पान

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

एक पान पिकून आता पिवळं पडू लागलं
झाडा पासून सुटून ते हळूच खाली पडलं
जन्मभर झाडाला दिली त्याने साथ
वेळ येताच झाडाने मात्र सोडला त्याचा हात
झिजू लागली होती त्याची आता काया
सोडली नाही तरी त्याने झाडावरची माया
काया त्याची झिजून आता होऊ लागली माती
'मातीत मिसळून उपयोगी पडेन' म्हणे झाडा साठी

सुधीर

प्रकार: 

अप्रतिम !!!!!!!
सुंदर विचार आहे.
अनेक अर्थ अहेत या मधे.
धन्यवाद...

सत्यजीत, अजीत

धंन्यवाद

सुधीर

-------------------------------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है

Pournima

अभारी आहे

सुधीर

------------------------------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है