कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.

Submitted by मथुरादास दावणगिरी on 8 August, 2011 - 04:52

कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.

भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.

बॉलिंग तरी कशी ? एक दोन ओव्हर कुणीही टाकायचं कि लगेच स्पिन अ‍ॅटॅक सुरू. या तिकडीच्या जोरावर मायदेशात काही सामने जिंकले कि पब्लिक खूष. पण परदेशात गेले कि हे वाघ मार खाऊन येत. ऑलआउट ३६ असा विक्रमही त्यांनी गाजवला. कुठलंच टीम स्पिरीट नसलेला हा संघ . कपिल आल्यानंतर वेगवान बॉलिंग भारताला मिळाली. पाच पाच विकेटस काढून त्याने ऑपोझिशन चं कंबरडं मोडायला सुरूवात केली. लवकरच त्याची दहशत बसली.

पण आपले विक्रमवीर त्याच्या कामगिरीचा फायदा घेऊ शकत नसत. म्हणून मग त्याने बॅटींग मधेही चमक दाखवायला सुरूवात केली. तळाच्या बॅटसमनना घेऊन खेळायला सुरूवात केली. या सर्वांवर कळस झाला तो १९८३च्या वर्ल्डकप मधे. दुस-या वर्ल्डकपमधे भारताने भाग घेतला होता. सुनील गावसकरने ६० ओव्हर्स खेळून आउट न होता ४६ धावा जमवल्या पण टीम स्पर्धेतून आउट झाली.

१९८३ला कपिलच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीममधे जिंकण्याचा विश्वास कपिलने निर्माण केला. स्वतः तर कामगिरी चांगली केलीच पण के श्रीकांत, मदनलाल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ या प्लेयर्सकडूनही चांगला खेळ करून घेतला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे सिद्ध करताना झिंबावेविरूद्ध त्याने केलेली १७५ नाबाद ची खेळी आज माइलस्टोन आहे. त्या दिवशी कपिल मैदानात आला तेव्हा सीनयर्सने पुन्हा नांगी टाकली होती. पाच आउट १७ असा स्कोरबोर्ड. मॅच हरल्यास मुंबईचा रस्ता धरायचा. अंगात १०५ ताप अशा परिस्थितीत त्याणे सैद किरमाणीला साथीला घेत ती मॅच एकहाती जिंकून दिली.

त्या वर्ल्डकप नंतर भारतीय क्रिकेटचे दिवस बदलले. संघाकडे आदराने पाहिलं जाऊ लागलं. मानसिकता बदलली. देशातही क्रिकेटचं वारं जोमाने वाहू लागल. एक दिवसीय सामने लोकप्रिय झाले. सामने पहायला लोक येऊ लागले. टीव्हीचे हक्क मिळाले. जाहीरातींच उत्पन्न वाढलं. खेळाडूंना पैसे मिळू लागले. त्याआधी खेळाडू रेल्वे किंवा बँकेत नोकरी करून क्रिकेट खेळत.

भारतिय क्रिकेटला एकीकडे संजीवनी देतानाच कपिलने ४०० बळींचा टप्पाही पार केला. त्याने भारतीय बॉलिंगचा गाडा आपल्या खांद्यावर एकट्याने ओढला. त्यातूनही निम्मे सामने भारतातच झाले. अशा पाटा पीचेसवरही त्याने विकेटस काढल्या हे विशेष. त्याला दिवसभर दिवसभर बॉलिंग करूनही थकवा, दुखापती कधीही सतावत नसत. दुखापतीमुळे तो खेळला नाही अस झालच नाही.

फक्त एकदा पुण्याच्या सामन्यात सुनील गावसकरने त्याला खेळू दिल नाही त्यामुळे सलग सामने खेळण्याचा त्याचा विक्रम झाला नाही. असले विक्रम नाहीतर फालतू असतात. कपिल देशासाठी आणि संघासाठी खेळणा-यातला होता. स्वार्थी खेळाडू नव्हता.

या अशा खेळाडूला भारतरत्न द्यायची मागणी क्का झाली नाही याच आश्चर्य वाटतं. त्या वेळी कपिलच्या कोट्यावधी चाहत्यांना भारतरत्नची मागणी करायची असते हेच माहीत नव्हत. क्रिकेट खेळणा-यांना भारतरत्न दिल्याचं ऐकिवात नव्हतच मग त्यांना कसं समजणार ते ?

पण ज्यांनी त्याचा खेळाचा आनंद लुटला अशा सुशिक्षितांनी अशी मागणी त्या वेळी का केली नसावी ? कि त्याच्या या जिगरी खेळाचा आनंद त्यांना झाला नसावा ? कि त्याचं देशासाठी झोकून देणं त्यांना पसंत नसावं ? काही कळत नाही. जे झालं ते झाल.

आता भारत सरकार भारत रत्नच्या अटी शिथील करणार आहे अस ऐकलय. मग आता तरी ही मागणी का करू नये ? ज्यांना ज्यांना कपिलच्या खेळाचा अभिमान आहे , देशप्रेम आहे ते या मागणीला पाठिंबा देतीलच. ज्यांना देशाबद्दल काहीच वाटत नाही त्यांच्यावर जबरदस्ती करता येत नाही पण त्यांनी विरोध करू नये हे आवाहन आहे.

- मथुरादास दावणगिरी

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

>>> जर सोनीयाजींना वाटले तर पार्थिव पटेलला पण भारतरत्न मीळेल

Rofl

>>> म्हणे कपिल कोण ?

आम्हाला फक्त कपिल सिब्बल व मृणाल देव माहिती आहेत. हा कपिल देव कोण?

>>> तुम्ही जितकं घाणेरडं लिहायच तितकं लिहू शकता. आम्ही तुम्हाला काय उत्तर द्यायचं हे त्या पात्रतेवरून ठरवू.

आता मधुकर सुटला

आकाशात ज्याप्रमाणे सूर्य तळपतो आणि प्रत्येक सेन्सिबल माणसाला तो दिसतो >>>>

Lol

तुम्ही आणखी लिहा. आताशी एक टक्काच घाण बाहेर आली आहे. तुम्ही जितकं घाणेरडं लिहायच तितकं लिहू शकता. आम्ही तुम्हाला काय उत्तर द्यायचं हे त्या पात्रतेवरून ठरवू.>>>

Lol

ज्याला कुठल्याही चमच्यांची, ब्रिगेडच गरज नाही. पण डोळ्यांना आणि अकलेला एडस झालेल्या माणसाला ते दिसेलच असं नाही.>>>

Rofl

(काल मी एका पोस्टचा निषेध केला होता त्याचे काही झालेच नाही वाटते.)

-'बेफिकीर'! (२८२३६)

बेफिकीर

पण मला एक बरं वाटतं की कपिलचेही विरोधक आहेत. त्यालाही टीकाकार आहेत. तो माणूस आहे हे त्यामुळे वारंवार सिद्ध होतंय. अर्थात, देवांनाही टीकाकार होते. राम-कृष्णालाही होते. येशू ख्रिस्त -गौतम बुद्धालाही होते. मार्क्‍स-लेनिन-माओ-गांधीजींनाही होते. गांधीजींचा तर गोळीने वेध घेतला. ही देशाची इतिहास घडविणारी मंडळी. पण खेळाच्या मैदानातल्या ऐतिहासिक व्यक्तींनाही विरोधक होते. मग तो पेले असो, ब्रॅडमन किंवा सोबर्स! कारण प्रत्येकाचा चष्मा वेगळा असतो.
काहींना चष्म्यातून फक्त कमळ दिसतं, काहींना फक्त चिखल! काहींना तरतरीत नाकं दिसतं, पण ज्यांना नाकापेक्षा शेंबूड पाहायची सवय असते, त्यांना शेंबूड दिसतो. शेवटी पाहणाऱ्याची वृत्ती महत्त्वाची! कपिलदेव निखंज हा सामाजिक सेवेचं व्रत घेतलेला व्रती नाही. त्याचा आवडता खेळ खेळता खेळता एक बाय प्रॉडक्ट म्हणून तो आपल्याला स्वर्गीय आनंद देऊन गेला. अहाहा, काय ते स्विंग, काय तो जोष, काय ते वेस्ट इंडीजची टीम ८३ मधे ८ बळी घेऊन संपवणं.. त्यात आपण क्षणभर आपली दु:खं विसरतो.
जी ताकद कुसुमाग्रजांच्या कवितेत आहे, जी लतादीदींच्या गाण्यात आहे किंवा झाकिर हुसेनच्या तबल्यात आहे, तीच कपिलच्या अदाकारीत आहे. ज्यांना निर्भेळ आनंद लुटता येतो त्यांनी लुटावा. ज्यांना हा आनंद विष वाटतो त्यांनी टीका करावी. चांगल्या लोकशाहीचं हे लक्षण आहे. मी या टीकेकडे ‘काळं तीट’ म्हणून पाहतो. या ‘तिटा’चा तिटकारा कधीच करू नये. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी त्याची दृष्ट काढायला नको. हे तीटच त्याचं कवच आहे

>>राष्ट्रपती हे पद हेड ऑफ द नेशन असते, हेड ऑफ रूलिंग पार्टी नाही.

मास्तुरे........सिक्सर हाणलात

या बीबीवर कपिलद्वेष्ट्यां देशद्रोह्यांच्या शब्दांचे अर्थ असे वाचावेत.

भयंकर विनोदी - भयंकर बोचरे सत्य
आज कधी नाही इतका हसलो- कटु सत्याने आज कधी नाही इतका संतापलो
सिक्सर हाणलात - आपली लाज गेलीच आहे. काहीतरी लिहायला हवं
अपडेट करीत राहीनच Proud

>>> या ‘तिटा’चा तिटकारा कधीच करू नये. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी त्याची दृष्ट काढायला नको. हे तीटच त्याचं कवच आहे

पण मथुराडासची (मधुकरचा तोतया) मात्र रोजच दृष्ट काढायला हवी. इतक्या महान लिखाणाला कोणाची नजर लागायला नको. Biggrin

अरे

काल पत्र लिहीलं का, काल पत्र लिहीलं का, काल पत्र लिहीलं का, काल पत्र लिहीलं का म्हणून रट लावलेले कुठे गेले ? कुठल्या अंधारात आपले तोंड लपवून बसलेत ?

हे घ्या पत्र आणि हे घ्या पत्ते !

आता बघू तुम्ही काय करताय !!

पण हे वाहते पान का होत नाहि आहे??

रिन की चमकार तुमच्या सुप्त इच्छेपेक्षा जास्त प्रभावी आहे. वाचू द्या सगळ्यांना Biggrin

मंडली

काळजी घ्या. मी जातोय. कामं आहेत. तुमच्यासारखा रिते नाही कि कंपनीचं फुकट कनेक्शन नाही. कामं झाली कि येऊन वाचीन Proud

>>> कुठल्या अंधारात आपले तोंड लपवून बसलेत ?

मथुराडास सारखा तेजस्वी सूर्य स्वयंतेजाने आकाशात तळपायला लागल्यावर इतर सर्वजण अंधारात लपणारच Biggrin

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. कला, साहित्य, विज्ञान आणि लोकसेवेतील अत्युत्तम योगदानासाठी हा सन्मान दिला जातो.

[संपादन] सन्मानित व्यक्तींची यादीनाव वर्ष
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०) १९५४
डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) १९५५
जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५
गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७
डॉ. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८
डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१
पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१
डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२
डॉ. झाकिर हुसेन(१८९७-१९६९) १९६३
डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३
लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६) १९६६
इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१
वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५
के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६
मदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८०
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३
खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९०
नेल्सन मंडेला (जन्म १९१८) १९९०
राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१
कदाचीत -बोफोर्स बद्दल
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१
मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२
जे. आर. डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२
सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२
सुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) (नंतर परत घेतले) १९९२ Sad
ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) १९९७
गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७
अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)(१९०६-१९९५) १९९७
एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८
चिदंबरम् सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८
जयप्रकाश नारायण (१९०२-१९७९) १९९८
रवी शंकर (जन्म १९२०) १९९९
अमर्त्य सेन (जन्म १९३३) १९९९
गोपीनाथ बोरदोलोई‎ (जन्म १९२७) १९९९
लता मंगेशकर (जन्म १९२९) २००१
बिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१
भीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८
साभार -
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%...

masture

ya kashni tumachyabaddal mazya manat apar karuna aahe. itha yeun muskat phodun ghetalyavarahi tumache je hasyspad prayatna chalu aahet te pahun tumachi daya yete aahe. God (KapiDev) Bless You my child !

<<<>>>

Rofl

>>> masture

ya kashni tumachyabaddal mazya manat apar karuna aahe. itha yeun muskat phodun ghetalyavarahi tumache je hasyspad prayatna chalu aahet te pahun tumachi daya yete aahe. God (KapiDev) Bless You my child !

बापरे, हसून हसून पोट दुखायला लागलं.

>>> काळजी घ्या. मी जातोय. कामं आहेत. तुमच्यासारखा रिते नाही कि कंपनीचं फुकट कनेक्शन नाही. कामं झाली कि येऊन वाचीन

अजिबात जाऊ नकोस. गेलास तरी धावत जाऊन पळत ये. निदान अधूनमधून तरी डोकावत जा. तेवढीच आमची करमणूक. Rofl

बरं झालं पु. ल. देशपांडेना नाही दिला तो पुरस्कार विनोदी लेखनासाठी........ नाहितर तो काडून घ्यावा लागला असता ९ ऑगस्ट २०११ ला .........:हहगलो:

अजिबात जाऊ नकोस. गेलास तरी धावत जाऊन पळत ये. निदान अधूनमधून तरी डोकावत जा. तेवढीच आमची करमणूक >>>>>>> Proud

मास्तुरे

मथुरादास हा मधुकर वाटत नाही. तो फार म्हणजे फार म्हणजे फार्रफार्र विनोदी लिहायचा. यांची पातळ तितकी (खाली गेलेली) दिसत नाही.

.................................................... **** ब्रेकिंग न्युज ****.....................................................

आपल्या खात्रीलायक सुत्राकडुन आताच एक महत्वाची बातमी आली आहे.............
राष्ट्रपती प्रतिभा पाटिल यांनी मायबोली वरचे दोन्हीपक्षाचे म्हणने वाचलेले आहे..त्यानुसार त्यांनी खास मायबोली करांसाठी एक निवड समिती स्थापण करायची ठरवली आहे त्यात ...मायबोलीमधील विरोधी आणि सत्ताधारी हे दोन्ही पक्षांचे लोक असतील..सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षाने आपापला उमेदवार ठरवायचा आणि दोन्ही पक्षांनी समोरचा तो उमेदवार कसा पात्र नाही आहे हे पटवुन द्यायचे..जो पक्ष आपल्या उमेदवाराचे जास्तीतजास्त बाजु बळकट करेल तोच भारत रत्न पुरस्कारास पात्र होईल...

त्याच बरोबर स्वातंत्र्य मिळुन देशाला ६४ वर्षे झाली..त्या ६४ वर्षात एकाही खेळाडुला भारतरत्न न मिळाल्याने आणि मायबोलीवर इतके उमेदवार पाहुन या वर्षी तब्बल ६४ भारतरत्न देण्याचे ठरवण्यात आलेले आहे..(काही पक्षांच्या मते १९५० साली प्रजासत्ताक झाले त्यामुळे ५८च द्यावीत) हा निर्णय ही मायबोलीकरांनीच ठरवायचा आहे..(पुर्ण देशभरात केलेल्या सर्वेक्षणानुसार इथेच जास्त खेळाडुनां पाठिंबा मोठ्याप्रमाणात मिळतो..) या करीता देशात खेळल्या जाणार्या सर्व खेळातील मान्यवर खेळाडुंची एक यादी तयार करावी.....(स्वतंत्र बिबी उघडावा)..नंतर आपापल्या पक्षांनी त्या खेळाडुंना आपापल्या पक्षात सामील करुन घ्यावे.. व नंतर त्यावर चर्चा (वाद-विवाद) करावा..... अशी स्पष्ट सुचना राष्ट्रपतींनी केलेली आहे.. त्या बिबी वर एक स्वतंत्र डुआय निर्माण करुन स्वतः लक्ष ठेवनार आहे.....

त्यामुळे मी मायबोलीतील विचारवंतानी या सुचनेला मान देउन एक स्वतंत्र बिबी उघडावा..आणि त्यात प्रत्येक खेळातील मान्यवर खेळाडुचे नाव लिहावे आणि चर्चा करावी .......जेणे करुन सगळ्या खेळाडुंचा मान सुध्दा राखला जायिल...........

Happy

....

मथुरादास हा मधुकर वाटत नाही. तो फार म्हणजे फार म्हणजे फार्रफार्र विनोदी लिहायचा. यांची पातळ तितकी (खाली गेलेली) दिसत नाही.

काही लोक निर्बिड बिर्बिड नावाने लिहायचे आणि संशय मात्र दुस-यांवर व्यक्त करायचे ते सहज आठवलं. Proud

Pages