लांब केस कापवतानाचे अनुभव

Submitted by क्षिती on 8 September, 2011 - 12:29

नमस्कार,

माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट आहेत. पण आता लग्नानंतर व नोकरी मुळे अजिबात लक्ष द्य़ायला वेळ होत नाही. लक्ष देता येत नाही म्हणुन कधी कधी थोडी चिडचिड पण होते.

मी कधीच केस छोटे ठेवले नाहित. अगदी शाळे पासुन लांब सड़क केस आहेत. आता केस कापुन छोटे करण्याच्या विचारात आहे. नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन. मी माझे केस कापवुन एकदम बॊय कट किंवा बॉब कट करण्याचा विचार करते आहे (तेच सध्या मॆनेज करु शकेन अस वाटत आहे).

मी दोनदा पार्लर मधे जाऊन केस न कापवताच परत आले. हिम्मतच होत नाही, केस कापवायची. मला तुमचे पहिल्यांदा केस कापवतानाचे किंवा पहिल्यांदा लांब केस कापवतानाचे अनुभव सांगाल का सखी. थोडा धीर हवा आहे. निर्णय घ्यायला मदत करा प्लिज.

पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेजॉरिटी म्हणत्ये कापू नका! Happy मी पण म्हणतो की शक्यतो कापू नका, फार कमी जणीन्ना हे भाग्य असते. बाकी या ना त्या निमित्ते स्वत कापून घेतात, नी कापुन घेतलेल्यान्च्या आपल्या जमातीत अजुन भर पडावी म्हणून दुसर्‍यांसही भरीस घालतात. (बर्‍याचदा दुसरीच्या लाम्ब केसान्चा वाटलेला हेवा नि पक्षी मत्सरही अनुभवता येऊ शकेल)
(कुन्डलीनुसार, शनि प्रबळ असेल तर अत्यन्त कमी केस, वा अतिशयच मुलायम, जाडीने बारीक, विरळ केस बघायला मिळतात, मात्र मन्गळ वा राहू प्रबळ असतील तर कुरळे तसेच जाड/राठ केस बघायला मिळतात, शुक्र प्रबळ असेल तर लाम्ब केस बघायला मिळू शकतात. बुध/केतू प्रबळ असतील तर केसान्चा रन्ग बदलणे/लौकर पिकणे/गळू लागणे इत्यादी बघायला मिळते, चन्द्र प्रबळ असेल तर एक साधी भान्गाची रेषा कधी कायम जागी असत नाही, भान्ग्/वेणी सदा विस्कटलेली असते, चापुन चोपुन तेल चोपडावे तेव्हा कुठे केस शिस्तित रहातात, पण ते असो)
बाकी मला महिना टू महिना नियमित कापण्याइतपतही केस नैत हो Sad उगा आपली मान्डवाला लावलेल्या झालरीसारख कैतरी... Proud (तरी तो न्हावी माझ्याकडून सम्पुर्ण पैशे उकळतो, या वेळी तर चाळीस रुपये घेतलनी Sad )

क्षिती कापलेसच केस तर कुठे काप्लेस आणि कोणता कट केलास ते पण लिहि इकडे..

लिम्बु काका.. माझे मन्गळ वा राहू चान्गले प्रबळ असतील कदाचित.. Lol

मी दोनदा पार्लर मधे जाऊन केस न कापवताच परत आले >>> म्हणजे तुला मनातून कापायचे नाहीत ना, नाईलाजाने किंवा नवरोबांच्या आग्रहाखातर कापणार आहेस का?
वेळ काढ जमत असल्यास निगा ठेवायला Happy
पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना. >>> म्हंजे तुझा निर्णय झालाय. तर मग पुण्यातल्या मैत्रिणी पार्लर सांगतीलच. नंतर वाईट वाटून घेऊ नकोस पण... पक्की रहा, कुणी काहीही म्हटलं तरी. Happy
मला तर झोपेत जाग आली तरी पाठीखाली वेणी असायची जी सवय असते ना तर दचकायला व्हायचं.. मग पुन्हा वाढवले हळूहळू अन पूर्वीइतके दाट नाही, पण वाढले बिचारे अन आता चाळिशीत पांढरे अन पातळ झाल्याने खांद्यापर्यंत ठेवले.. या वेळी कापताना वाईट वाटले नाही.. आताही केस जोमाने वाढत आहेत पण मेंदीबिंदीसाठी छोटेच बरे. Happy
गेली की काय कापायला ? Uhoh

गेली की काय कापायला ? >> हो ना.. प्रश्न विचारल्या नंतर तिचा एकही प्रतिसाद नाही. कापुन यायची आणि मग बघायची हा धागा Proud

क्षिती, माझे दहावीपर्यंत केस छान कमरेपर्यंत लांब होते. नंतर येडाचा झटका आला म्हणून कापून टाकले. (ब्लंट कट) मग शिक्षण नोकरी करताना छोटे केसच बरे वाटायचे. मुंबईमधे लोकल्सनी फिरताना रोजच्यारोज केस धुणे मस्ट असायचे.आता घरी निवांत आहे म्हणून केस वाढवतेय.

मला वाटतं जेव्हा जी गरज आहे त्याप्रमाणे केस ठेवावेत. लांब केस मेंटेन करता येत नसेल तर जितक्या लांबीचे केस मेंटेन करता येते तितके ठेवावेत.

उवा वगैरे झाल्या किंवा दमट हवेत खरेच अवघड आहे लांब केस मेंटेन करणे. तथापि चेहर्‍यास केसांची महिरप असल्यास चांगले दिसते. मीतर आता वाढवायला सुरू केले आहे. उग्गीच रिकाम पणाचा उद्योग.

अरे काय हे? सल्ला मागितलाय ह्या बाईंनी आता कन्फुज झाली असेल बिचारी Proud

माझे ही केस २००० साला पर्यंत लांब, मऊ, सुळसुळित होते... असाच घरच्यांचा राग आला आणि टाकले कापून.. Sad आता पश्चातापाच्या अग्नित होरपळते खूप वेळेला आठवण झाली की.. Sad

कापु नका हो केस इतके सुंदर... खरंच कळकळिने सांगतेय. Sad

हायला काय टीआरपी वाढला आहे या धाग्याचा. अपेक्षा नव्हती. एवढंच नाही तर आजुबाजुच्या धाग्यांवर पुरुषांनी पण चर्चा करुन घेतल्या याबद्द्ल. Happy

फक्त क्षिती फिरकली नाही अजुन. मला तर उत्सुकता आहे कि ही शेवटी करते काय? मस्त वाचत गंमत बघत बसलेली दिसते. ये गं ये अशी बाहेर. एक पिंक टाकुन निघुन गेली, पण इथे चर्चा काय रंगल्यात बघ तरी एकदा. Happy

सॉरी सॉरी पुर्ण दिवस ऑफिस मध्ये होते ना म्हणुन हे सगळ वाचु नाही शकले. आता घरी आले आणि लगेच लॉगिन केले.

मला पण खुप खुप उत्सुक्ता होती कोण कोण काय काय सांगते ते वाचन्याची.

खुप खुप धन्यवाद इतक्या सगल्या प्रतिक्रियां साठी. थोडच वाचलय अजुन. जरा वेळाने परत लॉगिन करते आणि सगळ वाचुन काढते. Happy

बाप रे किती या प्रतिक्रिया. बहुदा फ़ारसा चर्चा न झालेला विषय होता Happy

मी आज घरी परत येताना विचार करत होते, जेव्हा मी दोनदा पार्लर मध्ये गेले होते तेव्हा तिथे बराच वेळ माझा नंबर येण्याची वाट बघत थांबले होते (शेवटी केस कापले नाही ते वेगलेच). त्या वेळेत मी तिथे बर्याच जणीना हेअरकट करुन घेताना पाहिले. एका मुलीने व तिच्या आईने दोघिनी आपले लांब केस कापुन एकदम शॉर्ट केले. पण यातल कोणिच मला माझ्या इतक टेन्सड वाटल नाही. बिंधास्त होत्या बहुतेक जणी. मग मलाच का अस होत आहे?? मला तर नुसत्या विचाराने पण पॉटात कितीतरी फुलपाखरे उडत असल्यासारखी वाटतात Sad

पण मग मला थोड जाणवल, एकदा शाळेत असताना मी खुप हट्ट केला होता केस कापण्याचा. आधी कोणी तयार नाही झाल, मग मला सरळ बाबा मेन्स सलुन मध्ये घेऊन गेले आणि माझे केस एकदम मुलांसारखे कापुन आणले. त्याचा मी इतका धसका घेतला कि मी परत कधी केस कापण्याचा हट्ट केलाच नाही. कॉलेज मध्ये गेल्यानंतरही मी आपले केस घरच्या घरिच थोडे ट्रिम करायची.

माझ्या आईचे केस पण खुप लांब व दाट होते. एकदा आत्या आली हॉती, ती आईला जबरदस्ती घेऊन गेली आणि तिचे केस कापुन आणले, कंबरे खाली हॉते ते एकदम खांद्यापर्यंत. आधी कॉणाला विश्वासच झाला नाही आईने केस कापवले ते. तस ते फारस कॉणाला आवडल ही नव्हत तेव्हा. नंतर आईच्या केसांची ईतकी वाट लागली कि आता एका वेणिचि पण मारामारी आहे, इतके पातल झालेत.

बहुतेक या सगल्याचा परिणाम म्हणुनच कि काय मला माझे केस कापायची इतकी भिती वाटते आहे. पण खर खर सांगु हे सगळ एवढ वेगळ वेगळ वाचुन माझा संभ्रम अजुनच वाढला आहे.

आता नक्की काय करेन माहित नाही, थोडा अजुन विचार करुनच निर्णय घेईन म्हणतेय. नंतर पश्चाताप नको.

पण हो सांगीन इथे सगळ्याना काय ठरवते ते आणि काय केल तेही, तो पर्यंत प्लिज तुमचे अनुभव व सल्ले कळवा. कदाचित मला नक्की काय ते ठरवायला मदत पण होइल.

**जरा जास्तच लिहिल्या गेल आहे इथे माझ्याकडुन जुन्या आठवणिंमुळे Happy

बहुदा फ़ारसा चर्चा न झालेला विषय होता<<<
छे छे ज्या विषयांवर परत परत बोलले जाते आणि तरी कोण्णालाही कंटाळा येत नाही अश्या अनेक विषयांपैकी हा एक आहे.. Wink

१०० % अनुमोदन नीधप ना.
क्षिती, नका हो कापू केस.
एकदा कापले की पूर्वीइतके होत नाहीत हा स्वानुभव.
केस लांब ठेवून लेअर्स्,फ्लिक्स असेही छान वाटेल.
चेह-यावर केस रुळल्याने जरा यंग लुक ही येतो.

पुण्यात एखाद चांगल पार्लर पण सुचवा ना.>> ...
सुचवा ना कोणीतरी प्लीज. मला हवे आहे नाव एखाद्या चांगल्या पार्लरचे...

फारच चर्चा झालीये इथे, म्हणून पहिले आणि शेवटचे पोस्ट टाकतोय. Happy
तुम्हाला वाटतंय तर कापा हो केस, शेवटी लाईफ मध्ये चेंज मॅटर करतो. आणि शॉर्ट केस पण चांगले दिसतात, थोडे दिवस विचित्र वाटेल एवढंच. Happy

(आमच्या बहिणीचे पण खूप लांब केस होते, ती पण कंटाळली होती त्यांची निगा राखून, एकदा म्हणाली करू का कमी, म्हटलं चल, तशीच गाडीवर टाकली आणि निम्मे केस कापून आणले, ब्युटी पार्लरवाली एकदम नको नको म्हणत होती, म्हटलं गप्प बैस आणि काप केस..)

शेवटी कापून पाहिल्याशिवाय तरी काय कळणार कसा दिसतो नवीन लुक! Happy असो.
काहीही निर्णय घेतलात तरी शुभेच्छा! Happy

क्षिती, कापू नकोस केस अजिबात... परत वाढत नाहीत पुर्वीसारखे....

माझे कमरेपर्यन्त लान्ब केस मी बरीच दिवस साम्भळलेत... एवढ्यात कमी केले तर खूप वाईट वाट्ले..... मला माझी आयडेटीटी हरवली अस वाटत राहीले...

मी भारतात असताना दोनदा गेले होते पार्लर मधे पण पार्लर् वालीने परत पाठ्वले होते ते अगदी आठ्वते... ईथल्या गोरीने मात्र कापले... काही न बोलता......:(

थोडासा चेन्ज कर फ्लिक्स कापून..पण मुळीच कापू नकोस.....

लांब केस असले की ते गुंतवळ घर भर सापड्त राहतात ते मला आजिबात आवड्त नाही. लांब केसवाले पाहुणे येउन गेले की एकदा व्हॅक्यूम करावे लागते घर.

केस कापण्यात इतके घाबरण्यासारखे काय आहे? मेबी काही डीपर अन रिझॉल्व्ड इश्यूज असतील ते आधी सोडवावे. आपण नखे कापतो कि नाही तसेच आहे हे. फिकर नॉट.

पण हो सांगीन इथे सगळ्याना काय ठरवते ते आणि काय केल तेही, तो पर्यंत प्लिज तुमचे अनुभव व सल्ले कळवा. कदाचित मला नक्की काय ते ठरवायला मदत पण होइल. >>>> ऑ, अग वर किती सल्ले, स्वानुभव आलेत. Lol जितके जास्त सल्ले मागशील तितके मिळतील, पण एक ठरव - ऐकावे जनाचे करावे मनाचे ओके Happy

अमामी, गुंतवळाबाबत असहमत. ज्यांचे केस लांब असतात, त्या तर ह्याबाबतीत अगदी दक्ष असतात. माझ्या पाहण्यातल्या तरी आहेत. आणि हा लांबीपेक्षा सवय आणि स्वच्छतेचा भाग आहे. जनरलाईज करू नये कृपया.

माझे केस लांब आहेत नेहमी वेणीच असते. मला थोडा लुक चेंज करायचा आहे. मि कधीच पार्लर मध्ये केस कापले नाहीत मि कधी जातही नाही पार्लर मध्ये. त्यामुळे मला कोणता कट करु किंवा माझ्या चेहर्‍याला तो सुट होईल का? हे ठरवता येत नाही. माझ्या ओळखीची पार्लरवाली नसल्यामुळे भिती वाटतेय तिला सांगायला. प्लिज मला कट सुचवा म्हणजे मला सांगता येइल.
लांब केस कापायचे नाहीत फक्त लुक चेंज करायचा आहे.

केस कापण्यात इतके घाबरण्यासारखे काय आहे? >> मामी मी आधी म्हटले तस, गेल्या कित्येक वर्षात, मी पार्लर मध्ये जास्त केस कापवले नाहीत. लग्ना आधी तर घरुन बंदिच होती. आता नवरा म्हणतो आहे म्हणुन विचार तरी करते आहे, आणि त्याचेच असे म्हणणे आहे, कापवणारच असशील तर एकदाच एकदम छोटे करुन घे, म्हणजे मॆनेज करणे पण सोपे होइल. बघु कस जमतय ते Happy

त्याचेच असे म्हणणे आहे, कापवणारच असशील तर एकदाच एकदम छोटे करुन घे, >>> तुझं काय म्हणण आहे ? Happy

बराच विचार केला, मला पण असे वाटते आहे, कापावेच एकदा. फक्त एकदम छोटे न करता, सध्या साधारण फुट भर कमी करावे अस म्हणतेय.

शाब्बास मुली Happy १/२ फुट कमी केलेस तर २ फायदे होतील. १. जास्त वाईट वाटणार नाही २. वाढ असेल तर १-२ वर्षात पूर्वीइतके होतील - तोवर लेकरू ही मोठे होईल/ सुटवंग होईल.

क्षिती, ग्रेट.. हळुहळू किल्ला सर कर Sad

अमा, लांब केसवाले माझ्यासारखे लोक केस विंचरताना काळजी घेतात. घर नंतर आपल्यालाच झाडायचे असते आणि जेवणात केस आला तर आपल्यालाच कसेतरी होते. त्यामुळे आपसुकच काळजी घेतली जाते.

हसरी, तुझे केस मस्त जाडजुड आहेत, पण मला ते थोडे तेलकट वाटले. काही जणांचे केस मुळात तेलकट असतात, केस धुतल्यादिवशी सुळसुळीत राहतात आणि दुस-या दिवशी तेल न लावताही तेलकट होतात. तुझे केस जर असे असतील तर कापुन चांगले दिसणार नाहीत. रोज रोज धुवावे लागतील.

फक्त लुक चेंज करायचा असेल वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे फक्त पुढचे थोडे केस हनुवटीपर्यंत कापुन घे. किंवा न कापता स्टाईल चेंज कर. जसे रोज मध्ये भांग पाडत असशील तर कधी साईडने घे, केस पिनप करुन मग वेणी घाल, केसांची पोनिटेल बांधुन मग त्यांची वेणी घाल. नेटवर शोधलेस तर सोप्पे सोप्पे अजुन कितीतरी प्रकार सापडतील. हल्ली थोडीशी सैलसर वेणी घालुन ती एका बाजुने पुढे रुळत ठेवायची फॅशन आलीय असेही पेज ३ वर वाचलेय. तसेही करुन बघ. Happy लांब केसांचे काय हवे ते करता येते.

(आणि तुला लांब वेणी अतिशय गोड दिसते गं..... Happy )

Pages