सुश्राव्य संगीत - गिरीजासुता! - अगो

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:31


गिरीजासुता गौरिगणेशा
नमन तव चरणी हे प्रथमेशा ||धृ||

करुणा तुझ्या विलसते नयनी
खुलतसे हास्य मधुर गजवदनी
भवसागरी तारिसी विघ्नेशा ||१||

प्रभु मोरया मंगलमूर्ती
तव दर्शनाने जागत स्फूर्ती
मज ज्ञान दे, वरदा, गुणेशा ||२||

कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो..... मस्तच गातेस तू !! हे गाणंही मस्त गायलंस !!
क्रांति आणि देवकाका......... तुस्सी तो छा गये Happy

सुरेख. सुरेख. चाल आणि अगो गातेय म्हणल्यावर प्रश्नच नाही.
अगो, तू गायला लागलीस की सगळे लख्खं सुलझे हुवे होऊन येते बघ. Happy

पौर्णिमा +१
जयश्री +१. देवकाका चाल रॉक्स. क्रांति- गुडवन.

देवकाका खासच जमलीय बंदिश! अगो, काय सुरेख गायिलं आहेस! मी तृप्त झाले!

"केव्हातरी सुरांशी जुळतील शब्द माझे" ही माझी कल्पना देवकाका आणि त्यांच्या गायक-वादक समुहानं यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात आणून मला खूपच मोठं केलं! मी कायम तुम्हां सर्वांच्या ऋणात राहीन!

अगो........छानच गातेस गो! वातावरण प्रसन्न झालं बघ!
आणि हो शब्द आणि चालही सुंदरच!

सुरेख!!!
गाणे, चाल आणि आवाज सर्वच सुंदर.
अगो तुझे सकल कलांचा मी नेहमी ऐकते. आता हे आणि रैनाचे त्यात अ‍ॅड करेन.

Pages