लांब केस कापवतानाचे अनुभव

Submitted by क्षिती on 8 September, 2011 - 12:29

नमस्कार,

माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट आहेत. पण आता लग्नानंतर व नोकरी मुळे अजिबात लक्ष द्य़ायला वेळ होत नाही. लक्ष देता येत नाही म्हणुन कधी कधी थोडी चिडचिड पण होते.

मी कधीच केस छोटे ठेवले नाहित. अगदी शाळे पासुन लांब सड़क केस आहेत. आता केस कापुन छोटे करण्याच्या विचारात आहे. नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन. मी माझे केस कापवुन एकदम बॊय कट किंवा बॉब कट करण्याचा विचार करते आहे (तेच सध्या मॆनेज करु शकेन अस वाटत आहे).

मी दोनदा पार्लर मधे जाऊन केस न कापवताच परत आले. हिम्मतच होत नाही, केस कापवायची. मला तुमचे पहिल्यांदा केस कापवतानाचे किंवा पहिल्यांदा लांब केस कापवतानाचे अनुभव सांगाल का सखी. थोडा धीर हवा आहे. निर्णय घ्यायला मदत करा प्लिज.

पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने, वाशीच्या रघुलिला मधले कपिल्स हे सलुन खुप छान आहे. तिथल्या बाब्याने मला प्रोटीन ट्रिटमेंट, रंग वगैरे खुप गळ्यात घालायचा प्रयत्न केला पण मी निक्षुन मला ह्यातले काहीही करायचे नाहीय, केस कापायला आलेय तेव्हा गुपचुप केस काप म्हणुन दटावल्यावर मात्र त्याने आनंदाने, मन लावुन अतिशय छान केस कापुन दिले. << same to same with me

मी गेल्या ऑक्टोबर मध्ये केस वाढवले होते पण ऑक्टोबर ची गर्मी आल्यावर सरळ टक्कल केले . ते मी स्वताच नंतर maintain केले . रेझर ने टक्कल गुळगुळीत करयला येक वेगळेच कौशल्य लागते आणि भलतीच मजा येते.
तीन महिने हे मी केले . उत्तम अनुभव.

पुण्यात चांगले केस कापून मिळणारे पार्लर कुठले आहे? हल्ली सगळ्याच पार्लरांमधे लेयर किंवा स्टेप कट च करून देतात. चेहर्‍याला सूट होईल असा कट करून देणारे एखादे पार्लर ठाऊक असल्यास कळवावे.

कबूतर सहमत
लेयर ला जास्त प्रेफरन्स असतो कारण तो 'अ‍ॅडव्हान्स' मध्ये मोडत असल्याने जास्त चार्ज करता येते.

मी मोठ्या सलोन्स चे जितके पाहिलेय (फेस बुक वरची त्यांची पोस्ट्स) त्यावरुन सध्या त्यांना केस वेगवेगळ्या प्रकारे कापणे हे एकदम 'ऊह, त्यात काय, गली गली का पर्लर ये कर सकता है' वाटत असून आपण हेअर स्मूथनिंग/रिबाऊंडिंग्+कलरिंग्/हायलाईटिंग किती ग्रेट केले आहे याच्या शो ऑफ मध्ये जास्त रस आहे.ते त्यांच्या क्षेत्रातले हडूप्/बिग डाटा असावे सध्या(प्लीज करेक्ट मी जर हे इंप्रेशन चुकीचे असेल.)

पुण्यात चांगले केस कापून मिळणारे पार्लर कुठले आहे? >>>>

गझेल (Gazelle) - कल्याणी नगर. ( विशु माझा फेवरिट, पण माधवी सुद्धा मस्त कट्स देते.) ढोले पाटील आणि भांडारकर रोड ब्रांचपेक्षा मी इथेच जाणं प्रिफर करते.

H2O ( Hair to Order) - कोरेगाव पार्क ( लुल्लानगर मधे पण आहे, पण KP मधले स्टायलिस्ट जास्त स्किल्ड वाटतात)

अख्ख्या जगात या दोन ठिकाणंशिवाय मी कोणालाही केसांना कधीच हात लावु देवु शकणार नाही.

Pages