Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:37
नाव - सावलीची बाहुली
वय - साडे चार वर्षे
पालक मायबोली आयडी - सावली
********************************************
एक खूप जुने चतुराचे जपानी बालगीत बाहुलीचे फार आवडते आहे. तिनेच मला ते शिकवले आणि बागेत चतुर दिसला कि थांबून त्याला ते ऐकवायचे असते. अर्थात एवढ्या मोठ्ठ्या आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केल्यावर चतुर बिचारा उडून दूर जातो. पण बाहुली गाणे संपवल्याशिवाय काही हलत नाही. मग एकदा सहज त्याच चालीवर मला तिच्यासाठी एक गणपतीचे गाणे सुचले. ते तिला शिकवले. आता मायबोलीच्या गणेशोत्सवासाठी हेच गाणे रेकोर्ड करून पाठवत आहे.
गणुल्याचे पोट आई,
का गं एवढे मोठ्ठे?
ताटभर मोदक एकटाच
खातो म्हणून का?
खाऽतो म्हऽणुन काऽ?
गणुल्याचे कान आई,
का गं सुपाएवढे?
जगातल्या सगळ्या गोष्टी
ऐकतो म्हणून का?
ऐऽकतो म्हऽणुन काऽ?
गणुल्याचा रंग आई,
का गं इतका लालेलाल?
जास्वंदाचे फुलं त्याचे
लाडके म्हणून का?
लाऽडके म्हऽणून काऽ?
- सावली
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
गाणं छान नि वेगळं आहे. छान
गाणं छान नि वेगळं आहे. छान म्हटले आहे भावले. मी ऑफिस उघडल्यावर रोज एक देवाचे गाणे लावते. आता ह्या मुलांची गाणी लावत आहे दोन दिवस. ती लास्ट ओळ परत म्हणायचा हेल अस्सल जपानी आहे. शाब्बासकी भावली व सावली धन्यवाद.
शाब्बास बाहुली. फारच गोड.
शाब्बास बाहुली. फारच गोड.
मस्त गाणे.
मस्त गाणे.
ऐऽकतो म्हऽणुन काऽ?>>>आकार
ऐऽकतो म्हऽणुन काऽ?>>>आकार दाखवत गायलिये अगदि
सावलीनी लिहिलेल गाणं पण झ्याक
कित्ती गोड गायलय. सावलीनी
कित्ती गोड गायलय.
सावलीनी लिहिलेल गाणं पण झ्याक>> अनुमोदन.
गोडुलीचा आवाज आई गोड गोड
गोडुलीचा आवाज आई गोड गोड का
गोड गोड गाण गाते गोडुली म्हणून का
गाण ,आवाज आवडला.
खाऽतो म्हऽणुन काऽ?, ऐऽकतो
खाऽतो म्हऽणुन काऽ?, ऐऽकतो म्हऽणुन काऽ? आणि लाऽडके म्हऽणून काऽ? हे तर भारीच आहे एकदम
गाणं मस्त रचलयस हं
सो स्वीट
सो स्वीट
फार गोड!
फार गोड!
किती गोड! मंजिरी +१
किती गोड!
मंजिरी +१
काssss मस्त आहे.
काssss
मस्त आहे.
गणूल्या कित्ती छान ग!शाब्बास
गणूल्या कित्ती छान ग!शाब्बास सावली
कसल गोड गायलय गाण, आणि रचलय
कसल गोड गायलय गाण, आणि रचलय पण मस्त.
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद
भारीच्चे हे गाणे
भारीच्चे हे गाणे
अय्या काय सुरेख गायलेय चारदा
अय्या काय सुरेख गायलेय चारदा ऐकलं अन अजून ऐकावसं वाटतय ए धन्स गं शेअर केल्याबद्दल
सावली आणि बाहुली, मस्त आहे
सावली आणि बाहुली, मस्त आहे गाणं! क्यूट एकदम.
कस्लं भाली गाणंही मस्त हां
कस्लं भाली
गाणंही मस्त हां साव्लीतै
चोsssss च्वीटssss शाब्बास
चोsssss च्वीटssss
शाब्बास बाहुली
गोड गायलय बाहुलीने. शाब्बास
गोड गायलय बाहुलीने. शाब्बास बाहुली
मस्त गायलीय ! शाब्बास सावली
मस्त गायलीय ! शाब्बास सावली ची बाहुली !
सुंदर गायलीय. ते मूळ गाणे पण
सुंदर गायलीय. ते मूळ गाणे पण अर्थासकट वाचायला मिळते तर...
गोडच एकदम! काऽऽऽ.... किती
गोडच एकदम!
काऽऽऽ.... किती गोड!
मस्त!
मस्त!
खूपच गोऽऽड! शाबास गं, सावलीची
खूपच गोऽऽड!
शाबास गं, सावलीची बाहुली!
सावली, तुझी बाहुली रॉक्स ग.
सावली, तुझी बाहुली रॉक्स ग. किती गोड म्हटलंय, तुला उग्गाचच कर्कश्य वाटतंय बरं का.
गोग्गोऽड गाऽणं किऽती...
गोग्गोऽड गाऽणं किऽती... सावली, किती सुंदर गाणं म्हणलंय तुझ्या बाहुलीने! मस्त गं!