात भजनं होतात, देवीला नविन वस्त्र चढवतात, देवीची आणि नागांची पूजा होते, झेंडा चढवतात आणि मग गावजेवण असतं.

.

.

.

आधी नियम नीट वाचले नाहीत, त्यामुळे जास्त फोटो अपलोड केले होते ! Sad Proud
(आता ३च शिल्लक ठेवले आहेत)

प्रवेशिका ०१
"देऊळ" — उत्कृष्ठ स्थापत्यशास्त्राचा नमुना

प्रवेशिका ०२
"देऊळ" — माणसाच्या श्रद्धेचं मोहवून टाकणारं रूप

प्रवेशिका ०३
"देऊळ" — कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्‍या परंपरा-रीती-भाती

अगदीच न राहवून हा अधिकचा अजुन एक प्रचि टाकत आहे. Happy
"देऊळ" — पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार

प्रवेशिका - १
श्री नारायण मंदिर - आसोली , वेंगुर्ले.

प्रवेशिका - २ महादेव मंदिर, मुणगे, देवगड.
येथे देवाच्या मुर्ती ऐवजी श्रीफलाची पुजा केली जाते. मागील बाजूस पिढ्यान पिढ्या पुजलेले नारळ पाहता येतील.


प्रवेशिका - ३ श्रीदेव वेतोबा , आसोली , वेंगुर्ले.
ही मुर्ती एका माणसाच्या उंचीपे़क्षा जास्त आहे.

हे माझे काही:

आमच्या कुलस्वामिनीचे देऊळ

मंदिरातील मंडप

मानसमंदिर - आसनगाव

सिमलाच्या वाटेवरच एक मंदिर
DSCN1126.JPG

चामुंडेश्वरीचे मंदिर
DSCN0303.JPG

आमचं ग्रामदैवत "रवळनाथ"
DSCN0467.JPG

वा वा कसले एकसे के बढकर एक प्रचि आहेत. मस्त मस्त!!

पण फक्त प्रचि स्पर्धाच?? चित्रांची स्पर्धा नाही का? Happy

Pages