गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38


बोला, गणपती बाप्पा मोरया!

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!

उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना

सिंदुर वदना तुजला नमितो, तु अमुची प्रेरणा
सुखकर्ता तू दु:ख हरोनिया, तारी प्रभु सकळा
विघ्नविनाशक म्हणती तुजला, तू आमची प्रेरणा
वंदितो तुजला गजवदना........

सर्व सुखाचा तू प्रभुदाता, विद्येच्या देवा
जनजीवनी तुच शुभकरा, शुभदिन फुलवावा
कर्पुगौरा गणनायक तू , गाऊनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना........

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

सुरेख सजावट आणि प्रसन्न मंगलमूर्ती.

सुंदर मूर्ती आणि आरास !
गणपती बाप्पा मोरया !
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
दिनेशदा, मस्तच.

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ।।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।
अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ।।
मकार महामंडल । मस्तकाकारें ।।
हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।।
ये मी यां श्रीगुरुकृपे नमिले । आदिबीज ।।
आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी ।।
ते श्रीशारदा विश्वमोहिनी । नमिली मी यां ।।

गणपती बाप्पा, मोरया!

गणपती बाप्पा मोरया...

आरास आणि गणपती मस्त आहे...

मायबोलीला सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

मस्तच Happy

.

Pages