रंगपंचमीच्या सनाला

Submitted by पाषाणभेद on 22 September, 2011 - 17:10

रंगपंचमीच्या सनाला

This Lavani is dedicated to my net-friend parag p divekar.

नका भिजवू शालू वेल बुट्टेदार नऊवारी
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||धृ||

नेम तुमचा कधी का चुकतो!
अंगाला बाई असा झोंबतो
पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१||

रंग हवेत* कितीक उडवीले *(हवे ते)
फुगे फोडीले हिरवे पिवळे
रंगात येवूनी का गुलाल फेकीला अंगावरी?
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||२||

लाज मला हो आली भारी
सर्व सख्यांनी केली मस्करी
उगीच तुम्ही जवळ येवूनी केली बळजोरी
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्व सख्यांनी मस्करी केली
हे
सर्व सख्यांनी केली मस्करी >>> असं केल तर छान वाटते.