आली माझ्या घरी ही दिवाळी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 July, 2011 - 15:40

काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).

१) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या.

२) मोदक की वॉलवरचा दिवा ?

३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.

४) धरणीमातेचे दर्शन घेणारी.

५) दिपमाला

६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत

७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता.

८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ?

९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या.

१०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती.

११) पावसात ओली चिंब होत होती.

१२) आमची जोडी आहे बाबा.

१३) अरे पावसा थोड थांब रे.

१४) आम्ही पुर्ण उमललोय बरकां ?

१५) अंतरंग.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे --- असाच एक आकाशदिवा काल रात्री माझ्याही घरी लागला होता .....
रात्रभर उठून उठून सारखे त्या फुलावरच लक्ष ठेवत होते --- खर म्हणजे हा निसर्गाचा सुगंधी सोहळा पाहाण्याचा मोह कोणाला सुटणार Happy

जागु छानच. खूप हेवा वाटतो तुझा हे मात्र नक्की Happy

रोहित, अनघा, मनिष, प्रितीभुषण, चिउ, सुरश, जान्हवी धन्यवाद.

भाऊ असेच असावे.

नशीबवान आहेस जागू Happy
मस्त फोटो... १२ आणि १५ नंबराचा विशेष आवडला.
आमच्याकडेही पानाला फूट आलीये... बघूया त्याची कळी होतेय का Happy

एका वेळी २० म्हणजे जबरीच... आमच्याकडे सध्या ६ कळ्या आहेत.. बहुतेक सगळ्या एकाच दिवशी उमलतील असे वाटते आहे.. उमलल्या की झब्बू टाकतोच...

Jui, Manas, Manjudi, Himscool, Shobha, Dineshada, Harshada, Thand - Thanks.

जागुले, कसली गोड दिसताहेत ही फुलं. आम्ही आलो त्यावेळी मला कळ्या शोधाव्या लागल्या होत्या (कारण आधी कधी पाहिल्याच नव्हत्या). आता त्याच गुबगुबीत झालेल्या बघायला मजा वाटली. आणि फुलं तर फारच देखणी आहेत ग. मी कधी फुललेल्या ब्रह्मकमळाचा वास घेतला नाहीये पण खुपच सुरेख असतो म्हणे. भाग्यवान आहेस! Happy

पुन्हा पुन्हा पाहिली. नरेंद्र गोळेंची कविताही उत्तम आणि समर्पक आहे.

हा इतका शुभ्र धवल रंग ... सरस्वतीच्या साडीचा रंग हाच असेल असं वाटंल.

जागु,
असा हा निसर्गातला आनंद म्हणजेच दिवाळी ना, ती नक्कीच साजरी केल्यासारख वाटतयं
छान वर्णन आणि फोटो तर खास.
Happy

वनराई, यो, साजिरा, सुनित, इंद्रधनु धन्यवाद.

हा इतका शुभ्र धवल रंग ... सरस्वतीच्या साडीचा रंग हाच असेल असं वाटंल.

मामी हो ग खरच.

सही! एकावेळी ईतकी फुलं म्हणजे, परवणीच. कसलं सुगंधीत वातावरण झालं असणार तिथलं. Happy

ब्रम्हकमळ पहायला मिळणं तस दुर्मिळच. आपण ह्याच फुलांना ब्रम्हकमळ म्हणतो पण ह्याचे खरे नाव ' Night Blooming Cereus' (Epiphyllum oxypetalum).

हे खरं ब्रम्हकमळ.

मस्तच. आमच्याकडे परवा नेमकं आम्ही घरात नसताना एक ब्रम्हकमळ फुललेलं. नशिबाने शेजार्‍यांनी काढून जपून ठेवलेलं.
आई वडिलांना दाखवले फोटो. खूष झाले एकदम इतकी फुलंलेली ब्रम्हकमळं बघून.

जागू काय सही आहेत ग फुले! आणि त्यांची शीर्षक पण ईतकी समर्पक आहेत .
माझ्याकडे गेल्या महिन्यात एकदम पाच आली होती .
नरेंद्र गोळे तुमचि कविता लाजवाब!!

सुरेख!!!

Pages