बैजिंग ऑलिंपिक्स.. संभाव्य विजेते... जिमनॅस्टिक्स.....

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

ट्रॅडिशनली ऑलिंपिक्समधे पुरुषांच्या व महिलांच्या जिमनॅस्टिक्स स्पर्धा या लोकप्रियतेमधे पहिल्या स्थानावर असतात. दर ऑलिंपिक्समधे वर्चस्व गाजवणारे रुमानियन व रशियन संघ या वर्षी त्यांची या स्पर्धेतील परंपरा टिकवतील की नाही याची शंका आहे.

यंदाच्या ऑलिंपिक्समधे अमेरिका व चायना यांच्यातच महिलांच्या सांघीक सुवर्णपदकासाठी अटितटीची लढत होइल. अमेरिकेकडे शॉन जॉन्सन व नेस्टिआ ल्युकिन हे दोन हुकुमाचे एक्के आहेत... (अमेरिकेच्या संघातल्या इतर मुली आहेत एलिशिआ सेक्रेमोन व चेल्सी मेमेल .)शॉन जॉन्सन ही सध्याची इंडिव्हिज्युअल ऑल राउंड वर्ल्ड चँपिअन आहे व बॅलंस बिमवर तिच्यासारखे रुटिन कोणाचेच नाही.... तर चायनाकडे चेंग फी व ली शान शान या दोघी आहेत. या चौघींपैकी कोणीही ऑल राउंड विजेतेपद मिळवु शकते... चेंग फी व्हॉल्टमधे सुवर्णपदक मिळवेल असे तज्ञांचे भाकीत आहे... व्हॉल्टमधे तिने एक अशी अवघड ऊडी शोधुन काढली आहे की त्या उडीला "चेंग फी उडी" असेच नाव दिले गेले आहे... व जगात फक्त तिच अशी एकमेव जिमनॅस्ट आहे की जी तशी उडी व्हॉल्टवरुन मारु शकते....

नेस्टिआ ल्युकीन ही अमेरिकेची असली तरी तिचे वडिल म्हणजे लेजेंडरी रशियन जिमनॅस्ट व्हॅलरी ल्युकिन ज्याने १९८८ च्या बार्सिलोना ऑलिंपिक्समधे रशियातर्फे अगणित पदके मिळवली होती!त्यामुळे उत्तम "जिन्स"असलेली नेस्टिआही सांघीक सुवर्णपदकासाठी हॉट फेव्हरेट आहे... रुमानियाची स्टेलिआना नेस्टर हिच्याकडे सुद्धा ऑल राउंड स्पर्धेत पदक मिळण्याच्या आशेने रुमानिया बघत आहे. झालच तर ब्राझिलची जेड बार्बोसा व इटलीची व्हेनेसा फरारी यांनाही पदकाची आशा आहे...

पुरुषांमधे परत एकदा चायनाचाच संघ बलाढ्य आहे... यांग वी हाच ऑल राउंड चँपिअन होइल... खासकरुन अमेरिकेच्या पॉल हॅमने(अथेन्सचा ऑल राउंड विजेता) काल या ऑलिंपिक्समधुन अंग काढुन घेतल्यावर यांग वी ला कोणी हरवेल असे वाटत नाही.. (खर म्हणजे अथेन्सलासुद्धा पहिल्या पाच्र राउंड्सनंतर तोच खुप पुढे होता पण अनपेक्षितपणे व दुर्भाग्याने... शेवटच्या ऍपेरेटसवरुन पडल्यामुळे त्याला सुवर्णपदक मुकावे लागले होते.....) जपानचा हिरोयुकी टोमिटो व जर्मनिचा फाबिअन हांबुचेन हे त्याच्या पाठोपाठ येतील असे दिसते.. या तिघांच्या व इतर चायनिज पुरुषांच्या(झि आओ क्विन,चेन यिबिंग,लि झिआओ पिंग) कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असेल..... फ्लोअर एक्सर्साइज वर ब्राझिलचा डिएगो हिपोलिटो चायनिज वर्चस्वाला आव्हान देइल तर पोलंडचा लिझॅक ब्लानिक व्हॉल्टमधे....पण पुरुषांमधे एकंदरीत स्पर्धा चायना,जपान व रशियापुरतीच मर्यादीत राहील.... पाहुया काय होते ते.. पण चायनाच्या यांग वीची कामगीरी बघायला विसरु नका.....

एकंदरीत जिमनॅस्टिक्समधे चायनाच्या यांग वी,चेंग फी व ली शान शान यांच्या कामगीरीवर तर अमेरिकेच्या शॉन जॉन्सन व नेस्टिआ ल्युकिनच्या कामगिरीवर लक्ष ठेवा....

पुढच्या पोस्टमधे आपण बास्केटबॉल्,सॉकर व हॉकी स्पर्धांचा आढावा घेउ.... झालच तर बॅडमिंटन व टेबल टेनिसमधल्या चायनाच्या वर्चस्वाबद्दलही उहापोह करु....(चायनाचा वर्ल्ड नंबर १ बॅडमिंटनपटु लिन डान व मलेशियाचा.... वर्ल्ड नंबर २ वर असलेला लि चॉन्ग वी.. यांच्यातला सामना बघायला मी फार उत्सुक आहे...) पण त्याआधी लिन डानला.... वर्ल्ड नंबर ३ चायनाच्याच... चेन जिन ला हरवायला लागेल व त्या आधी बहुतेक उप उपांत्य फेरित त्याला अथेन्स ऑलिंपिक्सचा विजेता... इंडोनेशियाचा.. तौफिक हिडायतला हरवावे लागेल... तर मलेशियाच्या लि चॉन्ग वी ला चायनाच्याच ऑल इंग्लंड चँपिअन बाओ चुन लाओ ला हरवावे लागेल..... (भारताच्या.. ७० च्या दशकातल्या.. ऑल इंग्लंड चँपिअन प्रकाश पडुकोनेची आज खुप आठवण होत आहे....)

क्रमंशः............

प्रकार: 

लीन डान जरी नं१ चा खेळाडू असला तरी मला स्वतःला तौफिकला जिंकायला बघायला आवडेल.. तौफिकसारखा बॅकहँड कुणाचाही नाही.. फक्त तो अनफोर्स्ड चूका भरपूर करतो.. लिन डान जास्त समतोल असतो मॅचच्या दरम्यान (जरी हातवारे आणि दंगा जास्त करत असला तरी)..
पूर्वी इंडोनेशीयाची डबल्स मध्ये एक जबरी जोडी होती चन्द्र विजया आणि बुधियार्तो (त्यांनी ऑलिंपीक जिंकले का नाही ते माहिती नाही पण वर्ल्ड चँपियनशिपमध्ये ते जबरी खेळायचे).. त्यांच्या मॅच बघायला जबर्‍या मजा यायची..
डेन्मार्कचा पीटर गेड देखील चांगला खेळायचा (अजुन खेळतो की नाही ते माहिती नाही)..

पॉल हॅमने स्पर्धेतुन माघार घेतल्यामुळे यु. एस. च्या टिम मधे आता भारतीय वंशाच्या राज भवसारची निवड झालीये. रींग्स आणि पॅरलल बार् मधे हा चमकू शकेल.

धन्यवाद मुकुन्द्जी.... आता या लोकान्वर लक्ष ठेवायला पहिजे....

यु. एस. च्या टिम मधे आता भारतीय वंशाच्या राज भवसारची निवड झालीये. रींग्स आणि पॅरलल बार् मधे हा चमकू शकेल. << रींग्स आणि पॅरलल बार् सारख्या अवघड प्रकरात भारतीय खेळाडू.... नक्कीच पहावा लागेल याला....

- येडचॅप

शंतनु.... तु माझ्या आणि एक आवडत्या खेळाविषयी .. बॅडमिंटन... अजुन लिहुन माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिलास... हो.. डेन्मार्कचा पिटर गेड अजुनही खेळतो व बैजिंगची तयारी जोरात करत आहे... काही जण असेही म्हणत आहेत की त्याच्यात व लिन डान मधे फायनल होइल... मला वाटते त्याने ९९ मधे ऑल इंग्लंड विजेतेपद मिळवले आहे.. आपल्या पुलेला गोपिचंदने २००१ मधे मिळवले होत बहुतेक...

पण तु डेन्मार्कच्या खेळाडुचा उल्लेख केलास व माझ्या ८० मधल्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या.... लेट ७० व ८० च्या दशकामधे बॅडमिंटन कोणि खर्‍या अर्थामे गाजवले असेल तर फक्त ६ खेळाडुंनी.... भारताचा प्रकाश पडुकोने,चायनाचे लुआन जिन, झाओ जिआन हुआ व हान जिआन, इंडोनिशियाचा लिम स्वि किंग व डेन्मार्कचा मार्टिन फ्रॉस्ट हॅन्सन.... यांनी.....त्या वेळचे बॅड्मिंटन जर कोणि फॉलो केले असेल तर त्यांनाच मी काय म्हणत आहे ते कळेल...७० च्या दशकात जेव्हा टेनीसमधे बोर्ग व कॉनर्स आपले नाव गाजवत होते तेव्हा बॅडमिंटन मधे जगात फक्त एकच नाव गाजत होते.. ते म्हणजे इंडोनेशियाचा न भुतो न भविष्यती असा बॅडमिंटन खेळाडु.... रुडि हार्टोनो.... ८ टाइम ऑल इंग्लंड विजेता(त्यावेळी वर्ल्ड चँपिअन्शिप होत नसे.. त्यामुळे ऑल इंग्लंड चँपिअन्शिपला वर्ल्ड चँपिअनशिपचा दर्जा होता..) पण लेट ७० मधे लिम स्वि किंग व बाकीचे वर उल्लेखलेले खेळाडु उदयास आले... व त्यांच्यातच नेहमी ऑल इंग्लंड फायनल्स व्हायच्या... इंडोनेशियाचा लिम स्वि किंग ७ वेळा ऑल इंग्लंड फायनलला आला व ४ वेळा जिंकला... ७८,७९,८० व ८१ मधे चार वर्षे लागोपाठ तो फायनलमधे आला होता.. ७८,७९ व ८१ मधे तो जिंकला पण ८० मधे आपल्या प्रकाश पडुकोने ने त्याला हरवले. तसेच डेन्मार्कचा मार्टिन फ्रॉस्ट हासुद्धा ७ वेळा ऑल इंग्लंड फायनलिस्ट होता व ४ वेळा तो विजेता होता..... त्या डॅनिश मार्टिन फ्रॉस्ट व इंडोनेशियन लिम स्वि किंगमधले अजरामर सामने ज्यांना कोणाला पाहायला मिळाले ते खरेच भाग्यवंत आहेत्(कदाचित यु ट्युबवर त्यांचे सामने बघायला मिळतिल...) तसेच त्याच्यात व चायनाच्या झाओ जिआन हुआ व भारताच्या प्रकाश पडुकोनेमधे झालेले सामनेही बघणार्‍यांना मेजवानी होती....

८० च्या दशकात मलेशियाचा मिसबुन सिडेक हाही एक नावाजलेला मस्त खेळाडु होता... इन्फॅक्ट... त्याने व रफिक सिडेक व जलानी सिडेकने(रफिक व जलानी हे भाउ होते व डबल्स मधे खेळायचे...) मलेशियाचे नाव खुप वरे आणले.. मिसबुन हा रफिक व जलानीचा भाउ होता के ते माहीत नाही....

बॅडमिंटनसारखा फास्ट गेम अजुन दुसरा कुठला नाही(मे बी.. टेबल टेनिस...) उच्च प्रतिचे बॅडमिंटन पाहणे हे खरेच डोळ्याला सुख देते... मला लहानपणापासुन या गेमचे जरा जास्त आकर्षण.. त्याचे कारण असे की... माझा बालमोहन शाळेतला जिगरी दोस्त... आमोद टिळक.. हा शाळेपासुनच खुप चांगला बॅडमिंटन खेळाडु होता व त्याने सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर लेव्हल वर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.... अर्थात तो ऑल इंग्लंड जिंकण्यापर्यंत कधी गेला नाही.. पण त्याच्यामुळे बर्‍याच मॅचेस पाहायला मिळाल्या हे मी माझे भाग्य समजतो.... आमोद आज तु कुठेही असलास तर त्याबद्दल तुला माझे शतशः धन्यवाद.... सातवीत असताना एकदा त्याने शाळेत २ रॅकेट्स आणल्या होत्या.. मला दाखवत तो म्हणाला.. एक योनेक्सची आहे व एक योनियामाची.... मला त्यावेळेला जगप्रसिद्ध बॅड्मिंटन रॅकेट कंपनींविषयी कसलीच माहीती नव्हती... मी त्याला विचारले .. मामाची रॅकेट कशाला आणलीस? तुझी रॅकेट कुठे आहे? तो बावचळुन म्हणाला म्हणजे? मी म्हटले तुच तर म्हणालास ना.. एक योगी मामाची आहे म्हणुन.... तो खो खो करुन हसतच सुटला... म्हणाला... अरे योगीमामा नाही.... योनीयामा... ती एक कंपनी आहे जी रॅकेट बनवते... मला खुप लाज वाटली होती तेव्हा.... साध्या रॅकेट कंपनीचे नावही मला माहीत नव्हते....असो.. पण आमोदने... सोहराब सिधवा... याबरोबर.... डबल्समधे.... ऑल ईंडिया लेव्हलवर.... बरीच विजेतेपदे मिळवली आहेत.....

तुमच्या जवळ माहीती चा खजीना आहे....... hats off...

बॅडमिंटन डबल्स जेव्हडे फास्ट खेळले जाते तेव्हडे क्वचितच आणखी कुठल्या खेळात फास्ट मोव्हमेंट्स होतात.. टेबल टेनिस आहेच पण त्यात लॅटरल मोव्हमेंट बरीच कमी असते..

चेंग फी बद्दल मस्त माहिती दिली मुकुंद तुम्ही.... बाकी व्हॉल्टमध्ये चायनाचे वर्चस्व म्हणजे जरा नवलाईची गोष्ट वाटते. कारण चायनीज जिम्नॅस्ट्स तुलनेने उंचीने कमी असतात, अंगभूत लवचिकतेचा त्यांना जसा फ्लोअर एक्सरसाइझ, किंवा बॅलन्सिंग बीमवर फायदा होतो तितका व्हॉल्टवर होत नाही. बॅलन्सिंग बीममध्ये आत्तापर्यंत तरी अमेरीकेचे वर्चस्व असायचे आणि बारवर रुमेनियाचे....
चेंग फी कडे लक्ष ठेवायलाच हवे..

शंतनु.. अरे तौफिक हिडायतला डेंग्यु फिव्हर झाला आहे असे ऐकले.... Sad

मंजु तुझे बरोबर आहे.. आणि एक... अग नुसते कौशल्य असुन उपयोग नसतो.. नेमके प्रेशर सिच्युएशनमधे आपल्यातल्या कौशल्याचे एक्झिक्युशन करता येणे हे ऑलिंपिक्स्मधे खुप महत्वाचे असते.... महिलांच्या अन इव्हन बार वर रुमानियाच्या फेमस नादिया कोमोनिचइतके कौशल्य व सहजपणा अजुनपर्यंत कोणिच दाखवला नाही... त्यातच १९७६ च्या माँट्रियाल ऑलिंपिक्समधे तिने पेर्फेक्ट १० गुण मिळवुन ऑलिंपिक्स इतिहास घडवला होता.... तसेच प्रेशर सिच्युएशनमधे एक्झ्युकेशनचे उत्तम उदाहरण म्हणजे.. १९८४ च्या लॉस एंजलिस ऑलिंपिक्समधे अमेरिकेच्या मेरी लु रेटनने आपल्या शेवटच्या प्रयत्नात व्हॉल्टवरची मारलेली पर्फेक्ट उडी व मिळवलेले सुवर्णपदक!

आज अमेरिकेच्या पुरुषांच्या जिमनॅस्टिक संघाने जर्मनी व साउथ कोरियाच्या जिमनॅस्टनी केलेल्या चुकांचा फायदा उठवत ताम्र पदक मिळवले.... अमेरिकेच्या संघात असलेल्या भारतिय वंशाच्या राज भावसारची कामगिरी(शेवटच्या पॉमेल हॉर्सचे रुटिन सोडले तर) खरच चांगली झाली.... हॅम बंधुंनी अंग काढुन घेतल्यावर अमेरिकेचा संघ दुबळा आहे व त्यांना पदक मिळणे अशक्य आहे असेच सगळे म्हणत होते.. पण फर्स्ट आल्टरनेट....राज भावसार व त्याच्या संघाने पदक मिळवुन सगळ्यांना चुक ठरवले... राज भावसार व टिम यु एस ए.... अभिनंदन!

यांग वे आणि त्याच्या टिममेट्स च्या जिमनॅस्टिक कौशल्याबद्दल काय बोलायचे? त्यांना सुवर्णपदक मिळाले ते योग्यच वाटले... खासकरुन चायनिज जिमनॅस्ट्चे रोमन रिंग्स्,हाय बार व पॅरेलल बारवरचे रुटिन्स बघताना... अक्षरशः तोंडातुन आह..उह... असे उद्गार बाहेर पडत होते.. सिंपली इन्क्रेडिबल स्किल्स!

उद्या मुलींची जिमनॅस्टिक फायनल आहे... प्रायमरी नंतर चायनाच्या मुली पहिल्या नंबरवर आहेत तर अमेरिकेच्या मुली दुसर्‍या नंबरवर्....पहिल्या फेरीत एक शॉन जॉन्सन सोडली तर अमेरिकेच्या बाकी तिघींनी बर्‍याच मोठमोठ्या चुका केल्या होत्या... उद्या जर सांघीक सुवर्णपदक मिळवायचे असेल तर अमेरिकन मुलींना त्यांचा खेळ बराच उंचवावा लागेल.... नाहीतर चायनाच्या १६ वर्षे वय सांगणार्‍या.... पण फक्त १०-१२ वर्षाच्या दिसणार्‍या चिमुरड्या मुली सुवर्णपदक घेउन जातील.....

डि डि स्पोर्ट्सने कृपा केली तर ह्या फायनल्स बघता येतील. Sad

पाहिल्या का फायनल्स?

त्या अमेरिकन Aliciaने खूप चुका केल्या न? बीम आणि floor दोन्हीवर पडली ती.

त्या चायनाच्या मुली खरच १२ वर्षांच्या दिसतात. अमेरिकेने असं म्हटलय पण ना?

फायनल्स पाहिल्या काल.
होय चायनाच्या मुली खरच फार लहान दिसतात. माझ्या मुलीला त्याच जिंकाव्या अस वाटत होत पण खुप उशिर झाल्याने शेवट पर्यंत पाहिल नाही. सकाळि कळल्यावर खुश झाली ती. Happy

मंजू... अग तुझ्याकडे हाय स्पिड इंटरनेट असेल तर एन बी सी ऑलिंपिक्स डॉट कॉम वर का नाही लाइव्ह प्रक्षेपण बघत?

कालच्या फायनल्स पाहिल्या... अमेरिकन एलिशिया ने दोन मोठ्या चुका केल्या हे मान्य पण तरीही चायनिज मुलींचा परफॉर्मन्स त्यांच्यापेक्षा ओव्हरॉल चांगला होता असे मला वाटते. अमेरिकन मुली दडपणाखाली रुटिन्स करत होत्या हे सगळ्यांनाच दिसत होते...

त्यावरुन मला त्या स्पर्धेबद्दल वाटलेले हे विचार....

चायनिज मुली या १२ वर्षाच्या पुढे नसतील हे..... ही स्पर्धा बघणारे कोणीही सांगु शकेल... पण चायनाने त्यांचे वय १६ आहे असे जगाला सांगुन आपण सगळे बघणारे मुर्ख आहोत असे गृहीत धरले आहे... वय कितीहि असो.. तो प्रश्न नाही.. प्रश्न मला वाटला की चायनिज मुलींना अनफेअर ऍड्व्व्हँटेज मिळाले... एक तर १२ वर्षाच्या मुलींवर १६ वर्षाच्या मुलींएवढे दडपण नसते(आंतराष्ट्रिय स्पर्धांचे दडपण काय असते ते या १२ -१३ वर्षाच्या मुलींना अजुन ठाउक नसते...)तसेच प्रत्यक्ष रुटिन्स करतानासुद्धा... हाइट कमी असल्यामुळे... सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचाही त्यांना फायदा मिळु शकतो... असो हा वादाचा मुद्दा होउ शकतो..

तसच दुसरी गोष्ट माझ्या निरीक्षणात अशी आली आहे की गेल्या २५ वर्षात या जिमनॅस्ट कडुन्(मुले व मुली) अधिकाधिक कठीण रुटिन्सची अपेक्षा केली जात आहे... काही काही रुटिन्स मला तर वाटते माकडांना सुद्धा जमणार नाहीत इतकी विचित्र व कठीण असतात.. मुलींमधे.. बॅलंस बिमवर.. अवघ्या ४ इंच रुंदीच्या बारवर... या मुलींकडुन जे अपेक्षिले जाते ते पाहुन खरच या मुलींची दया येते.. आता ऍलिशियाचेच उदाहरण घ्या... ज्या रितीने ती बॅलंस बिमवर माउंट व्हायचा पयत्न करत होती.. आणी ती पडली... ... तसे चार इंच बॅलंस बिमवरच सोडा.. पण फ्लोअर एक्सर्साइझवर सुद्दा... तशी उलटी कोलांटी उडी मारुन.. सरळ लँड होणे अवघड आहे... असो...

तिच गोष्ट आज आपल्याला पुरुषांच्या ऑल राउंड स्पर्धेत बघायला मिळाली.. रोमन रिंग व हाय बारवर ही लोक जसे उलट्या सुलट्या कोलांट्या उड्या घेतात.. ते खरच इनह्युमेन वाटत.... आणि मग आज आपल्याला जे रोमन रिंगवर जपानचा हिरोयुकी टोमिटा जसा अतिशय वाइट रितीने पडताना दिसला किंवा जर्मनीचा फाबिअन हांबुकेन हाय बारवरुन खतरनाक रित्या पडताना दिसला... तश्या गोष्टी दृष्टीस पडतात...

पण आज चायनाच्या यांग वे चे अभिनंदन केलेच पाहीजे... अतिशय शांत व धिरगंभिर चेहर्‍याचा हा जिमनॅस्ट... २००० ऑलिंपिक्समधे ऑल राउंड चँपिअनशिपमधे रजत पदक विजेता होता... व २००४ च्या अथेन्स ऑलिंपिक्सधे.. पहिल्या ५ राउंडमधे अप्रतिम कामगीरि करुन हा पहिल्या स्थानावर होता पण शेवटच्या हाय बारवरुन हा जेव्हा खाली पडला.. तेव्हा मलाच नाही तर जगातल्या सगळ्या ऑलिंपिक्सप्रेमींना खुप वाइट वाटले होते.. पण या यांग वे ने नेटाने आपले प्रयत्न चालुच ठेवले व २००६ व २००७ मधले विश्वविजेतेपद... बॅक टु बॅक जिंकुन.. ८० वर्षात असे कोणी केले नव्हते ते करुन दाखवले होते.. आता या ऑलिम्पिक्समधे(राइट्फुली) सुवर्णपदक मिळवुन त्याने आपल्या कारकिर्द्रिची यथोचित सांगता केली आहे... त्याच्या डॉमिनन्सची कल्पना तुम्हाला यावरुनही दिसुन येइल की त्याच्यात व रजत पदकाच्या जॅपनिज स्पर्धकामधे ३ पेक्षा जास्त गुणांचा फरक होता.. आणि मग २ ते १० नंबरच्या स्पर्धकांमधे फक्त ०.५ गुणांचा फरक होता... म्हणजे हि वॉज इन द लिग ऑफ हिज ओन!

आणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ऑलिंपिक्समधे ३ स्पर्धांना सर्व १.२ बिलिअन चायनिज लोक डोळ्यात तेल घालुन.. मोठ्या अपेक्षेने बघत असणार होते.. एक म्हणजे टेबल टेनिस स्पर्धा.. दुसरी म्हणजे २१ ऑगस्टची...११० मिटर्स हर्डल्स स्पर्धा.. ज्यात चायनाचा.. सिडनी ऑलिंपिक्समधला विजेता.. लु झिआंग.. धावणार आहे.. व तिसरी म्हणजे ही.. आजची पुरुषांची ऑल राउंड जिमनॅस्टिक स्पर्धा.. ज्यात त्यांचा लाडका.. यांग वे.. अपेक्षित विजेता होता... म्हणजे केवढे ते १.२ बिलिअन्स देशबांधवांच्या अपेक्षेचे दडपण!.. पण त्या अपेक्षेला जागुन व त्या प्रचंड दडपणाला न बळी पडुन व स्वतःच्याच गेल्या २ ऑलिंपिक्समधील अपयशाला विसरुन्...आज या यांग वे ने सुवर्णपदक मिळवुन दाखवलेच!

पण इथे मला एक गोष्ट जरुर नमुद करावीशी वाटते की... जपानचा हिरोयुकी टोमिटा व जर्मनिचा फाबिअन हांबुकेन.... अतिशय वाइट रित्या पडुन देखील... अनुक्रमे चौथे व सहावे आले... टोमिटोचे ताम्रपदक केवळ ०.१७५ गुणांनी हुकले तर हांबुकेनचे फक्त ०.२५० गुणांनी! हॅट्स ऑफ टु देम टु!

फेडरर परत हारला.. जेम्स ब्लेकने त्याला सरळ सेट्स मध्ये हारवले..

भूपथी आणि पेस हारले.. भारताचा आणि कुणी खेळाडु उरला आहे अजुन असे वाटत नाही..

कालची मुलींची फायनल मस्त झाली. अमेरिकेच्या नास्टिया ल्युकिनने डोकं शांत ठेवत चुका न करता सुवर्णपदक मिळवलं (गोल्ड मेडलिस्ट वडिलांची आणि world champion आईची मुलगी शोभली).

अमेरिकेचीच शॉन जॉन्सन(जी शेवटपर्यंत तिसर्‍या स्थानावर होती) शेवटच्या floor routine नंतर दुसरी आली. तिसरा क्रमांक चायनाने मिळवला.

मुकुंद तुम्ही म्हणता ते खरय. दिवसेंदिवस या सर्व खेळात (gymnastics काय swimming काय) अधिकाधिक चांगलं करून दाखवण्याच्या अपेक्षा वाढतच आहेत. इनह्युमेन वाटतं खरं.