लांब केस कापवतानाचे अनुभव

Submitted by क्षिती on 8 September, 2011 - 12:29

नमस्कार,

माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट आहेत. पण आता लग्नानंतर व नोकरी मुळे अजिबात लक्ष द्य़ायला वेळ होत नाही. लक्ष देता येत नाही म्हणुन कधी कधी थोडी चिडचिड पण होते.

मी कधीच केस छोटे ठेवले नाहित. अगदी शाळे पासुन लांब सड़क केस आहेत. आता केस कापुन छोटे करण्याच्या विचारात आहे. नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन. मी माझे केस कापवुन एकदम बॊय कट किंवा बॉब कट करण्याचा विचार करते आहे (तेच सध्या मॆनेज करु शकेन अस वाटत आहे).

मी दोनदा पार्लर मधे जाऊन केस न कापवताच परत आले. हिम्मतच होत नाही, केस कापवायची. मला तुमचे पहिल्यांदा केस कापवतानाचे किंवा पहिल्यांदा लांब केस कापवतानाचे अनुभव सांगाल का सखी. थोडा धीर हवा आहे. निर्णय घ्यायला मदत करा प्लिज.

पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅंक यु सगळ्याना तुमच्या प्रतिक्रियांसाठी. बहुतेक उद्याच जाऊन हे इतक मोठ काम हाता वेगळ करेन.

फक्त त्या वेळेस काय हालत होणार आहे माझी देव जाणे Happy Sad

एक काम करा.......केस कापण्यापुर्वी एक फोटो काढुन घ्या......आणि केस कापल्यानंतर चा फोटो काढा.......
आणि तो इथे बीबी वर टाका......आणि बघा प्रतिक्रिया तुमच्या घेतलेल्या निर्णया वर.. Happy

धन्स साधनातै Happy
नाही तेलकट नाही आहेत मि तेल लावते म्हणुन. माझे शाळेपासुनच लांब आहेत त्यावेळी दोन वेण्या बांधण्यासाठी मध्ये आई भांग पाडायची त्यामुळे तो पडतोच. हो मला पाठीमागे वेणी छान वाटते पण पुढे चेहरा काकुबाईसारखा वाटतो म्हणुन थोडा चेंज पण मला आयडीया नाही मला कोणता कट चांगला वाटेल. तुम्ही काही सुचवा ना? ( मि तुम्हाला भेटली तेव्हा मि काकुबाई वाटली का?)

शेवटच्या फोटोतल्या बाई कोण?? केस कापल्यावर कैच्याकैच बदल झालेत त्यांच्यात Wink

तिस-या फोटोतल्या बाईंनी पार्लरच्या दारातच बिफोर आणि आफ्टर केलेले दिसतेय.

हसरी, नाही गं, तु खुपच लहान आहेस काकुबाई दिसायला.
मला कट नाही सुचवता येणार. तेवढे ज्ञान मला नाही. तु एकदा पार्लरमध्ये जाऊन बघ. जावेद हबिबची पार्लर्स आता खुप ठिकाणी दिसतात. तिथे जाऊन विचार तुझ्या चेह-याला काय सुट होईल ते आणि मग तसे करायचे की नाही ते ठरव. (घरच्यांचा विरोध असतो सहसा केस कापायला)

क्षिती, पुण्यात आसलिस आणि जर अजूनी केसांना कात्री लावलेली नसशील तर कर्वेनगर च्या स्पेन्सर्स च्या चौकात प्रियांका ब्यूटी पार्लर आहे, तिथला मुलगा सुरेख केस कापतो, तो तुझ्या चेहर्‍याला काय सुट होईल ते ही नीट सांगेल. मुख्य म्हणजे २ मिन्टात केस कापतो.

हो आणि केसांची लांबी काहीही असूद्या अश्विनी हेअर ऑइल जरूर लावा. किंवा नुझेन हर्बल गोल्ड. Happy
केसांच्या सौंदर्यासाठी हे करा.

केस जिव्हाळ्याचा विषय.

लांब केस कापले की अतीव दु:ख होते. मला दु:ख झाले होते कमरेखालचे केस कापले मुलगी झाल्यावर. आणि मग ते मधली स्टेज सांभाळताना चिडचिड व्हायची. धड बुचडा ही नाही बांधता येत की मोकळे सोडता येत काम करताना. मानेवर रेंगाळत घाम येतो जिम मध्ये वगैरे.
का माहीत नाही माझा अनुभव ही असाच आहे, कापले केस की विरळ वाटतात...
वेणी खरेच बेस्ट.

अंमळ उशीराच दिलाय सल्ला.. आतावर क्षिती तुमचे केस वाढलेच असतील... (कापलेत का?)

नको ग नको कापुस केस
माझे आता जाम वाढता वाढेनात
Sad

माझे केस कंबरेच्या खालपर्यंत होते आणि मी ते कापुन डायरेक्ट कानापर्यंत केलेले
तेंव्हा जाम खुष होते
दिसत पण छान होते
पण आता पश्चाताप होतोय Sad
केस तर वाढत नाहीयेत आणि जाम पातळ झालेत Sad

माझी आई जाम रडली होती मी केस कापलेले पाहुन Happy

अरेरे ! मला पण असंच एक व्यक्ती डोळ्यांसमोर आली. कमरेच्याखाली केस वाढलेले...
आईच काय ..बायको पण रडली असेल

एकदा लांब असलेले केस कापले की परत अज्जिबात वाढत नाहीत तेवढे हे खूप जणींकडून ऐकलंय.
माझीही तीच गत आहे.
अवांतरः माझ्या चुलत बहिणीने बॉयकट केला तर नवरा काही म्हटला नाही पण तिचे सासरे किती दिवस बोलत नव्हते तिच्याशी Sad

सायो Lol

सायो, Biggrin

सायो Lol
माझे केसही कमरेच्या थोडे खाली होते. मी सप्टेँबर १२ ला १ फुट कमी केले. आता पर्यँत पाचेक इंच वाढलेत. खर तर केसांना असलेल्या वाढिमुळेच ही रिस्क घेतली. आधी १च फुट कमी करण्याचं कारणही हेच की नंतर वाईट वाटलं (वाटतय) तर वाढायला वेळ लागणार नाही

Pages