मोहमद रफी - विसरलेले सोनेरी पान

Submitted by मनीषा- on 29 July, 2011 - 12:40

मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....

सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.
लता मंगेशकर गानसरस्वती आहेत. आशा भोसले रसिकांच्या अतिशय आवडत्या गायिका आहेत. किशोरकुमार यांना तरुणाच्या मनात विशेष स्थान आहे. ह्या सगळ्यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख, त्यांची महती अनेकदा वृत्त माध्यमातून ऐकू येते. पण तितक्या प्रमाणात रफी साहेबांची थोरवी गायलेली आढळत नाही.

विरोधाभास असा की ४-५ वाहिन्यांवर जी जुनी हिन्दि गाणी लावतात त्यात मोहम्मद रफींना पर्याय नसतो. कार मधे, बस मधे , मोबाईल मधे भरून गाणी ऐकणार्‍यांमधे रफीसाहेबांचे अगणित चाहते सापडतात. असे रफीसाहेब आपल्यामधे अजूनही सर्वार्थाने जिवंत असताना, माध्यमामधे त्यांना अशी वागणूक का असावी?

खरे तर मोहमद रफी खेरीज हिंदी चित्रपट संगीत अपूर्ण आहे. पण तरीही भारताच्या या सर्वश्रेष्ठ पार्श्वगायकाच्या वाट्याला अशी उपेक्षा का येत असावी? तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो त्यांची महती समजण्याएवढ्या पात्रतेची अभिरूची असावी लागते मुळात.
आजकालच्या फास्ट फूड अन फास्ट म्युझिकच्या जमान्यात "अभिरूची" म्हणजे काय आणि ती कशाशी खातात हे पहायला पण कोणाला वेळ नाहीये. Angry

मला वाटते कारण साधे आहे. किशोर जेंव्हा आराधनानंतर सर्वत्र गाजायला लागला त्याच सुमारास रफिची popularity कमी झाली. किशोरने तेंव्हा सगळे झपाटून टाकले होते. तसेच RD च्या popularity मूळे किशोर अधिक चित्रपटांमधे गात राहिला. त्या मानाने रफिचे गाणे कमी झाले. किशोरची त्या नंतरची गाणी ज्यांनी ऐकली त्यांचीच पुढची पिढी साहजिकच त्याच influence मधे वाढली. त्यामूळे रफिच्या गाण्यापेक्षा किशोरची गाणी अधिक ऐकली गेल, अधिक माहितीची झाली. त्याचाच हा परीणाम असावा.

ह्यात रफि किंवा किशोर ह्यात चांगला कोण अशा निरर्थक वादामधे मला शिरायचे नाहिये.

असाम्याला अनुमोदन, माझ्या आजोबांच्या पिढीला रफीच्या प्रभावाखाली सैगलची उपेक्षा चालली आहे असे नक्कीच वाटले असणार!
रफीच्या वाट्याला उपेक्षा येते आहे हेच मुळात मला मान्य नाही. इंतरनेट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीआ हा दृष्य कंटेंटवर भर देतो. आता किशोरची लाईव्ह रेकॉर्डींग्स, स्टेज शोज, त्याने ज्या संगितकारांकडे काम केले त्यांचे शोज जास्त अवेलेबल आहेत कारण तो जास्त अलिकडचा आहे. यात कोणी जाणूनबुजून रफीला डावलतोय असे नाही. त्यातून आजचा मिडीआ लोकानुनयी आहे त्यामुळे रफीच्या असंख्य चाहत्यांना डावलणे त्यांना परवडणारे नाही.
अशा तथाकथित उपेक्षेमागे काही 'हिडन अजेंडा' आहे असे तुम्हाला सुचित करायचे आहे का?

असामी आणी आगाउ यांच्याशी १००% सहमत....

तुमचे मत हे भावनेवरती बनल्यासारखे वाटते..परिस्थितीवरती नाही... रफीला आजही मीडीया मध्ये जास्त वाव मिळावा असे वाटण्यातून लिहिल्यासारखे वाटले.. असामीचा मुद्दा पुढे नेऊन मी असं म्हणीन की पंचम-किशोरची अनेक गाणी अजूनही सांगितिक दृष्ट्या आजच्या काळानुरुप वाटतात कारण त्यातला जो ताल आहे तो वेस्टर्न आहे आणि आजचे ताल बहुतेक वेस्टर्नच आहेत त्यामुळे आजच्या पिढीला ते जुनाट वाटत नाहीत अजून! कदाचित अजून १०-२० वर्षांनी वेगळे चित्र असेल.. पण रफी वरती वाढलेल्या लोकांच्या मनातून तो कधीच जाणार नाही !

सोनु निगम हा रफी-भक्त आहे हे सर्व जाणतात. त्यानी खास रफीच्या गाण्यांचा वेस्टर्न सिम्फनी ऑर्केस्ट्रॉ घेउन १२ गाण्यांचा एक भव्य कार्यक्रम २००९ मध्ये केला. इथे तो पाहू शकता -

http://www.youtube.com/watch?v=mzVx1cp9J0I

लंडन मध्ये रफी जाउन तीसेक वर्षे झाल्यानंतर सुद्धा एवढी प्रचंड गर्दी त्याच्या गाण्यांना होते ते काय सांगते?

अजूनही कोणत्याही संदर्भात एकूण सर्वोत्तम गायकाचा विषय निघाला कि एकमताने रफीचे नाव घेतले जाते ते का? मीडिया मध्ये नाव येत राहिले म्हणजेच सर्व झाले असे नाही.. नाही का?

रफींना कधी कुठे डावलले गेले आहे असं वाटत नाही...तुम्हाला असं का वाटलं कोण जाणे? एवढ्या महान गायकाला डावलले जाणे शक्य आहे का? Happy

Aagau la anumodan. Malahi mulaat rafi la davalla wagaire jatay asa ajibaat waatla nahi kadhi.
Prashant the one ni dilela udaaharan pan best aahe.

संगीतकारांचे संगीतकार म्हणून ओळखल्या जाणा-या स्व. अनिल विश्वास यांनी रफीसाहेबांबद्दल अनुदार उद्गार काढले होते. सडकछाप या शब्दांत त्यांची संभावना केली होती. त्यात व्यक्तीबद्दलचा राग नव्हता. तर चित्रपटसंगीतामधे होत असलेल्या बदलांमुळे नवीन येणा-या मोहम्मद रफी वगैरे गायकांच्या शैलीबद्दल त्यांना राग असणे स्वाभाविक होते. प्रसंगानुरूप रफीसाहेबांनी गाण्यात भाव व्यक्त करणा-या हरकती घेतल्या. व्हॉइस कल्चरला जन्म दिला. पार्श्वगायनातील आजच्या ब-याच रुढ गोष्टींचे जनक रफीसाहेब आहेत. पण त्याकाळच्या प्रस्थापितांना ते प्रयोग कमअस्सल वाटले असण्याची शक्यता आहे.

पुढे एसडी आणि आरडी या पितापुत्रांमुळे पुन्हा संगीताचा चेहरामोहरा बदलला गेला आणि किशोरकुमारचा जमाना सुरू झाला. त्या वेली किशोरकुमारबद्दलही अनुदार उद्गार काढले गेले होते. डब्यात खडे टाकून ते हलवले कि जे आवाज येतात ते म्हणजे किशोरचं गाणं असंही बोललं गेलं.

पण ते झिंग आणणारं संगीत स्थिरावलं. इतकंच नाहीतर आजच्या पिढीलाही तेच आवडतं. रफीसाहेबांनी .सिच्युएशन बेस्ड गानी जास्त गायल्याने ती पडद्यावर पाहताना जास्त अपील होतात कदाचित म्हणूनच रफीसाहेबांच्या गाण्यांबद्दलचा उल्लेख होत नसावा. पण म्हणून जुन्या गाण्यांची गोडी कमी झालेली नाही. देव आनंद, दिलीपकुमार वर चित्रित झालेल कित्येक गाणी आजही रफीसाहेबांचं महत्व पटवून देतात. गुरूदत्तचे सिनेमे म्हणजे तर निव्वळ रफीच !

रफी साहेबांना माध्यमं विसरली असतील-नसतील....त्यांना रफी साहेबांच्या वाढदिवशीच त्यांची आठवण होत असेल-नसेल.... या वादात न पडता, त्यांच्या आपल्याला आवडलेल्या गाण्यांवर चर्चा करुन हा धागा जिवंत ठेवता येईल का अशी एक कल्पना आली.... काय म्हणताय ? Happy

रंग और नूर कि - गझल
चौदहवी का चांद हो - चौदहवी का चांद
क्या से क्या हो गया - गाईड
तेरी जुल्फों से, जुदाई तो नही मांगी थी - प्यासा
एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा - ??
मन रे तू काहे ना धीर धरे - तेरी सूरत मेरी आंखे
मै जिंदगी का साथ निभाता चला गया - हम दोनो
अभी ना जाओ छोडकर - हम दोनो

अभी ना जाओ मधला आर्जवी स्वर इतका कमाल लागलाय कि देव आनंदच्या सर्व मर्यादा झाकत एक भावविव्हल प्रेमवीर त्या गाण्यातून व्यक्त झालाय.

रफीची गाणी आठवतील तशी लिहूयात का ? रफीसाहेब म्हटलं कि खटकतं... त्याकाळच्या कित्येक प्रेमवीरांना प्रेमभंगाच्या काळात रफी आपलासा वाटला. एखाद्या मित्राप्रमाणे रफीच्या आवाजाने त्यांना धीर दिला

ये दुनिया ये महफिल मेरे काम कि नही
एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है जो

स्वर्गीय स्वर लाभलेला गायक मो. रफी त्यांना अन उपेक्षा.. सगळ्यांच्या मनातील ते गायक आहेत. किशोर, रफी, मुकेश, तलत, मन्ना, हेमंत प्रत्येकजण स्वत:च्या वैशिष्ट्यांनी गायलेत. प्रत्येकजण आपल्या जागी महान आहेत. रफींचा आवाज मलहि खुप आवडतो.

रफीसाहेब म्हटलं कि खटकतं.....रफी आपलासा वाटला >>> अनुमोदन...

माझी आवडती गाणी:-

आसमान से आया फरिश्ता - (वरच्या पट्टीतलं गाणं)
मन रे तू काहे ना धीर - (गंभीर मूड)
मधुबन में राधिका - (शास्त्रीय)
दिल का भंवर करे पुकार - (युगुल - प्रणयगीत)
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया - (बिनधास्त अ‍ॅटिट्यूड)
दर्दे दिल दर्दे जिगर - (प्रणयगीत)
ये दुनिया अगर मिल भी जाए - (सॅड मूड)
सर पर टोपी लाल हाथ में रेशम का रुमाल - (युगुल कव्वाली)
आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे - (उडत्या चालीचं गाणं / कॅब्रे)
आजा आजा मैं हू प्यार तेरा - (काहीच्या काही कॅब्रे)

ही आत्ता लगेच आठवलेली काही गाणी. कंसात गाण्याबद्द्ल थोडक्यात लिहायचे प्रयोजन त्यांच्या गायकीमधली व्हरायटी दाखवणे इतकाच ! Happy

खरय भावना.

रफी आपल्या मुलायम, रेशमी आवाजाच्या जोरावर सलग वीस वर्षे पहिल्या स्थानावर राहीला. आराधनाची जुळवाजुळव चालू असताना संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी रफीकडून गुनगुना रहे है भवरे आणि बागों मे बहार है ही दोन गानी गाऊन घेतली आणि ते आजारी पडले. ते आजारपण प्रदीर्घ होतं. इकडे जतीन खन्ना आणि शर्मिला ठाकूर यांना घेऊन सिनेमाचं चित्रीकरण उरकत आलं होतं. रफी त्यावेळी परदेशात होते.

संगीत पूर्ण करण्यासाठी सचिनदांच्या मुलाने (राहूल देव बर्मन) पुढाकार घेतला आणि आपला मित्र किशोरकुमार याला उरलेली सगळी गाणी दिली. मेरे सपनों कि रानी आणि रूप तेरा मस्ताना या गाण्यांनी कमाल केली आणि पहिल्या दहा मधेही स्थान नसलेला किशोर पहिल्या क्रमांकावर आला आणि रफी वीस वर्षानंतर दुस-या क्रमांकावर गेला.

सचिन देव बर्मन आजारातून उठेपर्यंत थांबलेल्या देवसाठीही गाईडमधे मग किशोरचा आवाज वापरला गेला आणो हे कॉम्बिनेशनही हिट झालं. आतापर्यंत खरतर देव म्हटलं कि रफी हे समीकरणच होतं. व्हॉइस ऑफ सुपरस्टार अशी ओळख बनलेल्या किशोरने मग मागे वळून पाहीलच नाही.

रफीसाहेब गायक म्हणुन महान होतेच पण माणुस म्हणुन ते कितीतरी महान होते याबद्दल चित्रपटसृष्टीतील कुणाचही दुमत होऊ नये. अजातशत्रू माणुस होता.

मीडियामधली उपेक्षा केली म्हणजे संगीतरसिकांनी उपेक्षा केली असे नाही.
गाणी ही ऐकायची चीज असेल तर आकाशवाणीच्या विविध चॅनेल्सवर रफीचा आवाज कायम गुंजत असतो.
उद्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईच्या एफेम गोल्ड आणि विविधभारतीवर रफीगीतांचे खास कार्यक्रम आहेत. बहुतेक एफेम रेन्बोवरही(जिथे नवी गाणी जास्त वाजतात) रफीगीते आहेत
खाजगी एफेम वाहिन्यांवर ज्या प्रकारची गाणी जास्त वाजतात त्यत किशोरकुमारची गाणी अधिक बसतात.

अमक्या कलाकाराची उपेक्षा होते असं म्हणायची पण पद्धत पडून गेलीय. सुमन कल्याणपूर यांची उपेक्षा झाली हे ऐकून ऐकून मला प्रचंड कंटाळा आलाय.

रफीसाहेब अजिबात विसरले बिसरले गेले नाहीयेत!
आणि त्यांच्या वाट्याला उपेक्षा येतेय असं का वाटतंय तेही कळलं नाही.. एखादं उदाहरण दिलंत तर बरं होईल...

रफी-किशोर-लता-आशा-मुकेश ही सगळी आमच्या (आपल्या) भावविश्वातील अढळ स्थाने आहेत.. ती तशीच राहतील.. एकदाच जगायला मिळणार्‍या आयुष्याच्या सो कॉल्ड जडणघडणीमधले हे जीव रमवणारे आवाज होते, आहेत, राहतील...

आम्हाला राहत फतेह अली पण आवडतो, शान-केके-उदित-सोनू पण आवडतात, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आम्ही या संपन्न भूतकाळाला विसरलो आहोत..

रच्याकने, उद्या रफीसाहेबांना जाऊन ३१ वर्षे पूर्ण होतील... ते गेले तेव्हा मी जन्मलोही नव्हतो हे खरे, पण त्यांच्या अंत्ययात्रेला भर पावसात झालेली गर्दी पाहून लोकांना लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेच्या गर्दीची आठवण झाल्याचा किस्सा वाचून मला रफीसाहेबांचं खूपच कौतुक वाटलं होतं...

रफीची उपेक्षा म्हणण्या ऐवजी अनुल्लेख होतो आहे असे मला वाटते. इथे बर्‍याच जणांना असे वाटत नसेल तर आनंदच आहे..
हिडन अजेन्डा म्हणाल तर काहि लोकांच्या मते धर्माच्या आधारावर रफी साहेबांना डावलले जाते. पण त्यात काही अर्थ नाही हे तर सर्वांना माहित आहे.
ह्या धाग्यावर रफी ची गाणी आठवायला कहीच हरकत नाही. कुणी काही विश्लेषण करणार असेल तर छानच !
हे माझी यादी.. आवडत्या रफी गीतांची
१. खोय खोय चान्द
२. आये बहार बनके लुभाकर
३. हुस्न से चान्दभी शरमाया
४. एक हंसी शाम को
५. जाने बहार हुस्न तेरा

आणि अशी किती तरी....

काही नावं जात धर्माच्या पलिकडे गेलेली असतात. त्यांचं नाव घेतलं कि फक्त त्यांची कामगिरी आठवते... जात किंवा धर्म नाही. असो.. अनावश्यक उल्लेख

हिडन अजेन्डा म्हणाल तर काहि लोकांच्या मते धर्माच्या आधारावर रफी साहेबांना डावलले जाते. पण त्यात काही अर्थ नाही हे तर सर्वांना माहित आहे.>> अब आया उंट पहाड के नीचे!
हे 'काही लोक' कोण? त्यांचे हे मत तुम्हाला कसे कळले? 'काही लोकांचे हे मत तुमच्या मूळ लेखाचा भाग का नाही? त्या मतात काही अर्थ नाही असे 'सर्वांना' माहिती असेल तर अशी अर्थहीन मते लिहीण्यामागे काय उद्देश आहे?

वाह वा बहोत खूब, स्व. मो. रफी यांची गाणी म्हणजे मधात बुडवलेले मघईचे पानच जणू.

आपके हसीन रूख पे आज नया नूर है
जाग दिले दिवाना रूत जागी वस्ले यार की
तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ
ऐ गुलबदन फुलोंकी महक
आणि अजुन कित्येक अप्रतिम गीते...

बिगबी ने एका चित्रपटात म्हणले आहे "मुहोम्मद रफी तू बहोत याद आया" !

काही व्यक्तीमत्वे ही जाती धर्म या गोष्टींच्या पलिकडे असतात.
जाती न पूछिये साधू की, पूछी तिजिये ग्यान,
मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान

<काही व्यक्तीमत्वे ही जाती धर्म या गोष्टींच्या पलिकडे असतात.>
सर्वच व्यक्तिमत्त्वांनी तसं पलीकडे जायला हरकत नाही. काहीच कशाला? Happy

"महंमद रफी" हे नावच असे आहे की ते कानी पडताच मंदिरातील धीरगंभीर आणि तितकेच शांत वातावरण स्मरते. हे नाव उच्चारले तर संगीतप्रेमींच्या मनी केवळ पवित्र भावनाच जागृत होते. अन्य अनेक गायक-गायिकांबद्दल त्यांच्या त्यांच्या शैलीबद्दल चढउताराची मते-मतांतरे दिसून येतात पण रफीसाहेबांचा आवाज कानी पडताच ऐकणारा/री त्या आवाजापुढे आदरच व्यक्त करते. मग अशावेळी किशोरकुमारमुळे त्यांची पिछेहाट झाली, लोक त्याना विसरले या गोष्टी दुय्यम तर ठरतात शिवाय त्या आठवणीवर राहाणार्‍याना एक प्रकारची वेदनाही देतात.

रेडिओ सिलोन बंद झाल्यामुळे सकाळी हमखास ७.५५ ला ऐकायला मिळणारे कुन्दनलाल सायगल आज कुठल्याही एफ.एम. वर ऐकू येत नाहीत. हा काळाचा महिमा जरी असला तरी त्यामुळे सायगलसाहेबांचे महत्व आणि श्रेष्ठत्व गौण ठरते असे बिलकुल नाही. हाच तर्क रफीसाहेबांनाही लागू पडतो.

संगीतक्षेत्रात जो तो किंवा जी ती आपल्यातील गुणांमुळे टिकून राहतो/राहते. रसिक केवळ कलागुणांची कदर करणे इतपतच पाहतो. रफींसाठी काश्मिरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत प्रेम आणि आदरच राखून ठेवले आहेत, सर्वांनी. इथे तुलनेचा प्रश्न येत नाही. कालाय तस्मे नमः च्या धर्तीवर प्रत्येक पिढीत त्याना त्याना भावनारे गायक/गायिका येत असतात. लता/आशानंतर कालपर्यंत सर्व अलका याज्ञिक, कविता, सुनिधी, अनुराधाच्या आरत्या ओवाळित होते, आज अवस्था अशी आहे की श्रेया घोषालला श्वास घ्यायला फुरसत नाही. ही एक रचनाच आहे या व्यवस्थेतील. पण त्यामुळे श्रेयाला आता तोड नाही, असे जरी कुणी म्हटले तर त्याचा अर्थ तिच्या अगोदरच्या सार्‍याना कानरसिक विसरले असे होत नाही.

माझा मुलगा चोविस तास सचिन तेंडुलकरचे भजन म्हणत असतो, पण त्यामुळे मी 'अरेरे, काय जमाना आला आहे, आमच्या सनीला आणि विश्वनाथला आजची पिढी विसरली' असा शोक करून चालणार नाही. सुनीलसाठी आमच्या हृदयात जी जागा तीच जागा महंमद रफी या जादुगारासाठी.

थोडक्यात 'रफी' या जादुभर्‍या नावासाठी नूरजहानच्या एका गाण्याच्या ओळी आठवतात >

"तू कौन-सी बदली में मेरे चाँद है आ जा
तारे है मेरे जख्मे जिगर इनमें समा जा..."

अमर रहे रफीसाब आपका नाम |

एका संकेतस्थळावर रफीच्या एका चाहत्याने लिहिलेले वाक्य आढळले.

I have changed many views in life since my childhood, but not my view of Rafi Saab as the God-sent Gandharva who visited this Earth briefly to spread ultimate ecstasy among genuine music-lovers!

अभी ना जाओ छोडकर
आने से उसके आये बहार
खोया खोया चाँद
ये दुनिया अगर मिल भी जाये
वो जब याद आये
जो वादा किया वो
रमया वस्तावया
to be continued... Happy

कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
हम बेखुदी में तुमको पुकारे चले गए
तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर लुंगा
तंग आ चुके हैं कश्मकशे जिंदगी से हम
यह इश्क इश्क है
जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात
इस हंसी शाम को दिल मेरा खो गया

@अनिल सोनवणे: १) 'तेरी जुल्फोंसे जुदाई तो नहीं मांगी थी' हे गाणे माझ्या आठवणीप्रमाणे 'प्यासा' मधले नाही. कदाचित देव आनंद च्या 'जब प्यार किसीसे होता है' मधले असू शकेल.चूभूदेघे.
२)'आराधना'हा चित्रपट १९७१-७२ दरम्यानचा आहे तर 'गाइड' हा कितीतरी आधीचा. त्यामुळे 'आराधना'त किशोर हिट ठरल्यामुळे 'गाइड' मध्ये त्यालाच घेतले हे म्हणणे बरोबर नाही.

गाइड मध्ये किशोरचे 'गाता रहे मेरा दिल' हे एक गाणं आहे तर रफीची 'क्या से क्या हो गया, तेरे मेरे सपने अब एकरंग है, दिन ढल जाए हाए रात न जाए' अशी तीन गाणी आहेत.

रफी साहेबांना डावलणे अशक्य आहे.. मिडीया आज ज्याला "डीमांड" आहे ते वाजवतो. तसे नसते तर रेशमिया चे दुकान चालले नसते.
असो. बाकी, किशोरदा गुरूस्थानी आहेत तेव्हा कुणाशीच तुलना नाही. पण रफी साहेब म्हणजे रसगुल्ला- मिठास आणि सावकाश आस्वाद घेत गळ्याखाली ऊतरवणे आणि नंतर ती गोडी जीभेवर बराच वेळ टीकून रहाणे. किशोरदा म्हणजे अस्स्सल १००% शुध्द वाईन! पहिल्याच घोटात बसलेली कीक, मग चढलेली नशा.... ऊतरतच नाही.... पार बेहोश होतो माणूस. Happy

'कारवां गुजर गया,
चाहूंगा मैं तुझे सांझ संवेरे,
'राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है',
चल उड जा रे पंछी,
यह दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है,
नैन लड गयी है,
यह मेरा प्रेमपत्र पढकर,
'सर जो तेरा चकराए'
तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नजर ना लगे'
'चाहे कोई मुझे जंगली कहे'
'मैंने जीना सीख लिया'
आणि द्वंद्वगीते सुद्धा विचारात घेतली तर
'दीवाना हुआ बादल
'तारोंकी जुबांपर है मुहब्बत की कहानी'
'तू गंगा की मौज मैं जमना का धारा,-किंबहुना बैजूबावरा तली सर्वच गाणी,
'चली चली रे पतंग मेरी चली रे'
'गोरी चलो ना हंस की चाल'
'चलो दिलदार चलो'
आणि आणखी कितीतरी...

योगला अनुमोदन Happy
महंमद रफी खरच हे नाव नुसते ऐकले की मन त्या सुंदर आठवणीत रमून जाते. लहान असताना घराघरात कोणाकडे टि.व्ही असो वा नसो पण रेडियो जरूर असायचा. तेव्हा महंमद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार यांची गाणी कानावर पडायची , अजूनही येतात. यांची गाणी मनात असकाही घर करून गेलेत की ते विस्कटने अशक्यच Happy

Pages