Submitted by जिप्सी on 6 August, 2011 - 04:31
=================================================
=================================================
ये दौलत भी ले लो ये शौहरत भी ले लो.....
भले छीन लो मुझसे मेरी जवानी.....
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन.....
वो कागज की कश्ती वो बारिश का पानी
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३खेळ मांडला
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
=================================================
=================================================
गुलमोहर:
शेअर करा
जिप्सी.... गावी गेलो होतो आणि
जिप्सी....
गावी गेलो होतो आणि जिथे गेलो होतो तिथेही भिजलो तसेच घरी परततानाही. गरमागरम चहा घेतला आणि मायबोलीचे नवीन लेखन क्लीकले, समोर पहिल्याच स्थानी तुमचे लेटेस्ट अॅडिशन. तुमच्या प्रकाशचित्रांनी असे काय भुलवून टाकले की मी दमून घरी आलो आहे हे बिलकुल विसरून गेलो.
क्र. २ ने तर छातीत हुंदकाच दाटला. अशा काही हुरहूर वाटणार्या आठवणी आहेत माझ्या तशाच दिसत असणार्या धाकट्या बहिणीच्या... तुमच्या फोटोत ज्या विश्वासाने ती छोटी आपल्या भाऊरायाच्या मागे दोन पावले उभी आहे त्यावरून जाणवते की त्याने रस्ता क्रॉस केल्यावरच ती पुढचे पाऊल टाकेल.
तीच गोष्ट 'चांदोबा' चित्राची. व्वा....खूब ! "बचपन के दिन भी क्या दिन थे !" खरंय.
तुमच्या फोटोग्राफीतील तुमच्या कल्पनाविलासाला सलाम करतो आहे.
मस्त
मस्त
सहीच !!! मस्त थिम आहे !
सहीच !!! मस्त थिम आहे !
नेहमीप्रमाणे छान फोटो.
मस्त थिम .. आता मला परत लहान
मस्त थिम ..
आता मला परत लहान व्हायचयं.. प्लीज ...
सगळं मस्तच रे. मी अजून बालपण
सगळं मस्तच रे.
मी अजून बालपण जपलय.
ते जपावच. मोठं कधी होऊच नये.
मुंबईत असताना ठमाकडे गेलो होतो, तर तिच्या लेकीने
सापशिडीच खेळायला लावली.
झब्बू___आणि हा माझा सगळ्यात तरुण मित्र.(मायबोलीच्या
परिवारातलाच.)
आप्रतिम.... शब्दच नाहीत
आप्रतिम.... शब्दच नाहीत :)गेल्याच महिन्यात "चांदोबा" विकत घेतला आणि अधाशीपणे एक बैठकित वाचुन काढला..
मस्त फोटो!!! गोट्या, होडी,
मस्त फोटो!!!
गोट्या, होडी, कवड्या किंवा चंपल (?), कॅरम, साप शिडी जाम आवडले! सगळेच छान आहेत. फारच मस्त थीम, अगदी लहानपण डोळ्यासमोर उभं राहिलं!
मस्त फोटो एकदम!!! सगळे
मस्त फोटो एकदम!!!
सगळे लहानपण समोर तरळून गेले! सलाम!!
सुरेख कल्पना, मजा आली फोटो
सुरेख कल्पना, मजा आली फोटो बघायला
अप्रतीम चित्रे आणि
अप्रतीम चित्रे आणि संकल्पना.
प्र चि ७,८,१०,१२,१५,२० आणि २१ सुन्दरच आहेत.
नेहमीप्रमाणे खूप छान थीम!
नेहमीप्रमाणे खूप छान थीम!
बालपणीच्या आठवणींने मन हळवं झालंय......................
सलाम..... बस्स एवढंच !
सलाम..... बस्स एवढंच !
आहा...... कवड्या चा सारीपाट
आहा......
कवड्या चा सारीपाट खेळ आजी बरोबर खेळत असू..
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन आभार!!!!!
खरंतर इतके सुंदर प्रतिसाद वाचुन काय उत्तर द्यावे ते सुचतच नव्हते.
आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते.
अशाच काहि या बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्यात अजुनही दाटलेल्या, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते.
खरोखरच
आया है मुझे फिर याद वो जालिम गुजरा जमाना बचपनका
हाय रे अकेले छोड के जाना और ना आना बचपन का
१७ मधला खेळ कसा खेळायचा आठवतेय का ?>>>>>हा खेळ गावी खेळायचो. याला आम्ही काचा कवड्या किंवा आठ चल्लस असे म्हणायचो. हा खेळ साधारणत: ल्युडो सारखाच आहे. कवड्यांच्या उलट सुलट पडण्यावरच किती घरं पुढे जायचे हे अवलंबुन असायचे.
आणि यांच्या सोंगट्या या अशाच असायच्या, बांगडीची काच, बटण, दगड, माचिसच्या काड्या इ. 
आणि मग जाणवले. कागझ की कश्ती या ओळी नसत्याच लिहिल्यात तर? मग मजेशीर वाटले असते कदाचित नुसतेच! >>>>>या थीमचे प्रचि पोस्ट करताना वरची ओळ सहजच आठवली होती.
प्रचि १७ मध्ये कवड्या आहेत ना.. त्या उलट्या सुलट्या पडण्याच्या काँबिनेशन वरून मार्क्स ठरायचे...
>>>>येस्स पराग, चारही कवड्या सुलट्या पडल्या तर चार घर (चल्लस) पुढे जायचे आणि सगळ्या उलट्या पडल्या तर ८ (आठ) घरं पुढे जायचे, वर अजुन एक डाव कवड्या टाकायचा मिळायचा.
जिप्स्या......खरेच काही फोटो भुतकाळात घेउन गेले.>>>>>>खरंच रे चातका.
खुप जुने खेळ या निमित्ताने आठवत होते. प्रकर्षाने आठवत होता तो "आट्यापाट्या" आणि "विटीदांडु"चा खेळ. आमच्या इथे दरवर्षी होळीच्या दिवशी अगदी न चुकता आट्यापाट्या आखल्या जायच्या आणि आम्ही तो रात्री उशिरापर्यंत खेळायचो आणि दुसर्या दिवशी रंगपंचमी. या खेळात लहान असल्याने नेहमी कच्चा लिंबू म्हणुन एका जागी बसवून ठेवायचे
आता आम्ही पक्के लिंबू झालो पण हा खेळच कुठे गायब झालय. :(. तोच प्रकार विटीदांडु आणि लगोरीचा सुद्धा.
तीच गोष्ट 'चांदोबा' चित्राची. व्वा....खूब ! "बचपन के दिन भी क्या दिन थे !" खरंय.>>>>>अगदी अगदी
मला परत लहान व्हायचयं.. प्लीज ...>>>>>मलापण
दिनेशदा, झब्बू क्युट आहे.
गेल्याच महिन्यात "चांदोबा" विकत घेतला आणि अधाशीपणे एक बैठकित वाचुन काढला.>>>>माझ्याकडेही बरंच जुनं कलेक्शन होतं, चांदोबा, चंपक, ठकठक, किशोर, चाचा चौधरी इ. अजुनही मध्येच कधीतरी काढुन वाचतो.
मला पंचावन्न वर्षे मागे नेलेस
मला पंचावन्न वर्षे मागे नेलेस !!
बालपण विसरूनच गेलो होतो- आज की आपाधापीमें!!!
अप्रतिम!!
१ नंबर फोटो आहेत....
१ नंबर फोटो आहेत....
छायाचित्र आणि त्यामागची
छायाचित्र आणि त्यामागची संकल्पना..दोन्हीही मस्तच आहे.
व्वाव ! जिप्सी धन्यवाद
व्वाव ! जिप्सी धन्यवाद बालपणाच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल !
निव्वळ कातील........
निव्वळ कातील........
जिप्स्या मेल्या, कुठून कुठून सापडतं हे सर्व तुला??? .... सलाम तुझ्या शोधक नजरेला......
अवतीभवती बरंच असतं रे पण तितक्या शिताफीने ते टिपता आलं पाहिजे..... तूस्सी ग्रेट हो..... तोहफा कबूल करो........
छान आहे कंसेप्ट....
छान आहे कंसेप्ट....
योगेश, सुंदर! १०, १३, १४, १८,
योगेश, सुंदर!
१०, १३, १४, १८, २१ क्रमांकांनी अक्षरशः भान हरपलं.
मस्त थीम आणि सुंदर फोटोज
मस्त थीम आणि सुंदर फोटोज
हि थीम म्हणजे जगात भारी
हि थीम म्हणजे जगात भारी फोटोग्राफी थीम आहे बघ.
हाडा-मांसाचा फोटुग्राफर आहेस तू. 

प्रचि ९ , १६ पर्फेक्ट जमलेत रे.
११९ प्रचि नं तपासून बघ.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
भुंग्या,
११९ प्रचि नं तपासून बघ>>>>>Changes done रे
अफाट ! (निवडक धात! )
अफाट !
)
(निवडक धात!
खुपच छान
खुपच छान
जिप्स्या तु नोकरी सोडून दे,
जिप्स्या तु नोकरी सोडून दे, आणि तुझ्या फोटोग्राफिच्या संकल्पना अजून विकसित कर.. लोकांचे अनमोल आशिर्वाद मिळतील तुला...
आता फोटोंचं कौतुक वगैरे करायला माझ्याकडे नेहमीप्रमाणेच शब्द नाहीत.
माझ्या आवडत्या १०त
कच्चा लिंबु आणि ते दोन
कच्चा लिंबु
आणि ते दोन जणांना गटांत घेताना नावं पाडुन यायचे...., तुझं नाव पोपट माझं नाव मोर्...तुझं नाव चड्डी माझं नाव नाडा
तुझं नाव बॉल माझं नाव बॅट....तुझं नाव डोंगर माझं नाव पाणी.....
नाव सांगताना सुरात...
आम्ही कुणाला भित नाय
कच्चा दुध पित नाय
बोला बोला लवकर बोला
डोंगर पायजे की पाणी?
तुझं नाव पोपट माझं नाव
तुझं नाव पोपट माझं नाव मोर्...तुझं नाव चड्डी माझं नाव नाडा तुझं नाव बॉल माझं नाव बॅट....तुझं नाव डोंगर माझं नाव पाणी<<< चातका,
अगदी अगदी
प्रतिसादाबदल धन्स लोक्स तुझं
प्रतिसादाबदल धन्स लोक्स
तुझं नाव पोपट माझं नाव मोर्...तुझं नाव चड्डी माझं नाव नाडा तुझं नाव बॉल माझं नाव बॅट....तुझं नाव डोंगर माझं नाव पाणी<<< चातका
आम्ही कुणाला भित नाय
"निळी शाई कोरा कागद" 
कच्चा दुध पित नाय
बोला बोला लवकर बोला
डोंगर पायजे की पाणी?>>>>>>>सुरुवातीला अजुन एक लाईन अॅड
Pages