आदरणिय अण्णा
हे अनावृत्त पत्र तुम्हाला लिहीत आहे. मायबोली हे संकेतस्थळ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असावं असा विश्वास आहे. तुमचे लॅपटॉपधारी सैनिक कुठे काय छापून आलेय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असावेत ही आशा आहे.
अण्णा, भ्रष्टाचार हवा कि नको असं एखाद्याला विचारलं तर त्याचं उत्तर काय येईल ? कुणालाच नकोय तो. तुमचं अभिनंदन याचसाठी करायला हवं कि सरकारला आज तुम्ही लोकपाल बिल मांडायला प्रवृत्त केलंत. जनता तुमची याबद्दल कायमच ऋणी असेल. गेल्या ६४ वर्षात हे बिल मांडलं गेलं नाही असं म्हटलं जात असलं तरीही ही सकल्पना गेल्या ६४ वर्षातली नाहीच. १९१८ साली एखाद दुस-या देशात ते होतं पण त्याचं स्वरूप वेगळं होतं. १९६४ च्ञा दरम्यान काही युरोपीय देशात ही संकल्पना मांडली गेली आणि ७० ते ७४ च्या दरम्यान लोकपाल काही देशात अवतीर्ण झाले. अर्थात तरीही भ्रष्टाचाराविरूद्ध जनमत असेल तरच लोकपाल प्रभावी आहे असा त्यांचा अनुभव सांगतो.
तुम्ही जे जनलोकपाल बिल जनतेसमोर ठेवलं आहे त्यामागचा उद्देश निश्चितच चांगला आहे. तुमच्या उद्देशाबद्दल कुणालाच शंका नाही. हे असं का व्हावं ? तर तुमची साधी राहणी, किमान गरजा आणि ज्या कारणासाठी तुम्ही उपोषणाला बसताय त्याबद्दल कुणालाच विरोध नसावा. एप्रिल महिन्यात लोकपाल बिलाचा मसुदा तयार करण्याबाबत आंदोलन झालं. तर आता ते लागू करण्याबाबत आंदोलन चालू आहे.
पण अण्णा, यादरम्यान ते बिल काय आहे याबद्दल आम्हाला कुणीच विश्वासात घेतलेलं नाही. सिव्हिल सोसायटी जनतेचं प्रतिनिधित्व करतेय असं तुम्हीच ठरवून टाकलं. अण्णा नि:स्वार्थी आहेत तेव्हां ते चुकीचं काही करणार नाहीत असा विश्वास जनतेने टाकावा असं गृहीतक त्यामागे होतें का ? केजरीवाल सांगतात आम्ही जन्तेकडे गेलो. जागोजागी त्याचं वाचन केलं... पण हे मलाच काय माझ्या मित्रपरिवारात, आजूबाजूला कुठेही दिसलेलं नाही. जर हे बिल सर्वांना माहीत आहे असा केजरीवालांचा विश्वास आहे तर जमलेल्या गर्दीला ते रोज जनलोकपाल बिल काय आहे याचा सारांश का समजावून सांगताहेत ? गर्दीला माहीत व्हावं म्हणूनच ना ? (ते जनतेला माहीत व्ह्यायच्या आधीच ते पास होण्याची मुदत देखील ठरलीय).
त्याचवेळी सरकारी बिल म्हणजे प्रमोशन टू करप्शन असं सांगायला ते विसरत नाहीत. हे म्हणजे एखाद्या बनियाने आमचाच माल कसा चांगला हे सांगण्यासारखं झालं. रामलीला मैदान म्हणजे दुकान नव्हे. लोकांना दोन्ही बिलं समजावून घेऊ द्यात, काल अतुल कुलकर्णीची मुलाखत पाहिली. त्याला विचारलं कि तू इतक्या दिवसांनी प्रतिक्रिया क देतोहेस ? तर त्याने सांगितलं कि मुळात हे लोकपाल, जनलोकपाल बिल काय आहे हेच मी समजून घेतोय. ते समजून घेतल्यानंतरच मला प्रतिक्रिया देता येईल. हा प्रश्न इतका ऐरणीवर का आणला जातोय हेच मला समजत नाही. मला वाटतं ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.
जर जनलोकपाल बिल हाच पर्याय सशक्त असेल तर जनमत त्याच बाजूला जाइल. पण झुंडशाहीचा वापर करून विधेयकाचं मार्केटिंग हा प्रकार गांधीजींना तरी सहन झाला असता का असा प्रश्न आज पडतोय. एकीकडे जनलोकपाल बिलाचा आग्रह धरताना त्यामागील लोकांना सरकार चालवायचं नाही. सरकार चालवताना कराव्या लागणा-या कसरतींशी आंदोलनाला घेणंदेणं नाही. जनता म्हटली कि सरकार हवेच. प्रत्येक जण मालक झाला तर कुणीच कुणाला भीक घालणार नाही ना ? अण्णा तुम्ही लोकांना कसलं शिक्षण देताय ? आपला व्याप सांभाळून कुणी प्रतिनिधी होत असेल तर त्याला नोकर म्हणायचं ? आधीच चांगली माणसं या उठाठेवींपासून दूर असतात मग त्यांची जागा दुस-या कुणी घेतली तर व्यवस्थेला दोष का म्हणून द्यावा ? या आंदोलनाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीबद्दल अविश्वास व्यक्त होतोय त्याबद्दल अनेक जण असमाधानी आहेत. शिवसेनेच्या आंदोलनाला झुंडशाही असं म्हणणारे अण्णा काल आठवले या निमित्ताने...!
केजरीवालांच वक्तव्य आम्हाला पाठ झालंय. आम्हाला सरकारचंही बिल वाचायचंय त्यानंतर ठरवू ना केजरीवाल बरोबर कि चूक ते. काही तरतुदी तर आम्हाला सरकारच्या योग्य वाटल्या. सरकार पंतप्रधानांना कार्यकाल संपल्यावर लोकपालाच्या कार्ककक्षेत आणू पाहत आहे तर त्यामागचा विचार लोकांना समजू दे ना ! पंतप्रधानांविरूद्ध लोकपालाची चौकशी सुरू असेल तर त्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. म्हणजेच राजीनाम्याच्या मागणीवरून संसद स्थगित होईल. तुम्ही तर कुणालाही आरोप करायचं स्वातंत्र्य दिलंय. त्याला आम आदमी म्हटलंय. अण्णा... भाई ठाकूर, अरूण गवळी, येडियुरप्पा, कलमाडी, अंबानी, नीरा राडीया, अमरसिंग इ. लोकही आम आदमीच आहेत. या तरतुदींचा वापर म्हणण्याऐवजी गैरवापर होणार नाही याची लेखी हमी तुम्ही द्याल का ? आणि तशी हमी दिलीत तरी एकदा गैरवापर झाला तर त्या हमीला काय अर्थ राहणार आहे ?
कालच अरूणा रॉय म्हणाल्या कि देशातल्या ज्या न्यायमूर्तींचं रेकॉर्ड चांगलं आहे त्यांनीही न्यायसंस्थेला स्वातंत्र्य हवंच याचा पुनरूच्चार केलाय. काही तत्त्वं त्यात भ्रष्ट आहेत म्हणून संपूर्ण व्यवस्थेच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावायची गरज नाही. नुकतंच सौमित्र सेन यांना जनतेच्या प्रतिनिधींनी अपात्र ठरवल्याचं राज्यसभा या वाहिनीवरून दिसलं. इतर वाहिन्यांना या घडामोदी दाखवायला सध्या वेळच नाही. सौमित्र सेन प्रकरणातून न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य जनतेच्या हातातच असल्याचा संदेश दिला गेलाय. आजवर संसदेने जाणीवपूर्वक या अधिकाराचा वापर केलेला नाही.
अण्णा, ज्या ज्या वेळी संसदेत कायदे बनतात त्या प्रत्येक वेळी संसदेत चर्चा होते. त्या चर्चांचा तुमचा अभ्यास असेलच. त्या चर्चा वाचल्या तर जाणवतं आपण जितके नालायक समजतो तितके नालायक हे प्रतिनिधी नाहीत. निवडणूक सुधारणा विधेयकाबाबत झालेल्या चर्चेचं उदाहरणच घ्या. त्या मंथनातून निवव्ळ गुन्हे नोंदवलेले असणे हे अपात्रतेचं लक्षण नव्हे हे ज्येष्ठ सदस्यांनी सप्रमाण दाखवून दिलं. त्यानंतरच गुन्हा शाबीत झाल्याशिवाय अपात्र म्हणता येणार नाही असं म्हटलं गेलं. नाहीतर कुणाविरूद्धही खडीभर एफआयआय नोंदवले गेले असते आणि मधू दंडवतेंसारखे निस्पृह लोकही अपात्र ठरले असते. अण्णा विधेयक आनताना साधकबाधक विचार आपली संसद करत असते.
माहिती विधेयकाचं श्रेय तुम्हालाच दिलं जाईल. पण अण्णा तुम्हीदेखील मान्य कराल , जो मसुदा तुम्ही दिला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं बिल सरकारने पास केलंय. अरूणा रॉय यांचं त्यातलं ९० %योगदान तुम्हीदेखील नाकारू शकणार नाही. महाराष्टृ आणि केंद्राविरूद्ध तुम्ही आजवर अकरा वेळा उपोषण केलं त्यातल्या सहा वेळा सरकारने तुम्ही सुचवलेले कायदे केले आहेत. इतर पाच वेळा मंत्री आणि अधिकारी बडतर्फ केले आहेत. या घटना तुमची सचोटी आणि सरकारने तुम्हाला दिलेला प्रतिसाद हे दोन्ही दर्शवते. या प्रत्येक वेळी तुमच्या जोडीला आजच्या सारख्या वाहीन्या नव्हत्या यातलं मर्म लक्षात घ्या. त्या प्रत्येक वेळी दोन्ही बाजूंनी लवचिक भूमिका घेतली गेल्यानं कोंडी झाली नाही.
हे सगळं पाहीलं तर आता सरकार चर्चेला तयार होत असताना, वृत्तपत्रात जाहिराती दिल्या जात असताना आणि स्टॅण्डिंग कमिटीसमोर सर्व पर्याय खुले असताना ठरलेल्या मुदतीतच बिल पास करा हा आग्रह योग्य आहे का ? आमचंच जनलोकपाल बिल योग्य आहे हा आग्रहही योग्य आहे का ? आज गर्दी पाहून सिव्हिल सोसायटीचे नेते जी भाषणं देताहेत त्यांना प्रक्षोभक असा शब्द वापरला तर ते चुकीचं होईल का ? पोलिसांच्या अटी मान्य करताना अशी भाषणं करणार नाही असं या नेत्यांनी मान्य केलं होतं ना ?
या प्रश्नांची उत्तरं तुमच्यावरच सोडतोय अण्णा. कारण सिव्हिल सोसायटी वगळता इतर कुणाला मत द्यायचा अधि़कार आहे किंवा नाही हेच समजेनासं झालंय. अनंत बाङाईतकर म्हणतात त्याप्रमाणे सिव्हिल सोसायटीवर दोन मेगॅसेसे पुरस्कार विजेते लोक हवेत हे त्या संघटनेच्या घटनेत लिहीलय हे खरं आहे का ? तसं असेल तर अभिनंदन करायला हवं. पण असे लोक नसते तर ? किंवा या लोकांची मुदत संपली आणि कुणालाचा हा पुरस्कार मिळाला नाही तर काय करायचं ? या सोसायटीची घटना लिहीणारे लोक देशाच्या राज्यघटनेबद्दल विचार करणार आहेत , चांगलं आहे... पण ही सोसायटी बनवताना लोकांचा सहभाग मागवला होता का ? भूषण पितापुत्रांना संधी देताना सोली सोराबजी आणि इतर घटना तज्ञ विचारात घ्यावेसे वाटले नाहीत का ? कि भूषण पिता पुत्र हेच एकमेव आहेत या देशात ? इथेच आपला शोध संपला का ? असो. अण्णा या क्षणी तरी हे प्रश्न विचारणं चुकीचं आहे. कारण काफिला चल चुका है.
जनतेला सरकारची भलावण नको आहे किंवा अराजकही नको आहे. जनतेला हवय एक सशक्त बिल (ज्याच्या आग्रहाबद्दल आधीच धन्यवाद दिलेत तुम्हाला). पण, तुम्ही जितकी आडमुठी भूमिका घेत जाल तितकी हळूहळू सरकारला सहानुभूती वाढत जाईल हे माझ्यासारख्या क्षुद्र नागरिकाने सांगायची गरज नाहीच. विशेषतः तुमच्या दबावाखालीच का होईना सरकार प्रस्ताव देऊ करत असताना अमूक एक रँकच्या लोकांशीच चर्चा होईल हे आजूबाजूचे लोक सांगाताहेत ते कशाच्या जोरावर ? अण्णा ते उड्या मारताहेत तुमच्या उपोषणाच्या जोरावर. बेदी, केजरीवाल, भूषण उपोषणाला बसले असते तर कुणी ढुंकूनही पाहीलं नसतं. मेधा पाटकरांना त्याचा दांडगा अनुभव आहेच. एक पाऊल मागे घेणं या आडमुठ्या नेत्यांना आवडेल का ? गर्दीला संबोधून केलेल्या सध्याच्या भडकाऊ भाषणांनतर ते शक्य होईल का ? त्यांना आवरा अण्णा !
अण्णा, तुम्ही योग्य वेळी आंदोलन स्वतःच्या हातात घ्याल आणि ही कोंडी फोडाल अशी आशा वाटते. तुमच्या तब्येतीची गर्दीलाच नाही तर प्रत्येक विवेकी नागरिकाला काळजी वाटते. ती सरकारला किंवा सिव्हील सोसायटीला आहे किंवा नाही हे कसं सांगणार ? पण वेळेवर लवचिकता दाखवणं हे शहाणपणाचं ठरणार आहे हे तुम्हाला माहीत आहेच... !
तेव्हा अण्णा आता वेळ आलीये कोंडी फोडायची. बॉल आता निर्विवाद पणे तुमच्या कोर्टात आहे. तुम्ही कराल ते योग्यच असेल हा आशावाद आहे. अण्णा, आगे बढो !!
- एक सामान्य नागरिक
आपल्याला न पटणारी मते खोडता
आपल्याला न पटणारी मते खोडता आली नाहीत की ती उडवून लावण्यासाठी मते मांडणार्या व्यक्तीमध्ये दोष शोधायचा या प्रवृत्तीचा मला चांगलाच परिचय आहे.
सोमनाथ चटर्जींनाही हास्यास्पद आणि दबावाला बळी पडणारे विचारवंत म्हंटल्यावर आणखी काय हवे?
>>
माहित असुनही मग आधि माझ्या मतांना मनोरंजन आपण का म्हटले.
सर्वांना शिक्षा होणे कधीच शक्य नाही.सहा सात महिने खेपा घालुन पैसे देउनही जन्मदाखला मिलत नाही तेंव्हा उद्वेग होतोच. कोणताही कायदा (जनलोकपाल देखिल) कायमचा उपाय कधीच नसणार.
अॅटलिस्ट मी ते हास्यास्पद का आहे ते तरी सांगितले. सोमनाथ चटर्जीं हे आदरणीयच आहेत पण मला लोकायुक्त बिल अशा प्रकारे नकोय की अजुन एक भ्रष्टाचारी संस्था निर्माण व्हावी.
निलेकणी म्हणताहेत त्याप्रमाणे सध्याच्या सिस्टीम मध्येच बदल करता येइल पण जन लोकपाल नीट वाचलेत तर ते पण सीबीआय आणि भ्रष्टाचार विरोधी खाते यांच्या सिस्टीमचा वापर करण्याची सुचना
करत आहे प्रश्ण फक्त आणि फक्त हे आहेत.
मी इतका वेळ defend करत आहे आता तुम्ही उत्तरे द्या
१) राजकारणी लोकपाल निवड समितीत हवेत असा आग्रह का? कारण लोकपालाचा कार्यकाल/ अधिकार हुकुमशाही होण्या साठी फारच मर्यादित आहेत.
२) निर्वाचित सदस्यांची चौकशी होउ नये, त्यांआ एक महिन्याची नोटिस द्यावी असे अवाजवी आग्रह सरकारचे का? आणि ते कोंडी का फोडु शकत नाहित?
रॉल गांधीची प्रतिक्रिया अगदीच
रॉल गांधीची प्रतिक्रिया अगदीच पोरकट वाटली. लोकपाल आला तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही म्हणे! मग तुम्ही संसदेत ते बिल का आणणार होतात? का आण्णांच्या बिलावर तेवढे हे ऑब्जेक्शन आहे? आणि करोडो रुपयांचे मानधन आणि सुविधा घेऊनही तुम्ही निर्लज्जपणे 'तरीही भ्रष्टाचार कमी होणार नाही' असे सांगताय हा तुमचाच पराभव ना? की आण्णांचा पराभव?
( रॉल गांधी म्हणजे राहूल गांधी. सोनियांबरोबर लग्न करताना राजीवजीनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यानुसार या बाळाचे खरे नाव रॉल आहे म्हणे. त्याच्या बहिणीचे खरे नाव बियांका. राहूल/प्रियांका ही खास भारतीय जनतेला भुलवायला घेतलेली नावे. एकंदर नाव आणि धर्म लपवून ठेवायची खोड मैमुना बेगमेपासून आजही कायम आहे.
)
जनलोकपाल विधेयकात अभिप्रेत
जनलोकपाल विधेयकात अभिप्रेत आहे. काय आणि कशी चालेल ते होईल तेव्हाच कळेल. पण अशी कार्यपद्धती मूळ यंत्रणेतच अंतर्भूत करणे हाच भ्रष्टाचार रोखण्याचा खरा मार्ग आहे, असे अनेक लोक सांगताहेत. नंदन निलेकनी हे एक नाव. भ्रष्टाचार झाल्यावर त्याला शिक्षा करण्याइतकेच भ्रष्टाचार होऊच नये म्हणून उपाय योजणे गरजेचे आहे.
>>
भरतजी,
हे तुमचे म्हणणे पटते, पण एकदा का हे आंदोलन थंडावले की पुन्हा कोणतेही सरकार काहिही करणार नाही.
निलिमा अगदी बरोबर, लोहा गरम
निलिमा अगदी बरोबर, लोहा गरम है मार दो हथोडा...
आत्ता जर नरमाईचे धोरण ठेवले तर हे लोक गोड गोड बोलून सर्वांना गुंडाळुन ठेवतील.
अहो नुसते अण्णा, नाहीतर
अहो नुसते अण्णा, नाहीतर सरकारवर कशाला अवलंबून रहाता? तुमचे तुम्ही तुमच्या भागातल्या सरकारी अधिकार्यांना भेटा. त्यांना सांगा की त्यांच्या खात्यातील भ्रष्टाचार बंद करा. नाही झाला तर परिणाम वाईट होतील. नुसती धमकी दिली तरी, उगाच रस्त्यावर येऊन राडा करण्यापेक्षा दहा टक्के लाचलुचपत कमी होईल!! नुसते तिथे जाऊन उभे राहिलात तर त्यांना जरा वचक बसेल!! येणार्या लोकांना सांगा, मी लाचलुचपत थांबवायला आलो आहे. जो नाही म्हणेल तो संशयित, मग त्याच्या मागे लागा!! स्वतःच लोकपाल बनून तिथल्या कामकाजावर लक्ष ठेवा. संशय आला तर पुरावा गोळा करा. आता तर काय मोबाईलवरून पण व्हिडिओ काढता येतो! सुरुवात तर करा, हळू हळू पुढचा मार्ग सुचेल.
पोलीसांना सामील करून घ्या, भ्रष्टाचारी आहेत ना ते, त्यांना पैसे द्या की!! नसतील तर कळेलच. सैन्याला सामील करून घ्या. सि आय ए सारखी कोव्हर्ट ऑपरेशन्स! माहित असेल नक्की एखादा भ्रष्टाचारी आहे, तर गाठून मारा त्याला! जरा महाभारत वाचा. काय काय धंदे केले कृष्ण नि पांडव यांनी दुष्टांचा पाडाव करायला! कुणि उपोषण केल्याचा उल्लेख आहे का?
असला सबंध जगात शतकानुशतके चालत असलेला भ्रष्टाचार असा कुणितरी दुसर्याने उपोषण, क्रांति करून नष्ट होणार नाही. एकजात सर्व लोकांनी यात भाग घेतला पाहिजे. युद्ध सुरु झाले चीनशी तर कसे लोक आपणहून भराभर सैन्यात दाखल व्हायला पुढे आले होते, १९६२ साली? आमचे मित्रच हो ते! कॉलेज सोडून गेले!! काहीजण हुतात्मा पण झाले.
हा भ्रष्टाचार म्हणजे चीनपेक्षा भयंकर शत्रू आहे! आणि भ्रष्टाचार करणारे हे देशाचे शत्रूच आहेत, त्यांच्याशी लढा! उपोषण कसले करता? उगाच आपले महात्मा गांधींनी केले, आपणहि करायचे!! हे भ्रष्टाचार करणारे काय सज्जन, पापभीरू, लोकांची काळजी करणारे लोक आहेत का? खुशाल मरू देतील तुम्हाला, त्यापेक्षा जरा ताकद वापरा. आत्ता सरळ येतील लोक!!
नीलिमा, जनलोकपाल
नीलिमा,
जनलोकपाल विधेयकवाल्यांचे पहिले गृहितकच हे आहे, की राजकारणी चोर आहेत. त्यांना देशद्रोहीही म्हणुन झालेले आहे. त्यांच्या ऑर्ग्युमेंट्स याच गृहितकावर आधारित आहेत.
पण देशाचा कारभार आपण या राजकारण्यांच्याच हातात दिला आहे. (त्यालाही आमची संमती नाही, असं उद्या म्हणतील कदाचित). लोकपाल निवड्णार्या समितीतले पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, लोकसभेचे अध्य्क्ष, राज्यसभेचे सभापती या जबाबदार व्यक्ती आहेत. जर या व्यक्ती योग्य लोकपाल निवडणार नसतील, तर त्यांना देशही चालवायचा अधिकार नाही, असे म्हणावे लागेल. हे माझे मत आहे. तुम्हाला मान्य असायची गरज नाही.
जर राजकारण्यांवर विश्वास नाही, तर त्या परिस्थितीवर उपाय क्रांती हा आहे, लोकपाल विधेयक नाही.
एक महिन्याच्या नोटिशीची गरज नाही असे मलाही वाटते.
तुम्ही म्हणताय की इतका वेळ मी डिफेंड करतेय. टीव्हीवरच्या चर्चा बघताना, इथल्या चर्चेत भाग घेताना दिसतेय की जनलोकपालावर टीका केली की त्याला उत्तर म्हणून सरकार, राजकारणी आणि सरकारी लोकपाल विधेयकावर प्रतिटीकाच मिळतेय.
आता माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा: सामान्य माणसाला सगळ्यात जास्त डायरेक्ट त्रास कोणत्या भ्रष्टाचाराचा होतो? कॉमनवेल्थ किंवा २जी भ्रष्टाचाराचा की आपल्याला सरकारी कामांसाठी ज्यांच्याकडे जायला लागते, त्या कर्मचार्यांच्या भ्रष्टाचाराचा? अर्थात दुसर्या. पण मध्यमवर्गीय माणूस बोलतो पहिल्या भ्रष्टाचाराबद्दल. कारण दुसर्या प्रकारचा भ्रष्टाचार अंगवळणी पडला आहे, त्यात तो कमीअधिक प्रमाणात सहभागीही असतो(सरकारी कर्मचारी तुमच्यामाझ्यातलेच असतात), पैसे चारायची ऐपत असते. तो भ्रष्टाचार दूर होऊ शकणार नाही असे तुम्ही म्हणताय. इथे तुम्ही चक्क जनलोकपाल विधेयकाच्या विरोधी भूमिका घेताय. जनलोकपाल विधेयकात तळापर्यंतच्या सर्व कर्मचार्यांचा समावेश आहे, सरकारी विधेयकात नाही आणि ज्यावर एकमत झालेले नाही त्यातला हा एक मुद्दा आहे. कृपया याचा अर्थ मी करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करावे असे म्हणतोय असा घेऊ नये.
अरुणा रॉय, अंजली भारद्वाज यांच्यासारखे सिव्हिल सोसायटीतलेच लोक म्हणतायत की जनलोकपालवाले चर्चेच्या वेळी आपल्यापेक्षा वेगळी मते समजून घ्यायलाच काय तर ऐकायलाही तयार नसतात अरुणा रॉय यांना त्यांनी ट्रेटर म्हटले आहे.
गेले तेरा दिवस दिल्ली, मुंबइ
गेले तेरा दिवस दिल्ली, मुंबइ आणी पुणे फिरलो. जवळुन आंदोलन पाहिले त्यावर नंतर सविस्तर लिहिनच.
एकच प्रश्न आहे - सरकारच्या लोकपाल मध्ये असा एकहि मुद्द कसा नाहि जो जनलोकपाल पेक्षा जास्त कडक आहे ? . आणी उत्तरातुनच हे समजते कि कोणाला काय पाहिजे आहे!
अरुणा रॉय, अंजली भारद्वाज यांच्यासारखे सिव्हिल सोसायटीतलेच लोक म्हणतायत की जनलोकपालवाले चर्चेच्या वेळी आपल्यापेक्षा वेगळी मते समजून घ्यायलाच काय तर ऐकायलाही तयार नसतात अरुणा रॉय यांना त्यांनी ट्रेटर म्हटले आहे. >>>
अरुणा रॉय एप्रिल पासुन आतापर्यत (किंवा त्याआधीहि) काय करत होत्या हे मला तरी समजले नाहि. आत्ताच त्यांनी त्यांचा मसुदा का आणला ? जेव्हा १० सदस्य चर्चा चालु झाली तेव्हाच त्या का नाहि मिडियासमोर आल्या ? मला तर हे प्रसिद्धीसाठीच आहे असे वाटते!
एप्रिलपासून अमका तमका काय करत
एप्रिलपासून अमका तमका काय करत होता असा प्रश्न का विचारतात लोक ? एप्रिलमधे मसुदा तयार करण्यासाठी आंदोलन झालेलं होतं.
जून ३० पर्यंत एकत्र बसून मसुदा तयार करायचा होता ना ? असा मसुदा तयारच झाला नाही तर कुणाचा मसुदा काय आहे हे देशातील जनलेला कसं काय समजणार ?
तारखांबाबत स्मरणशक्ती दगा देत असल्यास कृपया कळवावे.
एप्रिलपासून अमका तमका काय करत
एप्रिलपासून अमका तमका काय करत होता असा प्रश्न का विचारतात लोक ? एप्रिलमधे मसुदा तयार करण्यासाठी आंदोलन झालेलं होतं. >>>>
तवा गरम झाल्यावर पोळी भाजायला येणार्या लोकांसाठी हाच प्रश्न योग्य आहे. ४ महिने (त्याहुन जास्त) हे सर्व चर्चा चालली आहे. त्यावेळी त्या झोपल्या होत्या का ? आता अण्णांना मिळणारे प्रसिद्धी आणी पाठिंबा पाहुन जलन होते आहे हाच भाग यात जास्त असावा!
जून ३० पर्यंत एकत्र बसून मसुदा तयार करायचा होता ना ? असा मसुदा तयारच झाला नाही तर कुणाचा मसुदा काय आहे हे देशातील जनलेला कसं काय समजणार ? >>>
गेले सहा महिन्यापासुन जन लोकपाल आणी लोकपाल मसुदे सगळीकडे आहेत . अरुणा रॉय यांना हे माहित नाहि हे शक्यच नाहि.
अरुणा रॉय यांच्या
अरुणा रॉय यांच्या ड्राफ्टसंबंधीची ही जून महिन्यातली बातमी
चाणक्य, अरुणा रॉय कोण आहेत,
चाणक्य,
अरुणा रॉय कोण आहेत, त्यांची कार्यपद्धती काय, हे माहीत असेल, तर तुम्हांला असले प्रश्न पडणार नाहीत. प्रसारमाध्यमांसमोर यायची त्यांना आवश्यकता नाही. त्यांचं कार्य आणि एकंदर आवाका इतका थोर आहे, की त्यांना प्रसिद्धीसाठी स्टंट करण्याची मुळीच गरज नाही.
वरिल लेखातील वाक्य -
वरिल लेखातील वाक्य - However, NCPRI refuted the suggestion that the draft made by them echoed the government's views, making it a more "acceptable version" as opposed to the Team Anna draft -
आणी एक रीप्ल्याय (त्या लेखातीलच)
praveen sharma (Nagpur)
19 Jun, 2011 08:21 AM
we dont want 'more acceptable' but 'more actionable' lokpal bill
अरुणा रॉय कोण आहेत, त्यांची
अरुणा रॉय कोण आहेत, त्यांची कार्यपद्धती काय, हे माहीत असेल, तर तुम्हांला असले प्रश्न पडणार नाहीत. प्रसारमाध्यमांसमोर यायची त्यांना आवश्यकता नाही. त्यांचं कार्य आणि एकंदर आवाका इतका थोर आहे, की त्यांना प्रसिद्धीसाठी स्टंट करण्याची मुळीच गरज नाही. >>>
तुम्हाला केवळ मला विरोध करायचा आहे हे मला समजु शकते. पण ह्या महत्वाच्या विषयात जरा personal गोष्टी बाजुला ठेवल्या तर बरे होइल.
Aruna Roy is member of the Sonia Gandhi-led National Advisory Council
सोनिया गांधीना लिडर मानुन काम करणार्या कोणाही माणसावर विश्वास ठेवणे मला तरी शक्य नाहि. तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्हि ठेवु शकता. एवढेच म्हणु शकतो की देव तुम्हाला सारासार विचारशक्ती देवो.
http://www.newsofdelhi.com/news-from-india/aruna-roys-timing-for-present...
http://ideas.techiemonk.com/?p=393
congress ला जो लोकपाल आणायचा आहे ते तो अरुणा रॉय यांच्या मार्गाने आणत आहेत. ही हुशारीने खेळलेली राजकिय खेळी आहे. दुर्देव हे की भारतातील लोक इतके सहजासहजी मुर्ख बनवणे शक्य असल्यामुळे राजकारण्यांचे फावते.
अरुणा रॉय प्रसिद्धीसाठी पुढे
अरुणा रॉय प्रसिद्धीसाठी पुढे आल्या, त्यांना जलन होते असे म्हणणे या पर्सनल गोष्टी आहेत.
हे या मुद्द्यावरचे माशेपो. तसंही मी आधी लिहिलंच होतं -"आपल्याला न पटणारी मते खोडता आली नाहीत की ती उडवून लावण्यासाठी मते मांडणार्या व्यक्तीमध्ये दोष शोधायचा या प्रवृत्तीचा मला चांगलाच परिचय आहे."
वरती मी स्पष्टीकरण दिले आहेच.
वरती मी स्पष्टीकरण दिले आहेच. ते वाचा भरत मयेकर
काल आजचा सवाल मधे अमोल
काल आजचा सवाल मधे अमोल पालेकरांनी मांडलेली मते, त्यांची मांडण्याची पद्धत हे सारे विचार करण्यासारखे होते. त्यातला एक मुद्दा पटला. आपल्याला सोयीचेच तेव्हढे मुद्दे घेऊन त्याचा प्रचार करायचा आणि आपल्या विरोधात जाणा-या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचे हे तंत्र सगळेच वापरत आहेत.
खरं तर २४ तास जनता पाहतेच आहे सगळं.. बस्स करा आता !
गणु यांना आंदोलनामधुन रस्तो
गणु यांना आंदोलनामधुन रस्तो रस्ती फिरल्याने अतिशहाणपन आलेले आहे...जसे टीम अण्णांना आलेले आहे उदा. बेदी आणि केजरीवाल...आनि गणु यांचा प्रती केजरीवाल झालेला आहे.......... रस्त्यात फिरण्यापेक्षा उपोषणाला बसा....मग कळेल
एकच प्रश्न आहे - सरकारच्या
एकच प्रश्न आहे - सरकारच्या लोकपाल मध्ये असा एकहि मुद्द कसा नाहि जो जनलोकपाल पेक्षा जास्त कडक आहे ?
सरकारच्या लोकपाल मध्ये असा
सरकारच्या लोकपाल मध्ये असा एकहि मुद्द कसा नाहि जो जनलोकपाल पेक्षा जास्त कडक आहे ?>>>>>>>>>>>>>>
जनलोकपाल लागु करुन लोकपाल भ्रष्ट होणार नाहीच असा काही वायदा केला गेला आहे का त्याविधेयका मधे.....???????
मा़झाही एक पैसा: लोकभावना
मा़झाही एक पैसा:
लोकभावना भडकावून आंदोलन पेटविणे सोपे असते. ते यशस्वी झाल्यानंतर / हाताबाहेर जाऊ लागल्यास आपल्या 'समर्थकांना' आवर घालण्याची क्षमता असणे महत्वाचे.
अण्णांचे बिल समजा ताबडतोब कायद्यात बदलून लागू केले!
या कायद्याची अंमलबजावणी कोण करणार?????
सरकार?
मग जरा लवकर आम्हालाच सरकार बनू द्या, तसा कायदा करा, ताबडतोब! अन्यथा मी उपोषण करतो असे काही सुरू होऊ शकेल?
http://www.esakal.com/esakal/
http://www.esakal.com/esakal/20110827/5528551791162274062.htm
माध्यमांनी सुरूवातीला अतिशय एकतर्फी रिपोर्टिंग केलं होतं एकच एक चित्र समोर ठेवण्याचा प्रयत्न केल्याने जे दिसतंय आणि खटकतंय ती क्षीण बाजू मांडण्याचा हा प्रयत्न होता. असं एकतर्फी काही विवेकाला पटणे शक्यच नाही. माध्यमं एकच बाजू दाखवून झाल्यानंतर सावकाश मग दुस-या बाजूच्या चुकांकडे वळणार आणि पुढचे दहा दिवस तो विषय चघळणार असा अंदाज होता ते आत प्रत्यक्षात येऊ लागलंय. भरमसाट लिंक्स न देता एकच लिंक प्रातिनिधिक म्हणून देतोय.
http://www.esakal.com/esakal/20110827/5528551791162274062.htm
दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून बॅलन्स रिपोर्टिंग केलं असतं तर प्रश्न चिघळला नसता आणि सरकार वर जास्त दबाव वाढला असता असं आता वाटतंय.
याचबरोबर मी या आणि या विषयावरच्या इतर सर्व धाग्यांवरून रजा घेतोय. माझी मतं वाचलीत, सहन केलीत, त्यावर चर्चा केलीत आणि यासाठी आपला वेळ दिलात याबद्दल आपणा सर्वांचा मी कायमचा ऋणी आहे.
माझे पत्र प्रत्यक्ष अण्णांना द्यायचा प्रयत्न करत आहे. बघूयात.
कित्येक लोकांच्या (
कित्येक लोकांच्या ( त्यांचामधे मी पण आहे) मनातले पण त्यांना कदाचित शब्दात मांडता न येणारे विचार खरंतर विचारांचा कल्लोळ मांडला आहेत त्याबद्दल धन्यवाद! खरंतर भ्रष्टाचार इतका खोल तळागाळापर्यंत मुरलाय कि कित्येकदा आपण केलेली एखादी कॄती भ्रष्टाचार आहे हे आपल्याला कळत सुद्धा नाही.
तिरुपती बालाजी असो किंवा तुळजा भवानी. लवकर देवर्शन व्हावं म्हणून आपण पैसे देतो, रिक्षावाल्यांची मनमानी सहन करतो. बस मधे कंडक्टर कडे सुटे पैसे राहिले तर सोडून देतो. मुलांना चांगली शाळा मिळावी म्हणून देणग्या देतो. किती निरागस पणे आपण भ्रष्टाचार करत असतो.
हे लोकपाल बील नक्की काय आहे हे सामान्यांना कळण्यासाठी ते सर्व वर्तमानपत्रांत प्रकाशित करावं. मुख्य म्हणजे भ्रष्टाचार निर्मुलना साठी सर्व स्तरातल्या लोकांचं प्रबोधन करायला हवं.
भ्रष्टाचार निर्मुलनाला खरा पाठिंबा द्यायचा असेल तर केवळ "मी अण्णा हजारे आहे" अशी "टोपी" स्वतलाच घालून चालणार नाही. कोणत्याही छोट्या किंवा मोठ्या कारणा साठी मी लाच देणार नाही असं प्रत्येकानं ठरवलं आणि निभावलं पाहिजे. सर्वसामान्यांच्या आयुष्याचा विचार करायचा तर अगदी रिक्षासाठी मीटर प्रमाणेच भाडं देण्यापासून ते दाखले मिळवणे आणि जागेचे व्यवहार करण्यापर्यंत कुठेही विहीत शुल्काशिवाय वेगळं शुल्क न देण्याचा संकल्प प्रत्येकानं केला पाहिजे.
प्रशांत भुषन ने परत खोडा
प्रशांत भुषन ने परत खोडा घातला आहे
3.19 PM: हमें बताया गया कि न तो कोई प्रस्ताव होगा और न ही मतविभाजन, यह अधिक सार्थक या मददगार नहीं होगी: प्रशांत भूषण
03.17 PM: अभी कोई प्रस्ताव नहीं होगा, कोई मतविभाजन नहीं होगा और अगर अन्ना हजारे के पत्र पर इस प्रकार की प्रतिक्रिया है, तो यह काफी दुर्भाग्यपूर्ण है: प्रशांत भूषण
03.15 PM: संसद में आज की चर्चा का मकसद यह था कि प्रस्ताव पेश किया जायेगा, मत विभाजन होगा और सांसद एवं दल इस विषय पर अपना रूख स्पष्ट करेंगे: प्रशांत भूषण
03.08 PM: टीम अन्ना और सरकार की बैठक खत्म.
चाणक्य, अरुणा रॉय या NACच्या
चाणक्य,
अरुणा रॉय या NACच्या सदस्या नंतर. किसान मजदूर संघाद्वारे त्यांनी प्रचंड मोठं काम उभं केलं आहे. त्यांना मिळालेला मॅगसेसे पुरस्कार त्यांनी नाकारला. हे काम मी एकटीने केलेलं नाही, असं सांगत. म्हणून त्यांच्या पूर्ण संघटनेला हा पुरस्कार दिला गेला. केजरीवाल हे अरुणा रॉयांचे शिष्य. तुम्हांला वैयक्तिक विरोध करण्याचं मला काहीएक कारण नाही, पण अरुणा रॉयांवर असे आरोप होणं, हे विचित्र वाटतं.
अरे अरे चिनुक्स तुम्हाला
अरे अरे चिनुक्स तुम्हाला माहीती नाही का चाणक्यांबद्दल...ते आताच आंदोलनावरुन परत आलेले आहेत..महान कार्य केले आहे...त्यांना केजरीवाल बेदी हेच काय महत्वाचे आहेत...:)
हमें बताया गया कि न तो कोई
हमें बताया गया कि न तो कोई प्रस्ताव होगा और न ही मतविभाजन, यह अधिक सार्थक या मददगार नहीं होगी: प्रशांत भूषण>>>>>>>>>>>> प्रशांत भुषण आता आग लावत आहे...कालच जाहीर झालेले की १९३ कलमाद्वारे चर्चा होणार आहे..त्यात मतदान वगैरे घेतले जाणार नाही...आज चर्चा चालु केल्यावर मी उपोषन सोडेन असे म्हणालेले अण्णां....त्या प्रमाणे आता हे केले नाही ते केले नाही असे मुद्दाम भासवुन आता टीम अण्णा दिशाभुल करत आहे...जवळ जवळ सगळ्याच पक्षांनी अण्णांचे मुद्दे मान्य केले आहेत...आज नाही तरी उद्या विधेयक बनताना हे मुद्दे येतीलच त्यात...आशा आहेच....मग आता परत का हे सगळे.........???????????????
त्यांना मिळालेला मॅगसेसे
त्यांना मिळालेला मॅगसेसे पुरस्कार त्यांनी नाकारला. हे काम मी एकटीने केलेलं नाही, असं सांगत. <<<
चिनूक्स, त्यांनी पुरस्कार नाकारला असा उल्लेख कुठे दिसला नाही.
वर लिहिलय की प्रशांत भूषण खोडा घालत आहेत, पण चित्र तर असे आहे की सरकार खोडा घालण्यासाठी जीवाचे रान करत आहे.
इंद्रायणीशी सहमत ! जपानमधे बस
इंद्रायणीशी सहमत !
जपानमधे बस मधे कंडक्टर नसतो. बस मधे एक तिकिटासाठी मशीन असतं. त्या मशीनमधे पैसे टाकून तिकीट कसं घ्यायचं याचं शिक्षण एक जपानी आई आपल्या लहान मुलाला देत होती असं आमच्या सरांनी सांगितलं होतं. सहज आठवण झाली ...
इंद्रायणी यांच्याशी सहमत. पण
इंद्रायणी यांच्याशी सहमत.
पण इंद्रायणी, धीर धरा. अण्णा, किंवा इतर कुणि काहीतरी करताहेतच, आपण कशाला काही करायचे? आपण अत्यंत भावनाप्रधान होऊन, करुण स्वरात टाहो फोडू, अहो अण्णा, अहो रामदेव बाबा, कुणि तरी काहीतरी करा हो.
आम्हाला अजिबात अक्कल नाही, (आम्हाला आय आय टी नि आय आय एम च्या पदव्या आहेत, अहो अमेरिकेत सुद्धा आम्हाला बोलावतात, प्रोग्रॅमिंग करायला!) पैसे नाहीत (नुकताच अमेरिकेत जाऊ आलो ना, बघायला या एकदा, काय काय आणले आहे! अगदी बायका मुलांसकट गेलो होतो, सग्गळी अमेरिका पाहिली, खूप पैसे खर्च केले, पण इच्छा होती, जाऊन आलो!!)
तर आपण फक्त त्यांच्या चुका काढायच्या! की लग्गेच भ्रष्टाचार बंद! की लग्गेच परत क्रिकेट नि बॉलीवूड, गझला, कविता, प्रकाशचित्रे, भटकंती, पाककृति!!
काही करायचे तर अभ्यास, कष्ट करावे लागतात. ते कोण करणार? त्यापेक्षा दुसर्याने काही लिहीले की आपण लगेच, तुम्ही अमेरिकेतले, तुम्ही भाजपवाले, तुम्ही काँग्रेसवाले, तुम्ही गांधीवादी, अशी लेबले लाऊन त्यांचे म्हणणे कसे चुकीचे, हास्यास्पद आहे असे जोरदार लिहायचे! घाबरायचे नाही!! लेखन स्वातंत्र्य आहे!! (तसे काही विधायक कार्य करण्याचेहि स्वातंत्र्य आहे पण ते कोण करतो! )
कारण आम्हाला स्वतःला काही विचारच करायचा नाही, काही मार्ग काढायचा प्रयत्नच नाही. उगाच कुणि आपले चूक आहे म्हणाले तर अपमान होईल ना? तो कसा सहन होणार? म्हणून काही करायचे नाही!
नाहीतर शेवटी आहेच सरकारला शिव्या!
धन्य धन्य भारत! लवकरच जगातील सर्वोत्तम देश होईल, पार मुंबई पासून डांडाँग पर्यंत. उपोषण मोर्चे करणार्यांवर रणगाडे घालून पोलीस जनतेचे संरक्षण करतील!! सर्व जातीभेद, भाषाभेद दूर! सगळे जण एकच भाषा बोलणार, चिनी! सगळे गरीब लोक मरतील, नि फक्त श्रीमंत लोक उरतील! मग काय, जगातला सर्वात मोठा, नि उत्कृष्ठ देश!!
>>>कित्येक लोकांच्या (
>>>कित्येक लोकांच्या ( त्यांचामधे मी पण आहे) मनातले पण त्यांना कदाचित शब्दात मांडता न येणारे विचार खरंतर विचारांचा कल्लोळ मांडला आहेत त्याबद्दल धन्यवाद! >>> अगदी अगदी !
अनिल सोनवणेजी, तुम्हां लोकांसारख्या सामाजिक घडामोडींबाबत सखोल अभ्यास आणि भरपूर ज्ञान असणार्या, विद्वत्तापूर्ण विवेचन कर॑णार्या प्रतिभावंत, बुद्धीवंत लोकांएवढी बुध्दीमत्ता आणि प्रतिभा आमच्यासारख्यांकडे नसल्यामुळे आणि आपले मनोगत मुद्देसुद मांडण्याची हातोटी आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही आपले फक्त वाचकाची किंवा श्रोत्याची भूमिका बजावत आहोत...............
>>>( रॉल गांधी म्हणजे राहूल गांधी. सोनियांबरोबर लग्न करताना राजीवजीनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यानुसार या बाळाचे खरे नाव रॉल आहे म्हणे. त्याच्या बहिणीचे खरे नाव बियांका. राहूल/प्रियांका ही खास भारतीय जनतेला भुलवायला घेतलेली नावे. एकंदर नाव आणि धर्म लपवून ठेवायची खोड मैमुना बेगमेपासून आजही कायम आहे.>>>
जागो मोहन प्यारे, मी काँग्रेसचीच काय पण कुठल्याही पक्षाची पाठीराखी नाही. पण तरीही तुमच्या वरिल व याआधीच्या प्रतिसादातूनही प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट विचारु इच्छिते की तुम्ही तुमची गांधी घराण्याबाबतची चीड व्यक्त करताना चालू बाफवर गैरलागू असलेली कुणीही न विचारलेली गांधी घराण्यासंबंधीची खाजगी, वैयक्तिक माहिती देण्याचे प्रयोजन काय आहे? जरा समजावून सांगाल का?
Pages