आली माझ्या घरी ही दिवाळी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 July, 2011 - 15:40

काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).

१) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या.

२) मोदक की वॉलवरचा दिवा ?

३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.

४) धरणीमातेचे दर्शन घेणारी.

५) दिपमाला

६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत

७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता.

८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ?

९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या.

१०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती.

११) पावसात ओली चिंब होत होती.

१२) आमची जोडी आहे बाबा.

१३) अरे पावसा थोड थांब रे.

१४) आम्ही पुर्ण उमललोय बरकां ?

१५) अंतरंग.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ही ब्रह्मकमळे आहेत का? प्रस्तावनेवरुन कळत नाहीय. कारण ब्रम्हकमळे एवढ्या संख्येने फुलताना पाहीली नाहीयत कधी. पण असो..एकदम प्रसन्न करुन टाकणारी फुले आहेत?

नलिनी धन्स खर ब्रम्हकमळ दाखविल्याबद्दल.

प्रकाश, सायो, प्रज्ञा, प्रमोदजी, अरुन्धती, श्रद्धा, बन्डूपन्त, प्रज्ञा९ धन्यवाद.

लाजो, साधना, जिप्सी, जागू, मामी, इंद्रधनुष्य, मीरा.श्री, प्रज्ञा१२३ आणि प्रज्ञा९

माझी कविता तुम्हाला आवडली, हे वाचून आनंद झाला. मनःपूर्वक धन्यवाद!

मुळात अवर्णनीय सौंदर्याने बहरलेली ती फुले, अत्यंत कौशल्याने जागू ताईंनी चित्रित केली होती.
त्यामुळे वर्णन करायला मला हुरूप आला. मी ती कविता केली खरी, पण तरीही त्या सौंदर्यास पुरेसा न्याय देता आला नाही असे माझे मलाच वाटत राहिले. निसर्गाच्या किमये पुढे मानवी शब्द तोकडे पडतात. मात्र मानवी चित्रणकला बरीच यथातथ्य वर्णन करू शकते असे सहजच लक्षात येते.

त्याखातर जागू ताईंना अनेक हार्दिक धन्यवाद!

जागु,
फोटो खूपच सुंदर काढले आहेत. माझ्या आईकडे ३० ब्रम्हकमळं एका दिवशी उमलली होती. माझ्याकडे पण आत्ता ३१ कळ्या आल्या होत्या, पण झाड तसं खूप मोठ्ठ नाहिये आणि कुंडीत आहे. त्यामुळे गळत गळत आता फक्त १५ उरल्या आहेत. बहुतेक सगळ्या एकाच दिवशी!

~साक्षी.

नरेंद्रजी आहो धन्यवाद त्या निसर्गाला त्याने एवढी फुले आमच्याइथे फुलवली आणि म्हणुन मी त्याचे फोटो काढू शकले.

चिंगी, समई धन्स.

साक्षी अग जमल्यास त्याला खाली लाव. जर जागा नसेल तर मोठ्या कुंडीत लाव.

मस्तच जागू. तुझे शेरेही छान.

चौथ्या चित्रात पानावर गोगलगाय आहेत ना? दिवे लावायला आल्यात वाटतं. Proud

खूप सुंदर फुले मला याच सुवासाच खूप आवडतो
पण सध्या २, ३ वर्षे फुलाच येत नाहीत कुंडीत आहे झाड काय करू जागू ?

जागा असेल तर कुंडीतून काढून खाली लावा. माझ्याकडे आत्ता कळ्या धरत आहेत. आज जाऊन बघा पानाच्या कडेला लागत आहेत का कळ्या ?

नाहीतर माती बदला कुंडीतली. कुंडी जरा उन येईल अशा ठिकाणी ठेवा. एकदम पण उन नाही लागत. माझ्याकडच अर्धे सावली अर्धे उन अशा जागेवर आहे.

Pages