स्वप्नं

Submitted by भूत on 2 July, 2010 - 03:37

स्वप्नं - [बरेच दिवस या विषयावर लिहायचं मनात होतं . आज मुहुर्त मिळालाय !]

स्वप्न : खूप लोकांनी यावर आधीच लिहुन बोलुन ठेवलयं , स्वप्न का पडतात , त्यांना अर्थ असतो का , असतो तर नक्की ईन्टरप्रिटेशन कसं करायचं स्वप्नांचं , सगळ्यांना ब्ल्यॅक & व्हाईटच स्वप्ने पडतात की काहीना रंगीत ही पडतात , प्राण्यांना ही स्वप्ने पडत असतील काय ?? .....वगैरे वगैरे ...

या लेखात हे सारे चर्चेचे मुद्दे नाहीत .
मला तरी बर्‍याचदा फार विचित्र स्वप्न पडतात अन ती डेटेल्ड लक्षात ही रहातात , ती ऐकल्या वर माझे कित्येक मित्रांनी "Joke of the day " हा प्रतिसाद दिलाय !! अशीच स्वप्न ईतरांनाही पडत असतील काय या कुतुहलापोटी लिहितोय .....

मित्रांनो , तुम्हालाही पडतात का अशी काही खास स्वप्ने ? चला तर मग शेयर करुयात अशी काही स्वप्ने ...

(डिस्क्लेमर : स्वप्नं हा अत्यंत वैयक्तिक विषय आहे हे मान्य पण काय शेयर करावे काय करु नये हे कळण्याइतके सगळेच माबोकर सुज्ञ आहेत .)

गुलमोहर: 

चला मीच सुरवात करतो -

सातार्‍याजवळ ठोसेघर नावाचे एक सुंदर निसर्ग रम्य ठिकाण आहे . तिथे मी , अन माझे ३ मित्र हरी ओंकार अन नचिकेत फिरायला गेलो .... परत येताना नेहमी ५ वाजता येणारी बस अजुन कशी आली नाही हे तिथल्या एकुलत्या एक हॉटेल मालकाला विचारले तर तो म्हणाला " बस क्यॅन्सल झालीया वाट्टं " ... आम्ही पार वैतागुन गेलो ...घरी पण कळवता येत नव्हतं ( तेव्हा मोबाईल इतके झाले नव्हते ) घरचे ओरडणार याची थोडी बिती ही वाटत होती . शेवटी त्या हॉटेल मालकाची परवानगी काढुन तिथेच , हॉटेल बाहेरच्या मोकळ्या जागेत , चटया पसरल्या अन झोपी गेलो . तेव्हा ....

अचानक एक वाघाने माझ्या अंगावर ऊडी मारली ( वाघ बरंका ...पट्टेवाला ढाण्या वाघ ...बिबट्या नव्हे ) ... चांगलं २००- ४०० किलोचं जनावर ते !
पण मी घाबरलो नाही एक सणकावुन दिली त्याच्या थोबाडात ! अन चक्क चक्क वाघ बाजुला पडला Proud लगेच माझ्या ३ मित्रांनी अन मी त्याचे चार पाय पकडले अन त्याला चोप चोप चोपला !! अगदी अर्धमेला केला !!!

त्याला एका ट्र्क मधे टाकुन चोपत चोपतच सातारच्या पोलीस स्टेशनला आणला अन पोलीसांच्या ताब्यात दिला ( पोलीस बरकां ....वनरक्षक वगैरे नाय Proud ) अन तो लागलीच सटकला त्यांच्या तावडीतुन ...

मी ऑरडत होतो " वाघ पळाला ..वाघ पळाला ..."

तेव्हा घरच्यांनी जागे केले ..." वाघ पळाला ..आता तु पळ कॉलेजला ..." Proud

मला तरी बर्‍याचदा फार विचित्र स्वप्न पडतात अन ती डेटेल्ड लक्षात ही रहातात , ती ऐकल्या वर माझे कित्येक मित्रांनी "Joke of the day " हा प्रतिसाद दिलाय !! >>> same with me, प्रसाद.

मी मोदकला बर्‍याचदा माझ्या अतर्क्य आणि अगम्य स्वप्नांविषयी सांगायचे तर माझी थट्टा करायचा. तो म्हणायचा की अंधुक अंधुक पडतात त्याला पण स्वप्न, पण लक्षात राहत नाहीत. पण लग्न झाल्यापासून त्यालाही कॉमेडी स्वप्न पडायला लागलीयेत. आणि मुख्य म्हणजे लक्षातही रहायला लागलीयेत. Wink

मला तरी बर्‍याचदा फार विचित्र स्वप्न पडतात अन ती डेटेल्ड लक्षात ही रहातात>> हे माझ्याबाबतीतही अगदी लागु पडतं.. माझी स्वप्नं लवकरच टाकेन इथे

मला पूर्वी खूप वेळा मी खूप उंच ब्रिजवर आपल्याच नादात चढतेय असं दिसायचं आणि एका ठिकाणी त्या पुलाच्या पायर्‍याच संपल्यात पण मी लक्षात न येता तशीच पुढे पाऊल टाकतेय आणि खाली कोसळतेय असं दिसायचं पण जमिनीवर पोचण्यापूर्वीच जाग यायची.

मला खूप वेळा एकच स्वप्न पडलंय..... एक वाडा आहे, त्याच्या मधल्या चौकातच फक्त उजेड आहे, तिथेच उभी राहून मी वरच्या कुठल्यातरी खिडकीत फार अपेक्षेने पाहतीये....... माझ्या पाठीवर काळी सॅक आहे आणि शेजारी कोणतरी उभं आहे पण कोण ते कळत नाही.....

माझं स्वप्नः

मी निगडीला मैत्रिणीकडे रहायला गेलेय.. आणि तिथे आम्ही जवळच्या एका मंदिरात जायला निघतो.. खूप वेळानंतर एका मोकळ्याजागी एक भलंमोठं मोती रंगाच मंदीर दिसलं.. आणि मी अचंबीत की निगडीत इतकं मोठं मंदीर आणि इतके दिवस मलाच कसं माहित नव्हतं ते.. म्हणुन विचारलं तर कळलं की, हे नवीनच बांधलय.. पण नवीन मंदीर होत आहे असं देखील ऐकायला मिळालं नव्हतं म्हणुन अजुन आश्चर्य वाटलेलं.. पण बाहेरुन ते मंदीर इतकं सुंदर होतं म्हणुन पायर्‍या चढुन वर गेलो (मला मंदीराची रचना अगदी व्यवस्थीत आठवत आहे पण आता शब्दात नाही लिहिता येनार).. वर गेल्यावर भरपुर माणसं मंदिराची प्रशंसा करीत असताना दिसले.. चौकोनी मंदीर, पायर्‍या चढुन गेल्यावर चारही बाजुंना गॅलरी टाइप जागा मोकळी सोडलेली आणि मधोमध भला मोठा चौकोनी खोल हौद पाणी भरलेला... आणि त्याच्या तळाशी मानवी सांगाडे....

हे स्वप्न खरंतर एका भल्यामोठ्या स्वप्नाचा छोटासा भाग होय..पण हाच भाग इतरांना सांगुन सांगुन चांगला लक्शात राहिलाय...

नवीन घरी रहायला गेलो तेव्हाचं स्वप्न.. नुकतच फर्निचरचं काम झालं होतं.. त्यामुळे शोकेस तयार होवुनही त्यात काहीही सामान भरलं नव्हतं त्यावेळेस स्वप्नात मला त्या रिकाम्या शोकेस मधे फक्त एकच अंडं दिसत होतं आणि ते सापाचं होतं (ते सापाचं होतं हे मला कसं माहित, हे ठावुक नाही).. प्रचंड घाबरले होते.. त्यानंतर तर मला त्या शोकेसकडे बघायलाही भिती वाटायची...

समुद्रकिनारी मी टप नसलेल्या जीपमधुन ड्रायव्हर शेजारच्या सिट वर बसुन मस्तपैकी राईड घेत आहे आणि ड्रायव्हर सिट वर एक मस्त डॉल्फिन बसलेला आहे.... Happy

हे स्वप्न मी खूप लहान असताना पडलेलं...

मला आमच्या नात्यात कोणी आजारी असेल तर ते देवा घरी गेलेले स्वप्न पडते.
आणि कोण कोण कसे रडते आहे ते दिसते. काही दिवसानी ती लोक जग सोडुन जातातही आणि सगळे अगदी तसेच रडतात जसे मी स्वप्नात पाहीले होते असे तब्बल चार ते पाच वेळा झाले आहे माझ्यासोबत.
एकदा माझे आजोबा. माझ्या शाळेतील दोघी मैत्रीणीचे वडील. माझ्या काकीचे वडील असे मला का होते समजत नाही. पण दरवेळी असे होत नाही. कधी तरीच.
मी जसे माझ्या काके बहीणीचा उल्लेख माझ्या मम्मीला सान्गीतला होता ती अगदी तसेच रडली तीचे आजोबा वारल्यावर. मला अगदि त्या लोकान्ची अन्त्य यात्रा हुबेहुब दिसते. ही चेष्टा नाही अगदि खरे आहे. पण सगळ्याच्या बाबतीत होते असे नाही क्वचितच होते.
पण बोलतात ना हे सगळे मनाचे खेळ आहेत, शेवटी.........
मनी वसे तेच स्वप्नी दिसे.
धन्स प्रसाद.
मला मन मोकळे करायला सन्धी दिल्याबद्दल.

स्वप्न का पडतात , त्यांना अर्थ असतो का , असतो तर नक्की ईन्टरप्रिटेशन कसं करायचं स्वप्नांचं? >>>

माझ्या २ विशिष्ट स्वप्नांचा आणि मला प्रत्यक्ष लाईफ मध्ये आलेल्या अनुभवांचा संबंध बघता मला तर असं वाटतंय की कधी कधी स्वप्ने ही सूचक असू शकतात.

माझे लग्न ४ वर्षापूर्वी झाले. माझी माझ्या आजेसासूबाईं (साबुंची आई) बरोबर खूप छान गट्टी होती. त्यांचं नाव छाया. आमच्या फॅमिलीत खूप आज्या आहेत त्यामुळे सगळ्यांना वेगवेगळे ओळखता येण्यासाठी छाया आजी, मीना आजी वगैरे नावाने रेफर करतो आम्ही. गाण्यांची आवड, कवितावाचनाची आवड अशा काही सामायिक आवडींमुळे त्या अगदी माझी स्वतःची आजी असल्यासारखे वागायच्या माझाशी. माझं खूप कौतुक होतं त्यांना. ३ वर्षांपूर्वी त्या मे महिन्यात वारल्या. एक पॅरालिसीस चा अटॅक आला आणि २-३ दिवसात खेळ आटोपला. हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट करेस्तोवर चांगल्या शुद्धीत होत्या. शेवटी शेवटी कोमात गेल्या होत्या आणि एक ऑपरेशनही करावे लागले होते त्या कोमात असतानाच. पण काहीही उपयोग न होता त्या गेल्याच. Sad थोडक्यात त्यांना स्वतःला कल्पनाही आली नसेल की आपण या जगाचा निरोप घेणार आहोत. Sad

गेल्याच्या गेल्या वर्षी मला असे स्वप्न पडले की आम्ही कुठेतरी गावी सगळे ट्रिपला गेलोत. तिथे एक जुना वाडा होता. एक खोली ही छाया आजी ची असते. मी तिथे आत गेले तर छाया आजी एका पलंगावर झोपल्या होत्या. मी त्यांची विचारपूस केली. मग आम्ही सगळे गावात बाहेर कुठेतरी भटकायला गेलो. संध्याकाळी परत आलो आणि छाया आजीच्या खोलीत मी गेले तर दिसलं की त्या पलंगावर छाया आजी नसून एक तान्हं मूल खेळत होतं. तेव्हा गंमत म्हणून ते सोडून दिलं आणि काही विचार केला नाही त्यावर.

मागच्या वर्षी मी प्रेग्नंट असताना मला ३-४ थ्या महिन्यात असं स्वप्न पडलं की माझ्या माहेरच्या आणि सासरच्या फॅमिलीतले सगळे पितर मला भेटायला आलेत. अंधारातून छाया आजी पुढे आल्या आणि माझं बोट धरून मला कुठेतरी घेऊन जाऊ लागल्या. मला म्हणाल्या की "बघ तुला भेटायला कोण कोण आलंय" आणि पाहिलं तर सगळे पितर एका मागून एक फिरत्या रंगमंचावरून पुढे सरकत होते. मी तर कुणालाच ओळखलं नाही. पण काही धोतर वगैरे नेसलेले पुरुष पण होते असं अंधुकसं आठवतंय. मी आश्चर्यचकीत झाल्याचे पाहून छाया आजी पुढे म्हणाल्या की "अगं तुला बाळ होणारे ना, म्हणून सर्वजण तुला आणि बाळाला आशीर्वाद द्यायला आलेत." मी सगळ्यांना नमस्कार केला.

माझी delivery ची date डॉक्टरांनी ७ ऑक्ट २००९ दिली होती. पण ८व्या महिन्यातच इतका त्रास होऊ लागला की काही काँप्लिकेशन्स मुळे ९ वा महिना लागल्या लागल्या तारिख ठरवून सीझर करावे लागले. योगायोगाने माझ्या तेव्हाच्या ग्रहमानाला सूट होणारी तारीख निघाली - ११ सप्टें. २००९ - जी पितृपंधरवड्यातली होती.

माझं बाळंतपण माहेरी झालं. तान्ह्या बाळाचे जे काही त्रास असतात नवीन नवीन सगळं असताना ते निसर्गनियमाप्रमाणे सगळं झालं. रात्रभर झोपायचा नाही. मांडीवर घेऊन रात्रभर जागावं लागायचं. पण मॅनेजेबल होतं. बाळ सव्वा महिन्याचं झाल्यावर बारसं होऊन (राजस नाव ठेवलं) सासरी आल्यानंतर मात्र कहर झाला. दररोज रात्री राजस इतका रडायचा की बास रे बास. पोट दुखत असेल, ह्यांव होत असेल, त्यांव होत असेल असे वाटून वेगवेगळे उपाय करायचो पण थांबायचाच नाही. फक्त माझे साबुच त्याला शांत करु शकायचे. मी आई असूनही हेल्पलेस झाले होत्ये अगदी Sad साबु त्याला हाताचा पाळणा करून झुलवायचे तेव्हाच झोपायचा. खूपच किरकिर करायचा.

आमची बाळाला आंघोळ घालणारी बाई मला एकदा म्हणाली की "अगं, तुझ्या पोटी तुझ्या आजेसासुबाईच आल्यात बघ." त्या असं म्हटल्यावर मला वरची सर्व स्वप्ने आणि राजसचा पितृपंधरवड्यातला जन्म हे एकदम रीलेट झालं. असं म्हणतात की पितर बाळाच्या रुपाने घरात आले असतील तर ते बाळ खूप रडतं. मग त्या बाळाचं त्या पितरावरून काहीतरी नाव ठेवायचं म्हणे. आम्हाला से सगळं नवीनच होतं. पण ती वेळच अशी असते की तुम्ही डीनाय पण नाही करु शकत. मग त्या बाईनेच सांगितल्या प्रमाणे आम्ही एक चांगला दिवस बघून घरातल्या देव्हार्‍यासमोर बसून राजसचे दुसरे नाव छायाराम ठेवले. (मोदकच्या आजोबांचे [आप्पा] नाव शिवराम आहे. छाया आणि शिवराम वरून छायाराम हे नाव माझ्या आप्पांनीच सूचविले.) आप्पांसकट सगळ्यांनी बाळाचे पाय धरून पुढील शब्द उच्चारले "छाया आजी, आमच्याकडून काही सेवा करून घ्यायची राहिली असल्याने जर का तुम्ही परत आल्या असाल तर आम्ही ती आनंदाने करू." आणि त्या रात्रीपासून खरंच राजस शहाण्यासारखं झोपू लागला. त्या नंतर एकदाही त्याने रात्री मला जागवलेले नाही. शिवाय त्याची किरकिर बंद झाली आणि तब्येतही सुधारू लागली. त्या आंघोळीच्या बाईंच्या म्हणण्याप्रमाणे मी कोण आहे ते तुमच्या पर्यंत पोचण्यासाठीच बाळ रडायचं म्हणे. आता त्याला ओळखलंय ना म्हणून ते शांत आहे. विश्वास ठेवायला कठिण वाटेल कदाचित तुम्हाला. पण एकूण एक शब्द खरा आहे मी सांगितलेला.

and u know what, छायाराम नावाने हाक मारली की राजस छान response देतो आणि आपांबरोबरही छान गट्टी आहे त्याची. Happy आजींचा माझ्या साबुंवर खूप जीव होता आणि आजेसासर्‍यांना कायम माझ्या साबु आणि साबांनी सांभाळलंय त्यामुळे आजी मोदकच्या काकाच्या घरी न जाता (माझी चुलत जाऊ माझ्या ४-५ महिने आधी बाळंत झाली होती.) आमच्या घरात आल्या असं माझ्या साबांना वाटतं. Happy

(जरा लांबलचक झालीये ही पोस्ट, पण खूप घटना आणि गोष्टी आश्चर्यकारकरीत्या interlinked आहेत म्हणून खुलासेवार सांगितले. या पोस्ट चा हेतू अंधश्रद्धा पसरविणे हा नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. आलेला अनुभव फारच विस्मयजनक आहे म्हणून शेअर केलाय.)

मलाही रोज स्वप्नं पडतात. आणि रोज लक्षात देखिल रहातात. झोपुन उठले की एखादा मूव्ही पाहुन आल्यासारखे वाटते अगदी Proud
बहुतेक वेळेला या स्वप्नांचा वास्तवाशी संबंध नसतो. म्हणजे नविनच कुठले तरी घर, जागा, अपरिचीत व्यक्ती किंवा अगदी दूरचे नातेवाईक काहीही असू शकते. बर्‍याचदा मी कधीही न ऐकलेली गाणी ऐकते आणि उठल्यावर फक्त चाल लक्षात रहाते. स्वप्नात एखाद्या बिल्डिंग वरून/ उंचावरून पडण्याचा अनुभव अगदी शहारे आणणारा असतो. भीतीदायक स्वप्नं पडले की डोळे उघडायला जाम भीती वाटते Sad
मनी वसे तेच स्वप्नी दिसे.>> अनुमोदन. काही खास घडले तर ते स्वप्नात आलेच म्हणून समजा. परिक्षा, रिझल्ट याचा तर धसकाच घेतला होता. नेहमी मला परिक्षेला उशीर झाला आहे किंवा मी हॉल टिकेट विसरले आहे किंवा माझा नंबरच मिळत नाहीय अशी भयाण स्वप्नं पडायची.
कधी कधी मात्र स्वप्नात कुणीतरी मला मारायचा प्रयत्न करत असते. मी जीव खाऊन पळते पण पाय जड होतात. मी मोठ्यांदा ओरडू पहाते पण आवाजच येत नाही. मी अगदी गळाठुन जाते. उठल्यावर दरारून घाम आलेला असतो. Sad नवरा म्हणतो की काही वयापर्यंत अशी स्वप्नं पडतात नंतर नाही पडणार. अजुन तरी काही फरक नाही.

पने, मला पण अशीच भयावह स्वप्ने पडलेली आहेत गं.

लग्नात नवरा बायको ने बसण्याची जी खुर्ची असते ना एकदा माझ्या घरात मी तशा खुर्चीत बसलेले आहे आणि ती खुर्ची अधांतरी उचलली जातेय आणि माझ्या डाव्या अंगाकडून खाली मग पुन्हा वर अशी गोलाकार ती फिरतेय आणि मी खाली डोकं वर पाय असं काहीतरी मध्येच लोंबकळतेय असलं काहीतरी भयाण. आणि मोदक समोर दिसतोय म्हणून त्याला हाक मारू पाहते पण तोंडातून शब्दच फुटत नाही. अगदी ते भूत पिक्चर मध्ये ती भूतीण बेडरूमच्या दाराशी उभी पाहून उर्मिला ची जी हालत होते ना तसे काहीतरी. दातखीळ बसल्या सारखे. :-०

स्वप्नात एखाद्या बिल्डिंग वरून/ उंचावरून पडण्याचा अनुभव अगदी शहारे आणणारा असतो.
कधी कधी मात्र स्वप्नात कुणीतरी मला मारायचा प्रयत्न करत असते. मी जीव खाऊन पळते पण पाय जड होतात. मी मोठ्यांदा ओरडू पहाते पण आवाजच येत नाही. मी अगदी गळाठुन जाते.
>> उंचीवरून पडणे, पळण्याचा प्रयत्न करतोय पण पळताच येत नाहीत ही स्वप्न कॉमन आहेत.
ह्याची मुळं आपल्या उत्क्रांतीकडे बोट दाखवतात. एकपेशीय प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास आपल्या आत कोरलेला आहे. रानावनात रहात असताना झोपेत झाडावरून पडण्याचं भय - आपल्या आत कोरलेलं आहे.
नव्यानं जन्मलेल्या बबूनला दोनच गोष्टींची भिती वाटते - उंचीवरून पडण्याची आणि सापाची - अनुभवाशिवाय हे कसं शक्य आहे? उत्तर आहे की त्याच्या जीन्सवर ते कोरलेलं आहे.. अगदी तसच जेव्हा डायनॉसोर्सचं पृथ्वीवर राज्य होतं, आणि आपण उत्क्रांत होत असलेले सस्तन प्राणी जीव घेऊन घाबरून त्यांच्यापासून पळायचो - किंवा नंतरही जंगलात रहातानाही इतर सस्तन प्राण्यांपासून पळत रहायला लागायचं- त्या भितीचं आपल्या पेशींवर कोरलं जाणं हे अशा पाठलागवाल्या स्वप्नांचं मूळ आहे.

आणखीनही बरच आहे ह्या विषयावर लिहिण्यासारखं.. नंतर कधीतरी लिहेन..

नानबा, संध्याकाळी कातरवेळी अशीच भितीमिश्रीत हुरहुर वाटते कधीकधी.... त्यामागे हीच थियरी आहे असं वाटतं.... पिढ्यानपिढ्या आपल्या जनुकात झिरपत आलेली असते ती भिती... कधीकधी स्वप्नांमधून दिसते, कधी कधी वास्तवात जाणवते........

वा वा खूप छान प्रतिसाद मिळाले !!

आता माझ्या मनाच्या अगदी खोलवर कप्प्यात जपुन ठेवलेले माझे सर्वात प्रिय स्वप्न शेयर करतो

हे स्वप्न जेव्हा मी दिल्ली ला होतो कॉलेजला तेव्हाचं . टीव्ही रूम जणु माझ्याच नावावर होती , बेयर ग्रील चं म्यॅन व्हर्सेस वाईल्ड चा अ‍ॅपिसॉड : त्या दिवशी बेयर ग्रील ला जंगलात अस्वले दिसतात असा काही होता त्या रात्रीचं स्वप्न :

" बेयर ग्रील ज्या जंगलात चाललाय तितेच मी चाललोय एकटाच ... समोरुन ५-६ अस्वले चललीत , त्यांनी मला पाहिले नाहीये , पण मी मात्र जाम घाबरलो अन त्यांच्यावर गोळी बार केला , त्यांचं लक्ष माझ्या कडे गेलं , ते मला प़कडायला मागे लागले , आता अजुन १५-१६ अस्वले त्यांच्या बरोबर आहेत !!! मी जीवाच्या आकांताने पळतोय ...ते पाठलाग करत आहेत ! शेवटी त्यांनी मला पकडलेच ... मी जाम घाबरलो चांगलीच टरकली ....पण त्या अस्वलांनी मला मारले नाही तर उचलुन कोठेतरी घेवुन गेले ...आता मी एका त्रीकोणी मंचावर उभा आहे त्या मंचाच्या सर्व बाजुला अस्वलेच अस्वले आहेत १०० - २०० --१००० खूप ..... त्या मंचाच्या तीन कोपर्‍यावर तीन खुर्च्या आहेत त्यातल्या एका खुर्चीवर एक सर्वात मोठ्ठं अस्वल बसलयं , दुसर्‍या खुर्चीवर एक भलं मोठ्ठं माकड बसलयं , अन तिसर्‍या खुर्चीवर कोण तरी माणसा सारखं आहे ...पण माणुस नकीच नाहीये ...आता हे तीघे माझा निर्णय करणार आहेत ..मी चांगलाच घाबरलोय ... गोल गोल फिरुन त्या तिघांकडे पाहतोय ....अन तेव्हा
.
.
.
मी जिथे उभा आहे तिथे प्रचंड प्रकाश निर्माण झाला ... आता मला कळालं ... समोरचं ते अस्वल " जांबुवंत" आहे, माकड " मारुतीराया" आहे , अन तिसरा " बिभीषण " आहे ...
.
.
अन आता मला मीच दिसत नाहीये .... माझ्या जागेवर कोदंडधारी रामाची मुर्ती आहे .... सज्जनगडावरची !!! "

( लिहिताना परत एकदा रोमांच आले :आनंद:

पनूला १००० मोदक..परिक्षेची आणि मला मारण्याची स्वप्नं मलाही आगदी हुबेहुब अशीच पडायची!! आणि मग एकटीने रुम मधे झोपणं अशक्यच! अजुनही हा प्रकार चालुच आहे!

केव्हड मोठ स्वप्न.. क्रमशः अस्त क्काय ?>>
परेश, हास्यास्पद वाटेल, पण माझी स्वप्नं खरंच क्रमशः असतात. मधेच जाग आली, तर पून्हा स्वप्नं कंटिन्यू होते. दुपारचे स्वप्नं रात्री पूर्ण होते.
मला झोप येते म्हणजेच कुठेतरी स्वप्नं पडणे सुरू झालेले असते. अगदी बसमध्ये १० मिनिट जरी डुलकी लागली तरी स्वप्नं हमखास पडतेच.
नवर्‍याला विचारले तर स्वप्नं पडत नाहीत म्हणतात. त्याना विचारले होते, मग तुम्हाला झोप लागल्यावर फक्त रंगीत्/ब्लॅक & व्हाईट पडदा दिसतो का म्हणून. Proud

मला तरी बर्‍याचदा फार विचित्र स्वप्न पडतात अन ती डेटेल्ड लक्षात ही रहातात >> सेम पिंच...

मला तर रंगीत स्वप्ने पडतात.

स्वप्न १. मी झोपलेय, अचानक कशामुळेतरी जाग येते. किलकिल्या डोळ्यांना एक पांढरट धुसर कवटीचा आकार दिसतो, मी घाबरून उठते, तो आकार आता माझ्या मागे लागलाय. मी त्याला चकवत घरभर पळतेय. धावता धावता घड्याळाकडे नजर टाकते. मनातल्या मनात पुटपुटते, सकाळ व्हायला थोडाच अवधी आहे, तोपर्यंत मला माझं रक्षण करायचं आहे... मी धावत घराबाहेरच्या गॅलरीत जाते.. आणि.. आता कुठे पळणार? ती कवटी माझ्या अगदी जवळ मी घाबरून स्तब्ध! तेवढ्यात ती अधिक धूसर होऊ लागते जणू वितळतेय. मी मागे वळून बघते... माझ्या पसरलेल्या दोन्ही हातांपेक्षाही ज्याचा व्यास खूप जास्त होईल असा लालभडाक सूर्य अ‍ॅनिमेटेड मूव्हीसारखा हळूहळू उगवतोय. मी पटकन त्याला नमस्कार करते. (लहानपणी २ वेळा पडलेलं हे स्वप्न. घोस्ट मूव्हीज जास्त बघण्याचे प्रताप :()

स्वप्न २. आम्ही १ गेम खेळत होतो की खरं होतं कोणास ठाऊक पण आमच्या मागे कोणीतरी माणसे लागलेत. आमच्या गटात २ मूली, २ मुले आहेत (मी सोडून बाकीचे माहीत नाहीत). आमच्या मागे लागलेल्या (बहुदा गुंड- हेही अनोळखी) टीममध्ये ४ जणं - ३ मुले १ मुलगी आहे. आम्ही एका अर्धवट बांधकाम झालेल्या बिल्डींगमधे ही पकडापकडी खेळतोय(!) त्या अर्धवट बांधकाम झालेल्या मोडक्या ठिसूळ भुसभुशीत पायर्‍या... धावताना कोपरे ढासळ्ताहेत त्यांचे... भिंतींचा आणि परीसरातील ओला गारठा, कुबट ओला वासही स्पष्ट जाणवतोय.. जीवाच्या आकांताने आम्ही धावतोय. आमच्यातील कोणतरी पकडलं गेलंय... आणि मला त्यांच्यातील एकजण पकडायला झेपावला आणि... मी जागी झाले. ही पाठलागाची स्वप्ने नेहमीच पडतात. जागा फक्त बदललेल्या असतात. एकच समाधान, मी कधी सापडत नाही अपोझिट पार्टीला Happy

स्वप्न ३. साप तर कित्येकदा येतात स्वप्नात. (मला फोबीया आहे म्हणून असेल कदाचित! ) नुकतंच पडलेलं स्वप्न. माझी १ रूमपार्टनर मदुराईला गेलेय (खरोखर, स्वप्नात नाही). ती तिथून परत आली (स्वप्न सुरू झालं) तिने माझ्यासाठी एका पांढर्‍या प्लास्टीकच्या पिशवीत मनगटाच्या जाडीचा हिरवागार साप आणलाय. त्याचं डिटेलिंगपण दिसतेय. खवल्यांची गिळ्गिळीत चमक, नाकपुड्याची ओलसर भोकं आणि काळसर चॉकलेटी लपकन बहेर येणारी दुहेरी जिभ. कोचावर ठेवलेय ती पिशवी. आतलं वेटोळं वळवळतेय...पिशवी कुरकुरतेय. मी घाबरून चिडून तिला म्हटलं हे घाणेरडं गिफ्ट देतात का? ती त्या वेटोळ्याकडे पाहत म्हणाली, असं काय करतेस कित्ती cute आहे तो! (:अओ: !!) तेवढ्यात माझ्या दुसर्‍या रूमपार्टनरची आई आली आणि म्हणाली हे काय? आता याचं (त्या वेटोळ्याचं) भाडं कोण भरणार? (कप्पाळ!) काहीही अर्थहीन स्वप्न! Happy

मी दचकून जागी झाले...

अजून सांगेन काही...

Pages