छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - वेद

Submitted by साक्षी on 11 September, 2011 - 06:27

पाल्याचे नावः वेद
वय: साडेतीन वर्षे
आवडते घर : अ‍ॅक्टिविटी म्हणून हे घर एकदा केले होते त्यामुळे काडेपेटीच्या काड्यांचं घर करूया का म्हणल्यावर वेद लगेच तयार झाला. पूर्वी लावली होती तशीच खरी झाडं चिकटवायची असं आधीच सांगून झालं
माझी मदत : घराचा आकार काढून दिला. काड्या मात्र सगळ्या त्यानेच चिकटवल्या. सगळ्या चिकटवेपर्यंत हात फेव्हिकॉलने माखला होता आणि चिकटवण्याचा पेशन्स संपला होता. मग झाडं चिकटवताना फेव्हिकॉल मी लावून दिला. आणि शेजारच्या पानावर वेद कसं लिहायचं ते दाखवलं.
ही तयारी
Picture 057.jpg

हे प्रत्यक्ष काम करताना
Picture 060.jpg

हे घर पूर्ण झालं. घराच्या एका खिडकीत वेद आणि एक खिडकीत माऊ बसली आहे. उजवीकडे वर वेदची कार आहे.
Picture 054.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काड्या त्यानेच चिकटवल्या?
शाब्बास वेद. किती छान चिकटवल्यात. Happy

हो रैना, सगळ्या काड्या त्यानेच चिकटवल्या. अर्थात मी मागून 'सरळ लायनीत चिकटव' म्हणून धोशा लावला होता. पण मग मात्र हात चिकट झाल्याने वैतागला होता. खिडकीतला वेद, माऊ, कार हे सगळं आधीच काढलं होतं म्हणून, नाहीतर नंतर कदाचित तेवढही काढलं गेलं नसतं.

सर्वांना धन्यवाद!
~साक्षी.