मावा कपकेक

Submitted by ज्ञाती on 11 October, 2011 - 22:17

साहित्य

खवा १०० ग्रॅम
साखर १ कप
मैदा १ +१/४ कप
अन्सॉल्टेड बटर १ स्टिक
बेकिंग पावडर अर्धा टेबलस्पून (साधारण दीड ग्रॅम)
वेलची पूड पाव टीस्पून
मीठ चिमूटभर
अंडी २

कृती
१. मैदा, बेकिंग पावडर, वेलची पूड, मीठ एकत्र करुन दोनतीनदा चाळून घ्या.
२. बटर पूर्णपणे वितळवून घ्या. बटर, साखर आणि खवा हॅडमिक्सरने एकत्र फेटून घ्या.
३. बटर, साखरेच्या मिश्रणात एकेक अंडी फोडून घाला. प्रत्येक अंडे घातल्यानंतर चांगले फेटून घ्या.
४. आता हळूहळू मैद्याचे मिश्रण अ‍ॅड करत फेटत जा.
५. कपकेकच्या पात्रात लाइनर टाकून प्रत्येकी एक-दीड टेबलस्पून मिश्रण भरुन घ्या. या प्रमाणार १६-१८ कपकेक (मफीन नव्हे) होतील.
५. ३५० डिग्री फॅ तापमानाला ओवनमध्ये २० मिनिटे बेक करा.

स्त्रोतः मंजूडीच्या मावाकेकची कृती, आंतरजालावरची खानाखजाना कृती. मी मुख्यतः प्रमाणात फेरफार केलेत. या कृतीने अगदी परफेक्ट केक झाले म्हणून इथे लिहीतेय. नक्की ट्राय करा.

फोटो लवकरच येत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

माझे फोटो टाकते झब्बू म्हणुन जमलं आज तर. मी दोन आठवड्यापुर्वीच केलेला केक पण मी बेपा १ चमचा घातली होती. त्याच्या आधी केलेला तेव्हा १/२ च. घातली तर तितकासा फुलला नाही. बाकी अंडी/साखर तेच होतं. कदाचित चमचा कोती मोठा/छोटा आणि भरुन घ्यायचं की सपाट ह्या गोंधळामुळे असेल तसं.

अनसॉल्टेड बटर एक स्टीक म्हणजे किती?

मी त्यातल्याच दोन साच्यांमधे डेरिमिल्क चॉकलेट एकात तशाच वड्या नी एकात किसून टाकलेलं. किसलेलं वाला कप केक लाव्हा केक सारखा झाला बराचसा. Happy वड्या तशाच टाकलेल्या त्या वाल्या कपकेकच्या तळाशी जाऊन वड्या तशाच राहिल्या अर्धवट मेल्ट झालेल्या Proud

छान वाटतेय पाकृ.
कवडे डेरिमिल्क पेक्षा कुकींग चॉकलेट वापरायचे. स्वस्त पडते Happy

कृती मस्त. Happy पण एक स्टीक म्हण्जे किती ग्रॅम? अर्जंट सांगाल का कुणी? आज करायचा बेत आहे (रच्याकाने मैद्याऐवजी चाळलेली कणीक व अंड्यांऐवजी सोडा घेणार आहे, कोको टाकीन रंगाला. कसा होतोय बघुया Happy )
केक्स छान झाले आहेत कविता Happy

पण एक स्टीक म्हण्जे किती ग्रॅम? >> मलई बर्फीच्या धाग्यावरून लाजोची पोस्ट>>>> ८ oz दिसतय - @ 22७ ग्रॅम्स.
एकात ४ स्टिक्स असतात म्हणजे साधारण ५५-५७ ग्रॅम्स ची एक स्टिक... असं कॅल्क्युलेट कल तर??

मलई बर्फीच्या धाग्यावरून मंजूडीची पोस्ट>>>>> 1 बटर स्टिक = 8 टे. स्पू हे अगोने मागच्या कुठल्यातरी पानावर लिहिलंय.

ज्ञाती, फोटो हवाच्च बै. अंडी वापरून मी कधी करून पाहिला नाहीये, आता हे प्रमाण घेऊन करून बघेन.

कविता, सही फोटो!! हे साचे कसले आहेत ते सांग.

अनघा, बिनअंड्याच्या मावाकेकची ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड रेस्पी इथे आहे.

ज्ञाती, फोटो टाकच लवकर Happy रेसिपी मस्त. मावाकेक म्हटलं की मेरवान्सचे मावाकेकच आठवतात. ठाण्याला आजीच्या समोर मीनलमावशीकडून ( आता तिचे ठाण्यात दुकानही आहे केक्स, बिस्किटांचे ) गरमागरम मावाकेक आणून खायचो. ते खवा घातलेले नसायचे ( बहुतेक ). इतर ठिकाणी मिळणार्‍या मावाकेक्ससारखे असायचे पण ताजे,गरम केक्स खाण्याची मजा वेगळीच आणि तिच्याकडे केक घ्यायला गेलं की बेकिंगचा एक सुरेख दरवळ असायचा.

थॅक्स नलिनी, मंजू Happy कालच आमच्या पोर्णिमेचा वादि तिथीने झाला. केक बिक केला नाही आता तारखेने तर करीन म्हणते.
थॅक्स अगो. Happy अर्धा कप तूप किंवा लोणी घेइन मग. Happy

मंजुडे हे साचे अल्युमिनिअमचे आहेत. क्रॉफर्ड वरुन घेतलेत

मला कोणी मफिन्स आणि केक मधला फरक सांगेल का प्लीज. बाळबोध प्रश्न समजून टाटा नका करु Proud

कविता,
एक स्टिक म्हणजे साधारण ११० ग्रॅम बटर.

नेटवर ज्या रेसिपी पाहिल्या त्यात सर्वात बरीच बेकिंग पावडर होती. खाना खजानात ५ ग्रॅम घाला म्हणलेय. Uhoh

नलिनी, ३५० फॅरेनहाइटच गं. सॉरी गडबडीत लिहीले, वर दुरुस्त करतेय.

या प्रमाणाने अगदी छान फुलले केक. खायला आणि बघायलाही हलके.

मफीन म्हणजे (माझ्या समजुतीप्रमाणे) मोठे कपकेक.

कविता, साचे आणि कपकेक सुंदरच दिसताहेत.

दिनेशदा, आज परत करायचा बेत आहे. फोटो नक्की येणार.

वर आणखी एक बदल केलाय, बटर वितळवून घातले होते. मला वाटतं वितळलेले बटर, आणि जास्ती वेळ मिश्रण फेटल्याचा परिणाम म्हणुन कमी बेकिंग पावडर घालूनही केक फुगले.

विकीवर हे बघा http://en.wikipedia.org/wiki/Cupcakes आणि मफिनसाठी http://en.wikipedia.org/wiki/Muffin

मस्तं !!

वि ना अंड्याचे करता येतील का?
<<< नॉट शुअर अबाउट इट, पण माझी मैत्रीण स्प्राइट वापरायची केक साठी, नक्की आठवत नाही स्प्राइट कशा करता घालायची पण बहुदा एगलेस केक करताना एग्ज ऐवजी .

२ बटर पूर्णपणे वितळवून घ्या. बटर, साखर आणि खवा हॅडमिक्सरने एकत्र फेटून घ्या.

हे केले तर कपकेक होतात

या ऐवजी जास्त बटर , आणि कमी अन्डे टाकुन जाड मिश्रण केले आणि स्टेप २ न करता सर्व एकत्र केले तर मफिन होतात.
केक जास्त भुरभुरीत असतो म्हणुन फेटणे महत्वाचे आहे. केक मध्ये जास्त इतर गोष्टी घालु नयेत, चॉकलेट वगैरे वरुन घालावे, मफिन मध्ये काय सर्व कोम्बा.

मला मफिन पेक्षा जास्त केकच आवडतात त्यात मावा केक (हे विदाउट खवा होतच नाहित खव्यामुळेच त्यांना मावा केक म्हणतात)

ज्ञाति, रेसिपी बद्दल धन्यवाद! अतिशय सोपी कृती आहे. फक्त मिश्रण जरा घट्ट वाटले म्हणून २ टेबल स्पून दूध घातले. १२ कप केक्स झाले आहेत.

अगं मिनी, मी लिंक दिलीय बघ त्या रेसिपीत दिलंय मावा कसा करायचा ते .. अगदी सोपं पण जरा वेळखाऊ काम .. पण रिझल्ट्स भारी एकदम ..

बाकी केकची रेसिपी त्या ब्लॉगवरची आणि ज्ञातीची बरीचशी सारखी आहे पण ब्लॉगवरच्या रेसिपीत बटरचं प्रमाण व्यवस्थित दिलंय आणि दुधही घालायला सांगितलंय .. करून बघ .. अप्रतिम होतात मावा केक्स् .. Happy

Uhoh मी तुझी पोष्ट नीट वाचलीच नाही. फोटोच इतका कातिल आहे कि बाकी कुठे लक्षच गेलं नाही. करुन बघते एकदा. Happy

Pages