पत्र

Submitted by मंदार-जोशी on 5 September, 2011 - 00:31

तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
आज मात्र
नेहमीपेक्षा वेगळंच घडलंय......
अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय

...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?
Kavita_Patra.jpg

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ब्येष्ट...जमलीच आहे रे...थोडक्यात पण मस्त लिहीली आहेस...
..आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?

खास
भावना पोचल्या

थोडक्यात आशय चांगला मांडलाय.
पण,
“अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय”
यातील पानभर लिहिणं आणि अक्षर न उमटणं
हा विरोधाभास नीटसा समजला नाही.
(माझ्या आकलनशक्तीचा दोष असेल कदाचित)

काका, म्हणजे पानभर मनातल्यामनात लिहिलं गेलं पत्र, म्हणून अक्षर प्रत्यक्षात उमटलं नाही.

देव काका, चित्र मी नाही काढलेलं. अगोदरच संग्रही असलेल्या चित्रात थोडे फेरफार करुन टाकलंय.

सहीच्च ! मस्त लिहिलं आहेस रे मंदार.

हे ....

<<<<अजून कागदावर
एकही अक्षर
उमटलं नाहीये हे......
पानभर लिहून झाल्यावर
लक्षात आलंय................ >>> आणि हे

<<<<...आणि तू हे न लिहीलेलं पत्र
पोहोचलं म्हणालीस?>>> जबरीच ! आवडली.

तुला पत्र लिहिताना
'काय' लिहावं
असा प्रश्न कधी पडला नाही
आणि 'किती' लिहावं
याचं भान कधी राहिलं नाही
<<< हे फारच भावलं Happy

मस्त रे मंदार. मनातून निघालेल्या भावना प्रियाच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र वगैरे सारख्या मानवनिर्मित घटकांची गरज नसतेच मुळी! आणि नेमकं हेच तू खूप सहज आणि सोप्या शब्दात कवितेत मांडलयस. आवडली!

मंद्या, हॅट्स ऑफ रे....
प्रचंड आवडली. शेवटचा पंच लै भारी ! पुलेशु Happy

अमित, विशाल आणि बागेश्री, विशेष धन्यवाद.
तुमच्या प्रतिसादांची नेहमीच प्रतीक्षा असते.

Pages