मावा कपकेक

Submitted by ज्ञाती on 11 October, 2011 - 22:17

साहित्य

खवा १०० ग्रॅम
साखर १ कप
मैदा १ +१/४ कप
अन्सॉल्टेड बटर १ स्टिक
बेकिंग पावडर अर्धा टेबलस्पून (साधारण दीड ग्रॅम)
वेलची पूड पाव टीस्पून
मीठ चिमूटभर
अंडी २

कृती
१. मैदा, बेकिंग पावडर, वेलची पूड, मीठ एकत्र करुन दोनतीनदा चाळून घ्या.
२. बटर पूर्णपणे वितळवून घ्या. बटर, साखर आणि खवा हॅडमिक्सरने एकत्र फेटून घ्या.
३. बटर, साखरेच्या मिश्रणात एकेक अंडी फोडून घाला. प्रत्येक अंडे घातल्यानंतर चांगले फेटून घ्या.
४. आता हळूहळू मैद्याचे मिश्रण अ‍ॅड करत फेटत जा.
५. कपकेकच्या पात्रात लाइनर टाकून प्रत्येकी एक-दीड टेबलस्पून मिश्रण भरुन घ्या. या प्रमाणार १६-१८ कपकेक (मफीन नव्हे) होतील.
५. ३५० डिग्री फॅ तापमानाला ओवनमध्ये २० मिनिटे बेक करा.

स्त्रोतः मंजूडीच्या मावाकेकची कृती, आंतरजालावरची खानाखजाना कृती. मी मुख्यतः प्रमाणात फेरफार केलेत. या कृतीने अगदी परफेक्ट केक झाले म्हणून इथे लिहीतेय. नक्की ट्राय करा.

फोटो लवकरच येत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ह्या रेसीपेन मावा केक केला. अप्रतिम झाला. स्पांजी वगैरे झाला(खालच्या चित्रात असल्याप्रमाणे). कयानी बेकरी सारखा.

फोटो टाकते जरा वेळाने,
http://sumarowjee.blogspot.com/2012/11/mawa-saffron-and-cardamom-cakes.html

कोणाला एक वेगळी रेसीपी ट्राय करायची असेल म्हणून हि लिंक देतेय. बस इतकेच. Happy
लिंक नेटवरूनच घेतली अर्थात.

मी ह्या वीकेण्डला मावा कपकेक्स केले ( तीन वर्षांनंतर परत). मी मागे लिंक दिली आहे तीच रेसिपी तंतोतंत फॉलो करून.

ह्यावेळी त्यावर हेवी व्हिपींग क्रीम वापरून फ्रॉस्टींग केलं. हेव्ही व्हिपींग क्रीम मध्ये पिठीसाखर घातली. रेग्युलर मिक्सर मध्ये साखर, केशराच्या काड्या आणि वेलची असं फिरवून पिठीसाखर केली. आणि हे सर्व व्हिप करून कपकेक्स् वर फ्रॉस्टींग केलं.

फोटो फार चांगले आले नाहीत. पण तरिही..

Mawa cake frosting 2.jpegMawa cake frosting1.jpeg

धन्यवाद Happy

मागच्या वेळेची आठवण काढलीस तर तो ही फोटो (द्यावासा वाटला कारण तेव्हा रेग्युलर बटरक्रीम फ्रॉस्टींग केलं होतं वेलचीच्या स्वादाचं).

Mawa butter cream 2013.jpeg

(ह्यातल्या केक्स चं बेकींग युनिफॉर्म झालेलं नाही हे चाणाक्ष डोळ्यांनां लगेच दिसेल. तर त्याचा दोष तेव्हाच्या अपार्टमेन्ट मध्ये असलेल्या अव्हन च्या माथी मारून टाकावा ;))

अच्छा! म्हणजे मोजक्याच बेकरांना ह्यावेळचे कपकेक्स् मिळाले तर. ओके Happy
I can vouch for the taste of the 3 year old batch.

सिलिकॉन मोल्ड कोणी गॅसवर केक करतो तसे वापरून बघितले आहेत का. सुरक्षित राहतील का मोल्ड, जळणार नाहीत ना. ओटीजी मध्ये सिलिकॉन जळत नाही, वापरून बघितले आहे पण ओटीजी सध्या दगा देतो आहे. बराच वेळ ठेवूनही नीट काहीच शिजत नाही.
उमा अमृते यांची रेसिपि आहे यू ट्यूबवर मावा केकची. त्यांनी अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा फेटून घेतला आहे. त्यांनी मार्गरिन वापरले आहे केक करायला. मार्गरिन हा काय प्रकार असतो.

धन्यवाद देवकी. पूर्वी बहुतेक मार्गरिन सर्रास वापरायचे केक करायला.
वैदेही केक खूप छान झाले असणार असे फोटोवरून वाटतेय. साचेही सुरेख आहेत.

Pages