फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 October, 2011 - 04:02

हे बघा... अगदी परग्रहावरचं कुणीतरी दिसतंय ना? नाही हो, व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?

deooldis.jpg

'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रातली व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.

वर दिलेल्या छायाचित्रातला कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!

एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.

अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.

करा तर मग सुरूवात.

Groups audience: 

उत्तर कधी जाहीर करताय??

व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?>>> हा सर्वात मोठा क्लू आहे. Happy

मंडळी,

स्पर्धेत उत्साहानं सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार Happy

तर, वरच्या चित्रातली व्यक्ती डॉ. लागू नव्हेत. संजय मोने, गिरीश ओक आणि नारायण मूर्तीही नाहीत.

चित्रात आहेत दिलीप प्रभावळकर Happy

'देऊळ'च्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा http://www.maayboli.com/node/29762 इथं वाचता येतील.

बरोबर उत्तर दिलेल्यांपैकी (लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या) एका स्पर्धकाचं नाव १ नोव्हेंबर, २०११ रोजी जाहीर केलं जाईल.

आणि हा मूळ फोटो -

dp2.jpg

'देऊळ'मधल्या दृश्यात दिलीप प्रभावळकर आणि गिरीश कुलकर्णी

वर्षा_म हिने लिहिल्याप्रमाणे कोण काय काय गेस करतो हे इतरांना दिसलं नाही पाहिजे म्हणजे जेन्युइनली त्यांचं त्यांचं मत मिळू शकेल, नाहीतर आधी एखादं नाव दिसलं की पुढचा त्यानुसारच त्या फोटोकडे बघायला लागतो, किंवा गेस करू शकणार्‍या बर्‍याच नावांना काटछाट दिली जाऊ शकते. पूर्ण अनभिज्ञ राहून ओळखायचा प्रयत्न केला जात नाही.
हेमावैम Happy

मी चेहेर्‍यापेक्षा खांद्याची, बसण्याची ठेवण बघितली. दिलीप प्रभावळकरच असे थोडे खांदे झुकवून बसतात, उभे राहतात. आणि संजय मोने, मोहन जोशी, लागू ह्यापैकी कुणीच इतकं बारीक नाही Happy

.

Pages