किलबिल - सावलीची बाहुली (सावली)

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:37


नाव - सावलीची बाहुली
वय - साडे चार वर्षे
पालक मायबोली आयडी - सावली

********************************************
एक खूप जुने चतुराचे जपानी बालगीत बाहुलीचे फार आवडते आहे. तिनेच मला ते शिकवले आणि बागेत चतुर दिसला कि थांबून त्याला ते ऐकवायचे असते. अर्थात एवढ्या मोठ्ठ्या आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केल्यावर चतुर बिचारा उडून दूर जातो. पण बाहुली गाणे संपवल्याशिवाय काही हलत नाही. मग एकदा सहज त्याच चालीवर मला तिच्यासाठी एक गणपतीचे गाणे सुचले. ते तिला शिकवले. आता मायबोलीच्या गणेशोत्सवासाठी हेच गाणे रेकोर्ड करून पाठवत आहे.

गणुल्याचे पोट आई,
का गं एवढे मोठ्ठे?
ताटभर मोदक एकटाच
खातो म्हणून का?
खाऽतो म्हऽणुन काऽ?

गणुल्याचे कान आई,
का गं सुपाएवढे?
जगातल्या सगळ्या गोष्टी
ऐकतो म्हणून का?
ऐऽकतो म्हऽणुन काऽ?

गणुल्याचा रंग आई,
का गं इतका लालेलाल?
जास्वंदाचे फुलं त्याचे
लाडके म्हणून का?
लाऽडके म्हऽणून काऽ?

- सावली
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाणं छान नि वेगळं आहे. छान म्हटले आहे भावले. मी ऑफिस उघडल्यावर रोज एक देवाचे गाणे लावते. आता ह्या मुलांची गाणी लावत आहे दोन दिवस. ती लास्ट ओळ परत म्हणायचा हेल अस्सल जपानी आहे. शाब्बासकी भावली व सावली धन्यवाद.

खाऽतो म्हऽणुन काऽ?, ऐऽकतो म्हऽणुन काऽ? आणि लाऽडके म्हऽणून काऽ? हे तर भारीच आहे एकदम Lol

गाणं मस्त रचलयस हं Happy

गोग्गोऽड गाऽणं किऽती... सावली, किती सुंदर गाणं म्हणलंय तुझ्या बाहुलीने! मस्त गं! Happy