स्वप्न का पडतात?

Submitted by साक्षी१ on 25 July, 2011 - 23:14

मी रोज सकाळी ५.३० ला उठते, पण कोणी मला ५.१५ ला जरी उठायला सांगीतले तर मला जमत नाही. असं वाटतं १५ मी. झोप का घालवा?
पण आज सकाळी मी ५ वाजताच जागी झाले ते एका भयंकर स्वप्नाने. जागी झाल्यावर मला असं जाणवलं की मी रडतही होते. पण आता या अनुभवाने मी पुरती गोंधळून गेले आहे. काय असेल याचा अर्थ? खरंच स्वप्न आपल्याला काही सुचवतात का? की हा निव्वळ मनाचा खेळ आहे?
कुणी जाणकार यावर प्रकाश टाकतील क? असा अनुभव कोणाला आला आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

admin प्लिज हा धागा आहारशास्त्र मधुन हलवाल का? मी प्रयत्न केला संपादन मधुन करण्याचा पण जमलं नाही.

मला असे बरेच अनुभव आहेत... बर्‍याचदा सलग ४-५ रात्री मला ठरावीक वेळीच स्वप्नामुळे जाग येते.. अगदी एक मिनीटही इकडे तिकडे होत नाही.. भयंकर स्वप्नं तर नेहमीच पडतात मला.. पण त्यांचे अर्थ वगैरे शोधण्याच्या भानगडीत मी सहसा पडत नाही..

माझ्या मते;
१) कॉम्प्युटरमध्ये जसे हार्डडिस्कवरील माहितीच्या डीफ्रॅगिन्गच्या वेळेस होते तसे, किन्वा समजा खोलीची आवराआवर करताना व नको असलेल्या बाबी टाकून देताना टाकुन द्यायची गोष्ट तुम्ही एकदा अजमावता व बाजुला काढता, हवी असलेली गोष्ट नेमक्या जागी ठेवता तसेच काहीसे पन्चेन्द्रिये व जाणिवान्नी मेन्दूत जमा केलेल्या असन्ख्य माहितीबाबत होत असावे. माणसाच्या झोपेच्या निवान्त वेळेस जेव्हा अन्य दैहिक काम फारसे नसते तेव्हान्च्या रिकाम्या वेळात मेन्दू तोवर साठवलेल्या माहितीचे पृथक्करण करीत पुन्हा लावुन ठेवताना, चूकार क्षणी या कामातील काही भाग अर्धवट झोपेतदेखिल मेन्दूतिलच दैहिकदृष्ट्या सजग भागात पुनःप्रक्षेपित होऊ लागल्यास दृष्यमान होऊन स्वप्न पडत असावे. मी इथे मेन्दूच्या काम करण्याच्या पद्धतिमधे "उघड-बाह्यात्कारी" व "सूप्त" अशा दोन स्थितीन्ची कल्पना करतोय. उघड काम आपल्याला समजते किन्वा दुसर्‍या शब्दात मेन्दुचे उघड कार्य म्हणजेच "मी" पणाची जाणिव, तर मेदूचे सूप्त कार्य हे केवळ देहापुरते मर्यादित न रहाता अखिल सृष्टीविषयक विचार/कल्पना/भुमिका यान्ची निश्चिती करण्याचेही असते. जेव्हा ही दोन्ही कामे एकत्रीत करण्याची क्षमता माणसामध्ये येऊ शकते तेव्हा बहुधा तो मोक्षाप्रत/समाधिवस्थेत जात असावा. तर सूप्त स्थितीतील कार्ये जर उघड-बाह्यात्कारी (जरी झोपेत असला तरी) अवस्थेमधे लुडबुड करु लागली तर झोपेत असताना स्वप्ने पडणे यात विशेष काही नाही.
२) वरील प्रकाराव्यतिरिक्तही कार्यकारणभाव स्वप्नान्मधे असू शकतो तो म्हणजे अन्य कोणत्याही बाह्य शक्तीशी सम्पर्क आल्याने मिळालेली पूर्वसूचना व्यक्तिपर्यन्त पोचविण्यासाठी सम्पर्काकरीता/सन्वादाकरीता झोपेतील स्वप्नाचा आधार घेणे. अशी स्वप्ने भविष्यसूचक असू शकतात.
यावर माझा फारसा अभ्यास झालेला नाही व जे कळतय ते केवळ जाणिव-नेणिवेच्या व अस्पःष्ट स्वरुपात असल्याने हुकमी भाष्य करता येणे अशक्य. तरीही आधुनिक व तथाकथित सुशिक्षित लोक म्हणतात तसा हा केवळ मेन्दूतील केमिकल लोचा असतो असे मानण्यास मी तयार नाही.
३) ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या लग्नकुन्डलीतील चन्द्राचे स्थान व त्याचेबरोबरील इतर ग्रहान्चे योग व गोचर ग्रहस्थिती यावरुन ठराविक व्यक्तिस सामान्यतः कोणती स्वप्ने पडतील वा पडणारच नाहीत याबद्दल अटकळ नक्कीच बान्धता येते. अर्थात यावर्र देखिल भरपुर सन्शोधन/अभ्यास होणे बाकी आहे.
४) मी भविष्यसूचक (खर्‍या ठरलेल्या) स्वप्नान्चा अनेक वेळेस अनुभव घेतला आहे. तसेच भयकारी अनाकलनीय स्वप्नान्चा (जी प्रत्यक्षात उतरत नाहीत) देखिल घेतला आहे.
५) नित्य झोपायच्या आधी जर देवाचे स्मरण करुन आभार मानले व त्याचेवर विसम्बुन झोपेच्या अधिन होऊ लागलो तर स्वप्नान्चा दोषात्मक परिणाम बर्‍याच प्रमाणात कमी होतो असा अनुभव आहे.

मनाचे खेळ अथांग....

मेंदू नावाच्या हार्ड डिस्कची ऑप्रेटिंग सिस्टीम म्हणजे मन. ते कुणी लिहीलं कसं लिहीलं हे सांगता येत नाही. पण हार्ड डिस्क ऑन असो ऑफ असो सॉफ्टवेअर चालूच असतं. ऑफलाईन असतांना बॅक अप मेमरीतून ते मेडिया प्लेअर प्ले करत असतं. त्याला स्वप्नं म्हणतात.

ज्यांचं सॉफ्टवेअर जुनं झालय त्यांना पडलेली स्वप्नं आठवत नाहीत Happy

मेंदू नावाच्या हार्ड डिस्कची ऑप्रेटिंग सिस्टीम म्हणजे मन. ते कुणी लिहीलं कसं लिहीलं हे सांगता येत नाही. पण हार्ड डिस्क ऑन असो ऑफ असो सॉफ्टवेअर चालूच असतं. ऑफलाईन असतांना बॅक अप मेमरीतून ते मेडिया प्लेअर प्ले करत असतं. त्याला स्वप्नं म्हणतात. >> मस्तच स्पष्टिकरण

मला जेव्हा ऑफिसचं टेन्शन असतं तेव्हा मला बर्‍याचदा एक स्वप्न पडतं की माझी एका महिन्यानंतर बारावीची परिक्षा आहे आणि आज मी पहिल्यांदा मॅथ्सचं पुस्तक उघडून पाहतेय. मला प्रचंड टेन्शन येतं की मी एका महिन्यात हा अभ्यास कसा पुर्ण करेन? इतका ताण येतो की मला घाम फुटतो आणि जाग येते. जाग आल्यावर मी स्वतःला समजावते की बारावीची परिक्षा पास होऊन बरीच वर्षं उलटून गेलीत आणि हे फक्त स्वप्नच होतं. Happy बरं हे स्वप्न जेव्हा ऑफिसातलं टेन्शन येतं तेव्हाच पडतं. मल वाटतं 'बारावीच्या मॅथ्स्'ची भीती माझ्या हार्ड डिस्कवर कायमची कोरली गेलीय.:)

साधारण २-३ वर्षांपूर्वी 'मन:शक्ती' मधून ६ भागाची एक चांगली अभ्यासपूर्ण लेख मालिका प्रकाशित झाली होती. त्यातून बरीच तांत्रिक माहिती मिळू शकते.

साक्षी,
माझ्या मते स्वप्नांचे अनेक प्रकार असावेत, काही लोकांना एका विशेष प्रकारचीच स्वप्ने जास्त पडत असतील.
मला असे अनेक स्वप्ने पडली कि जी पुढे घडणार्‍या घटनांची पुर्वसुचना देण्यासाठीच होती.
आता मी अशा प्रकारच स्वप्न पडल कि हमखास अस काहीतरी घडेल हे ओळखतो

मी भविष्यसूचक (खर्‍या ठरलेल्या) स्वप्नान्चा अनेक वेळेस अनुभव घेतला आहे
लिंबुटिंबु,
अनुमोदन !
छान माहिती दिली आहे.

थोडीफार चर्चा खालील धाग्यांवरही आहे:

स्वप्ने, पूर्वाभास, टेलिपॅथी, बाधा, मल्टिपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर आणि पुनर्जन्म- यांना जोडणारा एकच धागा...!!!
http://www.maayboli.com/node/14630

स्वप्नं : http://www.maayboli.com/node/17479

दिवसभरात जमा केलेला 'डेटा' व्यवस्थीत संपादित करून, जागच्या जागी लावून ठेवणे, अर्थात, दीर्घ स्मरणात नोंद करणे हे स्वप्नांचे काम आहे. दिवसभर हँडिकॅमवर जमा केलेलं चित्रण जसं आपण रात्री बसून 'फास्ट फॉरवर्ड' करत 'एडिट' करतो? तसं काहिसं.
झोपेत दर ९० मिनिटांत एक 'REM sleep cycle' असते. या वेळात प्रत्येक जण स्वप्ने पहातो. काही स्वप्नांतून जाग येते, ती आठवतात. बाकी नाही. या विषयावर बोलण्यासारखे बरेच आहे. वेळ मिळेल तेंव्हा लिहीन. पण, स्वप्नांतून काही भूत्/भविष्य समजते या वर मा़झा विश्वास नाही. विकिपेडिया वर याबद्दल छान माहिती आहे.

मला सलग ध्यानी मनी नसताना एक मृतव्यक्ती स्वप्नात येते पण जिवंत म्हणून माझ्या सासर कडील जी व्यक्ती माझ्या लग्नाच्या आधीच वारलीय त्या व्यक्तीला मे कधीच भेटले नाही आहे पण ती स्वप्नात येते casual स्वप्न असतं पण असे का होत असावे..मे तिचा विचार ही करत नाहीआज तर भर दिवस इतकं मोठं स्वप्न होते ..सर्व जस च्या तसे आठवतेय..

सर्वात खतरनाक प्रकार म्हणजे जाग येते सर्व दिसत ऐकायला पण येते पण शरीराची कोणतीच हालचाल करता येत नाही.कोणत्याच अवयव वर नियंत्रण राहत नाही.
अशी अवस्था एक ,दोन मिनिट तरी टिकते.