गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38


बोला, गणपती बाप्पा मोरया!

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!

उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__ आधी वंदू तुझ मोरया....

सुंदर उपक्रम...!!

बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे.. चरणी ठेवितो माथा..
मायबोली, जिवेत शरद: शतम Happy

सगळ्यांना गौरी गणपती साठी आमच्याकडे निमंत्रण.. पाषाण - पुणे

बोला गSSSSSणपती बाSSSSप्पsss ... मोSSSSSरयाSSSSSS....

श्रीगणेशाची सुबक मूर्ति, आकर्षक मखर
आणि त्याबरोबर गंभीर आवाजात म्हटलेलं
"वक्रतुंड महाकाय...." .... वातावरण निर्मितीला पोषक.

गणपती बाप्पा मोरया

प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धि,मति दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा, भक्तां बहू तोषवी ||

॥ गणपती बाप्पा मोरया.... मंगलमुर्ती मोरया॥
श्री गणेश क्रुपेने सर्वांच्या मनोकामना पुर्ण होवोत!

गजाननम् भूत गणाधि सेवितम्
कपित्थजंबूफलसार भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाशकारणम्
नमामि विघ्नेश्वर पाद्पंकजम् ||

सुंदर मूर्ती, मस्त आरास! प्रसन्न करणारं संगीत! अप्रतिम वातावरण निर्मिती!
गणपती बाप्पा मोरया! Happy

<< सुंदर मूर्ती, मस्त आरास! प्रसन्न करणारं संगीत! अप्रतिम वातावरण निर्मिती! >> १००% अनुमोदन !
संयोजक मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे .

मूषक वाह्न मोदक हस्त
चामर करूण विलंबित सूत्र |
वामनरुप महेश्वर पुत्र
विघ्नविनायक पाद नमस्ते ||

Pages