आली माझ्या घरी ही दिवाळी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 31 July, 2011 - 15:40

काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).

१) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या.

२) मोदक की वॉलवरचा दिवा ?

३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती.

४) धरणीमातेचे दर्शन घेणारी.

५) दिपमाला

६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत

७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता.

८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ?

९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या.

१०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती.

११) पावसात ओली चिंब होत होती.

१२) आमची जोडी आहे बाबा.

१३) अरे पावसा थोड थांब रे.

१४) आम्ही पुर्ण उमललोय बरकां ?

१५) अंतरंग.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा! सुरेख!! मन प्रसन्न झाले!!!

गर्भ रेशमी पोत, लेवुनी मंद उषेचा रंग
पर्ण पटलं उलगडुनी देती, फुलास कोंदण संग

पातळ इतकी, पारदर्शी जणू, उमलती पुष्पदले
पराग सळ्या फेर धरती, त्यामधेच शय्या उले

तारारूपी छत्र त्यावरी, ऐटीत समीरे डुले
कुठले ऐसे सुकृत, ज्याचे पुण्य एवढे खुले

मंद सुवासही, शुभ्र रंग अन्‌, रम्य उषेची प्रभा
हिरव्या पानांतून खुलतसे, ब्रह्मकमळ हा उभा

आहाहा... क्या बात है! सुंदर, खुबसुरत, मश्शाल्ला, ब्युटीफुल... Happy

जागु तुझी बाग बघायला आलंच पाहिजे Happy

नरेंद्र गोळे यांची कविताही छानच Happy

जागु मस्तच गं एकदम.. काय तोरणं लागलीत तुझ्याकडे दिवाळीची.. आणि तुझी प्रतिभाही काय बहरलीय... अगदी तुझ्या ब्रम्हकमळासारखीच...

गोळेसाहेबांची कविताही तितकीच सुरेख..

सुपर्ब!!!! Happy

प्रचि १४ खूप आवडला. Happy

गोळेकाकांची कविताही खूप सुंदर Happy

आमच्या घरी २ च्या वर यायला तयार नाहीत ब्रम्हकमळे.>>>>>>केपी, आमच्याकडे एकच्या वर यायला तयार नाहीत. Sad

हि तुझ्याकडच्या ब्रह्मकमळाची इवलुशी कळी Happy

खरंच दिवाळीची दुर्मिळ शुभदायक दीपमाळ ! ङोळेची कविताही साजेशी !
[ शीर्षक वाचून वाटलं घरीं मायबोलीकर आले होते त्याचीं प्र.चि. आहेत कीं काय ! Wink ]

पराग, चनस, वर्षू निल, एक मुलगी, सावली, सुचित्रा, सिंडरेला, मंजिरी, श्री, लाजो, छाया, कांदेपोहे, वर्षा म, नादखुळा, साधना, भाऊ, विशाल, म्हमईकर, अश्विनी, रैना, मोनालिपा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

नरेंद्रजी तुमची कविता खुप सुंदर आहे. धन्यवाद फुलांचे वर्णन कवितेत केल्याबद्दल.

जिप्सि मला धागा काढताना तुझ्याकडे ह्या फुलांच्या कळीचा फोटो आहे हे आठवत होत. आणि मला वाटलच होत की तु आज पोस्टशिल ती. धन्स.

भाऊ, रैना माबोकर घरी आलेले तेंव्हा दिव्यांची नाही माश्यांची दिवाळी होती Lol (खर्‍या अर्थाने मैत्रीची दिवाळी होती.)

मस्तच. फोटो बघताना एवढ प्रसंन्न वाटते आहे. प्रत्यक्ष बघताना काय मस्त वाटत असेल.

<< भाऊ, रैना माबोकर घरी आलेले तेंव्हा दिव्यांची नाही माश्यांची दिवाळी होती >> म्हणूनच कदाचित ब्रह्मकमळं श्रावणाची वाट बघत उमलायची थांबलीं होतीं, आपल्याकडे फक्त तेंव्हांच लक्ष खेंचलं जाईल हें ओळखून ! Wink

Pages