सुश्राव्य संगीत - गिरीजासुता! - अगो

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:31


गिरीजासुता गौरिगणेशा
नमन तव चरणी हे प्रथमेशा ||धृ||

करुणा तुझ्या विलसते नयनी
खुलतसे हास्य मधुर गजवदनी
भवसागरी तारिसी विघ्नेशा ||१||

प्रभु मोरया मंगलमूर्ती
तव दर्शनाने जागत स्फूर्ती
मज ज्ञान दे, वरदा, गुणेशा ||२||

कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे !! मा.बो. वरती गाणी टाकता येतात हे मला ठाउकच नव्हते !! खूप छान !! एखादे गाणे बनवलेले असेल तर ते कसे पोस्टवायचे कुणी सांगेल का?

prashant_the_one,

तुम्ही तुमच्या गाण्याची ऑडिओ फाईल sanyojak@maayboli.com इथे इमेल करून पाठवू शकता. कवी/ कवयित्री, संगीतकार आणि गायक/ गायिका यांच्या नावाचा इमेलमधे उल्लेख असावा.

उत्तम काव्य, उत्तम चाल आणि सुरेल,भक्तीभावपूर्ण पेशकारी! खूपच छान वाटलं ऐकताना.
कोणताही वाद्यमेळ साथीला नसताना फक्त तानपु-यावर ''बैरागी''चे सूर स्वच्छ लावलेस अगो. सुरांवर अशीच भक्ती राहु दे म्हणजे ''सकल कलांचा तो अधिनायक'' तुझ्यावर कृपाछत्र नक्कीच धरेल!

व्वाव काय सुंदर गायलीस अगो !
क्रांति, देवकाका आणि अगो खुपच छान काम केलतं.
( इतरांसारखं शाब्बास अगो म्हणावसं वाटलं होत :P)

>> कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो >>

वा वाअ! कसलं भारी Happy मस्तच आवाज आहे.

सुरेख गीत... केवळ अप्रतिम चाल, प्रमोद काका...
अग्गो बाई. काय आवाज लागलाय... झगझगित सूर...
मजा आया

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!
माझ्या शब्दाला मान दिला म्हणून अगोचेही मनःपूर्वक आभार ! विपरीत परिस्थिती आणि हाताशी अतिशय कमी वेळ असतांना गाणं अतिशय उत्तम रितीने गायल्याबद्दल तिचं कौतुकही वाटतं.
मागणी करताच इतकं सुंदर गीत त्वरित लिहून दिल्याबद्दल क्रांतिचेही कौतुक वाटतं.
मायबोलीने संधी दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचेही मनःपूर्वक आभार!

केवळ अप्रतिम.. अगो, तू खूप छान गायलीयस गं.. अशीच गात रहा... प्रमोदजी क्रांतीजी, खूपच छान संगीत आणि काव्य. मी हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं.
इतकं सुंदर गाणं दिल्याबद्दल तुम्हा तिघांचेही खूप आभार.

ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात सहभागी व्हायची खूप इच्छा होती पण नवीन ठिकाणी होणारी सुरुवातीची धावपळ, घरात इंटरनेट कनेक्शन नाही आणि लॅपटॉपनेही असहकार पुकारलेला ह्यांतून हे शक्य होईल असं बिलकूल वाटत नव्हतं. देवकाकांनी इतकं सुरेख गाणं गायची संधी दिली आणि ह्या सगळ्या अडचणींत सांभाळून घेतलं त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद ! Happy
क्रांति ह्यांच्या कविता मला अतिशय आवडतात. त्यांनी रचलेलं गाणं गायला मिळालं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे Happy
मायबोलीकरांनी केलेलं कौतुक नेहेमीच उमेद वाढवतं. ह्या प्रोत्साहनाबद्दल सगळ्यांची फार फार आभारी आहे Happy
मायबोली प्रशासन आणि संयोजक ह्यांनाही खास धन्यवाद Happy

Pages