मोदकाची आमटी (फ़ोटोसहीत)

Submitted by दिनेश. on 28 August, 2011 - 13:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ आणि सध्या बाजारात उपलब्ध पदार्थ वापरुन केलेला प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

'मोदका'ची आमटी वाचून मी फार मोठ्या आशेने आली तर अरे देवा खरेच मोदक Proud
असो बघून तर तो पा सु . हा दाल ढोकली सारखा प्रकार दिसतोय.

प्रयोग????
मी लहान पणापासून हा प्रकार घरी खात आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत सुंदर लागतो. पोळी सुद्धा छान लागते. नॉन्व्हेज वाल्यांच्या मटण रश्श्याला खुन्नस म्हणुन बनवता येईल असा प्रकार आहे.

हेम, इथे नैवेद्य दाखवल्याशिवाय मी खाऊ शकत नाही ना !
इब्लिस, पारंपारीक सारण वेगळे असते ना ?

थोडे वेगळे असते. कोथिंबिर नाही, खसखस जरा जास्त. अन मस्त मसालेदार असते. नक्की काय काय ते 'हि'ला विचारून लिहावे लागेल

मस्त आवडीची आमटी. कालच बनविली होती पण सारण आणि आमटीचे साहित्य थोडे वेगळे होते.
सारणासाठी : सुके खोबरे किसलेले , दाण्याचा कूट , तीळाचा कूट ,खसखस , धणे पावडर , कोथिंबीर बारीक चिरलेली , हिंग , मीठ , काळा मसाला चवीपुरता
पारिसाठी : फक्त बेसन पीठ वापरले. हळद , हिंग , लाल तिखट व मीठ चवीनुसार
आमटीसाठी : २ कांदे , १/२ खोबरयाची वाटी , लसूण , आले , काळा मसाला , मीठ . (खोबरे गॅसवरच भाजले , कांदा चिरुन लसूण पा़कळया व आले सर्व कमी तेलात परतुन घेतले. नंतर सर्व मिश्रण मिक्सर मधुन बारिक करुन घेतले. भाजलेले खोबरे हि मिक्सर मध्ये बारिक केले. नंतर जिरे,मोहरी ,हिंग घालून तेलाची फोडणी केली. त्यात वरील वाटण टाकून चांगले परतले . नंतर काळा मसाला , मीठ , थोडा कच्चा हिंग व पाणि टाकून चांगली उकळी घेतली . ) बाकी सर्व वरीलप्रमाणे .( आमटी झणझणीत करण्यासाठी चिंच गूळ वापरले नाहि.)

वा छानच प्रकार आहे की हा. मला माहितही नव्हता (त्यात काय नवल!).

हे फुटत नाही ना?

मोदक जमत नसतील तर वांगी करा .. हे लै आवडलं. आमच्या घरच्यांना वांगीसदृश काहीतरी मिळणार म्हणजे. Proud

दिनेशदा ह्या रेसेपीसाठी थँक्यू!! मी नेहमी साबांच्या हातचीच खाते त्यामुळे नक्की कृती काय आहे हे माहितच नव्हते.अतिशय चविष्ट आणि झणझणीत लागते ही आमटी.पण आमच्याकडे सारण थोडे ओलसर असते.साबा बहुदा
कांदा घालतात.त्यांना विचारुन आमच्याकडचा मसाला लिहीन.
मामी,उकळत्या आमटीत मोदक सोडले तर फुटत नाहीत.

मस्तच!!! Happy

पहिल्या फोटोतलं सारण इतकं छान दिसतंय की मोदकाचा खटाटोप न करता मी ते नुसतंच खाईन. >>>>>अगदी अगदी Happy

मस्त रेसिपी !
माझ्या आजेसासूबाई या आमटीला 'उंबराची आमटी' म्हणतात. मोदकांऐवजी उंबराच्या आकारात सारण भरलेले असते. भाकरी- भात पोळी अशा कशासोबतही मस्त लागते आमटी..

दिनेश,
माझ्या मैत्रिणीने केली होती ही आमटी एकदा, टिव्हीवर दाखवली होती.
झाली पण सुंदर होती अगदी.. Happy
तुम्ही केलेली डिश तर नेहमीप्रमाणे अप्रतिम दिसतेय, आणि ते फायनली वाढलेलं ताट आहे ते माझ्यासाठीच आहे असं वाटलं Proud

आर्च तासाभरात होतं सगळं. पारंपारीक प्रकारापेक्षा बरच सोप्पं आहे हे.

मामी, नाही फुटत. आणि फुटले तरी हे सारण शिजून आतच राहते.

दक्षे, हो तूझ्यासाठीच आहे.

एकंदरीत वेळ घालवायला मस्त प्रकार आहे. आकार कुठलाही द्या, चव छानच लागते.

दिनेश सध्याचा व्यवसाय सोडा आणि भारतात येऊन एक रेस्टराँ सुरू करा आता.
मस्त पा़कृ पण माझ्या ताकदी बाहेरची. गृहखात्याला कळवावी लागेल. Happy

सहीच... ज ब री Happy
दाखवता क्षणीच इथून फर्माईश येणं झालं.

काळ्या मसाल्याला गरम मसाला पर्याय असू शकतो ना?

इथे मी तयार काळा मसाला विकत आणला होता, पण त्यात सुकं खोबरं घातलेलं असल्यानं फ्रिझमध्येही जास्त दिवस रहात नाही असा अनुभव आहे.

Pages