हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - २

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

टेलिफोन मॅट

telephone mat.jpg

की होल्डर प्रकार १

key holder.jpg

की होल्डर प्रकार २

key holder_2.jpgkey holder_3.jpg

आरसा प्रकार १

arasa.jpg

आरसा प्रकार २

arasa_1.jpg

वरच्या रिंगला आरसा चिकटवायचा बाकी आहे.

आकाशकंदील

akashKandil_1.jpgakashKandil_4.jpgakashKandil_2.jpgakashKandil_3.jpg

नॅपकीन होल्डर

napkinHolder_1.jpgnapkinHolder_2.jpgnapkinHolder_3.jpgnapkinHolder_4.jpg

जार होल्डर

jar holder.jpg

पर्स, शबनम, परडी शिंकले, झूला: हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १

क्रमशः

विषय: 

धन्यवाद!

लिंबुटिंबू, मॅक्रम हा एक प्रकारचा धागा असतो. त्यापासून विणून असे बरेच प्रकार बनवता येतात.

स्वाती२ ने मॅक्रमच्या वस्तू - १ वर दिलेली लिंक इथे परत देतेय. http://en.wikipedia.org/wiki/Macram%C3%A9

धन्यवाद सर्वांना.
आणखी काही फोटो डकवलेत वर.

ओके नन्दिनी>> मी नलिनी. Happy फार महाग नाही पण १६०-२०० रू. प्रती कीलो ने मिळतो.
नक्की काय करून पहाणार हे सांगितलेत तर त्यासाठी लागणारे साहित्य. धाग्यांचे मापं, अंदाजे लागणारे मॅक्रम हे कळविन मी. हा प्रकार विणण्यासाठी ठराविक मापाचे धागे कापावे लागतात व ते आवश्यकतेनुसार काठीवर, रिंगवर किंवा त्याची नॉट बांधून सुरवात करतात.

़ खुपच मस्त. ते नॅपकीन होल्डर करायला किती वेळ लागला. काहीही माहीत नसताना ते करायला जमेल का? तुम्ही बेसिक पासुन डीटेल मध्ये त्याची कॄती सांगाल का?

धन्यवाद!

मला कधी शिकवशील ?>> आपण भेटू तेव्हा.

हा धागा भारतात कुठे मिळेल सान्गू शकाल का?>> बर्‍याच ठिकाणी मिळत असावा. मुंबईत भुलेश्वरला होलसेल दुकानं आहेत ह्याची. पुण्यात पण मिळतो. माझ्या गावी म्हणजे श्रीरामपुरला पण मिळतो. इथले दुकानदार गुजरात, मुंबईवरून मागवातात.
तुमच्या गावात काही दुकानांमध्ये चौकशी करून पहा, त्यांच्याकडे नसल्यास ते मागवून देवू शकतात का.

ते नॅपकीन होल्डर करायला किती वेळ लागला. >>> नॅपकीन होल्डर साधारण २०-३० मिनटात करून होते.
काहीही माहीत नसताना ते करायला जमेल का?>> त्याच्या बेसिक नॉट शिकल्या की आणि कापायच्या धाग्यांचा अंदाज आला की मग अगदी कोणताही प्रकार पाहून सहज करता येतो.

तुम्ही बेसिक पासुन डीटेल मध्ये त्याची कॄती सांगाल का?>> अगं तू म्हण. नक्की प्रयत्न करेन मी.

नलिनी , आमच्याकडे की -होल्डरची फर्माईश झालीये , म्हणे विचार " मावशी माझ्यासाठी करून देईल का ?" Happy

सर्वांना धन्यावाद!

आमच्याकडे की -होल्डरची फर्माईश झालीये>> नक्की देईन मी बनवून. कोणतं की होल्डर आवडलं तिला? तिचे आवडते रंग कळव. ह्या भारतवारीत नक्की बनवेन मी तिच्यासाठी. त्यापुर्वी जर मला इथे साहित्य मागवता आले तर जरा लवकर पाठवेन.

मला पण तो नॅपकीन होल्डर शिकायचाय. स्टेप बाय स्टेप सांग ना.>>> शिकवायचा नक्की प्रयत्न करेन.

पण जार होल्डर म्हणजे काय?>>> ह्यामध्ये आपल्याला हव्या त्या बरण्या, जसे की खाऊच्या, काजू, किसमिसच्या असे ठेवता येते. त्यात वापरायच्या बरण्यांच्याच आकारात पुढचा भाग विणला जातो.

मस्त !
आकाशकंदीलच लिही.. म्हणजे या दिवाळिला सगळ्यांना होइल. आपण करुन फोटॉ डकवु इथे. ते बाप्पांच्या नैवेद्याचे केले ना एकत्र तसे Happy

Pages