पत्र

Submitted by मंदार-जोशी on 5 September, 2011 - 00:31

तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
आज मात्र
नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय......
अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय

...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?
Kavita_Patra.jpg

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भारी!:)

जबरी...... छान कविता...
शब्दावाचुन कळ्ले सारे... शब्दांच्यापलीकडले सारखं.... Happy

अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय................
...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?
........ क्या बात है !!!!!
मस्त्......

Pages