ट्रिप स्वतंत्र की ट्रॅव्हल कंपनीबरोबर करावी?

Submitted by uma27 on 22 July, 2008 - 20:39

इथे कुणाला अमेरिकेत केसरि किंवा तत्सम tours चा अनुभव आहे का? माझे आई बाबा येणार आहेत पण आम्हाला त्यान्न Niagara , NY , Washington वगेरे दाखवायला जायला काही कारणाने जमेल असे वाटत नाही. तर त्यांन्ना एकटे जाउ देणे चांगले कि travel company बरोबर पाठवावे ? NY मधे कुणी देशीने असा business सुरु केला आहे का ? just curious.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगास मधे किमान २ नाइट्स हव्यात. ग्रँड कॅनयन ला पण २ दिवस . आणि वेगासहून एल एला ड्राइव्ह करून जाता येतं सहज. (४ तास अहे वाटते सधारण) पुन्हा सॅन फ्रान्सिस्को, तिथुन उलट पुन्हा एल ए असं करण्यापेक्षा ते बरं.
एल ए ला २ किंवा ३ दिवस लागतात. तिथून सॅन डिअ‍ॅगो पण जवळ आहे तसं.बाकी मस्ट सी मधे सॅन फ्रान्सिस्कोबरोबर सिकोया, योसेमिटी, हे आहे , त्यानन्तर नापा- केलिस्टोगा, लेक टाहो हे आहेत. वेळ कमी असेल तर लेक टाहो कॅन्सल करू शकता. इथे लेक जॉर्ज वगैरे पाहिलं असेल तर काही वेगळा अनुभव नाही. अर्थात हे माझं मत Happy नापा पण तुमच्या आवडीवर आहे. द्राक्षाच्या बागा, वायनरी इ. इतर कुठे पाहिलं असेल तर तेही ऑप्शन ला टाका!

वेगास - दुपारी तिथे पोचून आराम
रात्री बाहेर (मुलं असतील तर १२ पर्यंत मुलांसोबत नंतर एकटेच सोबत निदान ५०० डॉलर्स)
सकाळी पाच - सहाला झोपून दुपारी उठून १-२ वाजता हुवर डॅम क्डे प्रयाण. तीन-चार तासांनी परत वेगासला वापस. रात्री ९ वाजताचा ब्लू मेन शो. रात्र परत तशीच. Happy ह्या झाल्या निदान दोन रात्री. तिसरी-चौथी ऑप्शन.
ग्रँड कॅनयन ला पण २ दिवस देता आले नाही तर निदान एक तरी.

खुद्द फ्रिस्को मध्ये एक दिवस बास. गोल्डन गेटला एक चक्कर मारली की बास. फिशरमेन मार्केट, क्रुकेड स्ट्रीट इ ला उरलेला दिवस. Happy तिथून एल ए. थिम पार्क मध्ये जाणार नसाल तर डिएगो ला जाच. योसेमिटी जबरी आहे. नापाला जर वाईन पिणारे नसाल तर ऑप्शनला टाका. मी जाउन काही फार एन्जॉय केले नाही, पण वायनरी कधीच बघीतली नसेल तर जा.

मैत्रेयी, केदार धन्यवाद.

लालु,
मला माहिती नाही म्हणुन इथे पोस्ट केले आहे. माहिती असती तर इथे लिहिले नसते.

धन्यवाद.

खुद्द फ्रिस्को मध्ये एक दिवस बास. >>>>> कैतरीच !.. GG ठिक ठाकच .. पण फिशरमेन मार्केट, क्रुकेड स्ट्रीट, मुईर वुड्स, अलकटराज, चायना टाऊन, मिस्टरी स्पॉट, १७ मैल ड्राईव्ह ह्या सगळ्यासाठी किमान २ पाहिजेतच..

GC ला कँपिग करा.. संध्याकाळी पोचून दुसर्‍या दिवशी दुपारी निघायचं म्हणजे सनराईज आणि सनसेट दोन्ही बघता येतं... भरपूर फोटो काढा आणि तिथे... Happy

वेगास !! इथे ही २ नाईट्स पाहिजेत.. सर्क डि सोलेस (की असाच काहितरी.. मला उच्चार आठवत नाहीये) चा शो पण बघा...

LA बोर आहे.. SF हून आल्यावर तर आणखिनच टुकार वाटेल... त्यामूळे थिम पार्क मधे जायचं नसेल तर स्किप माडी... !!

डिएगो बेस्ट.. तिथे जाच..

सॅन फ्रॅन्सिस्को मधे गोल्डन गेट, क्रुकेड स्ट्रीट्,पीअर ३९, सनसेट क्रुझ या गोष्टी एका दिवसात करायच्या म्हटल्या तर होऊ शकतील. पण अडम म्हणतोय तस मिस्ट्री स्पॉट,१७ माईल्स ड्राईव्ह, म्युर वूड्स /थोडा बिगसर ड्राईव्ह हे दुसर्‍या दिवशी जमेल.

'योसेमिटी' मात्र मस्ट, खूप सुंदर ठिकाण आहे. तुमच्या बरोबर जर लहान मूल नसेल, तर योसेमिटी ला बे एरियातून सकाळी लवकर निघून रात्री परत येता येइल. लहान मुले बरोबर असतील तर मात्र ती दमतात, आणी तिकडे फार चालत भटकता येत नाही, मग जमेल तेवढे कार ने फिरून, थोडं चालुन ब्रायडलवेल,योसेमीटी फॉल, हाफ डोम, सनसेट ई.बघता येइल. योसेमिटी ला अस्वलांच्या भितीमुळे खाण्याच्या गोष्टी फार बरोबर घेऊन फिरता येत नाही.
योसेमिटी वर अजून भरपुर लिहावं वाटतय Happy

धन्यवाद्..
म्हणजे मस्ट सी मधे
योसेमाइटी, गोल्डन गेट,
ग्रँड कॅनयन्..(यात वेस्ट पहायचे का साउथ रिम? काय फरक आहे दोघात)

सॅन फ्रांसिस्को/एल ए मधे तुम्ही सांगितलेल्या ठिकाणासाठी लोकल टुर्स असतात का?

असे वाटतेय
लास वेगास २ दिवस
सॅन फ्रान्सिस्को २ दिवस
एल ए(२ दिवस - १ हॉलिवुड वगैरे + १ दिवस डिस्नी )
पुरेसे होतील.

माहितीबद्दल खुप धन्यवाद.

यात वेस्ट पहायचे का साउथ रिम? >>>> फिनीक्स हून गेलं तर ती साऊथ रीम असते.. मी तिथेच गेलो होतो..
वेस्ट रिम ला तो स्कायवॉक आहे.. काचेचा पूल.. छान आहे असं ऐकलय.. पण खूप महाग आहे म्हणे.. आणि शिवाय तिथे कॅमेरा नेऊ देत नाहीत आपला.. ते काढतील तो फोटो काढून घ्यावे लागतात.. Uhoh

सॅन फ्रांसिस्को/एल ए मधे तुम्ही सांगितलेल्या ठिकाणासाठी लोकल टुर्स असतात का? >>>> हो शक्यतो असतात.. अलकटराज, क्रुज, मिस्टरी स्पॉट ह्या ठिकाणी तिकीटामधेच टूर असतात.. बाकीच्या ठिकाणी गरज नाही...

एल ए(२ दिवस - १ हॉलिवुड वगैरे + १ दिवस डिस्नी ) >>>>> LA चं universal आणि FL चं डिस्नी
मोठं आणि बेटर आहे (म्हणे..) त्यामूळे तुम्ही LA च्या universal ला जाऊन या.. ती साईट छान आहे डोंगरावर.. अर्थात मुलं असतील बरोबर तर डिस्नीच...

योसेमिटी ला गेलात तर दिवसा गरम आणि रात्री भरपूर थंडी असते. आणि एक रात्र तरी तिथल्या तंबूत रहावेच....
लास् वेगासहून साऊथ रिमला जायला कमीत कमी ६ तास लागतात. सकाळी जाऊन संध्याकाळी परत म्हणजे भोज्याला हात लाऊन येण्यासारखे होईल. थोडा वेळ काढून ती दॄश्ये टिपण्यात मजा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात Log Cabin रात्री सुध्दा गरम वाटल्या. मग दुसर्‍या दिवशी बाहेर हॉटेलमधे राहिलो होतो....

विनय

तुम्ही म्हणता तोच कार्यक्रम अधिक San Diego आम्ही 1७ दिवस केले होते आणि तरी परतल्यावर फारच धावपळ झाली असे वाटत होते. मुले बाळे असतील एका दिवसात GC, एका दिवसात वेगास अशी धाडसे करण्यापेक्षा काही गोष्टी स्किप करून मोजक्याच बघा असे मी म्हणेन.

एले मधे युनिव्हर्सल, हॉलिवूड(चायनिज थिएटर्,कोडॅक थिएटर, वॉक ऑफ फेम वगैरे) आणि डिस्ने आहेच पाहायला.. नुसतं फिरायलाही खूप सुंदर जागा आहेत.. पण त्यामुळेच बाहेरून कमी वेळासाठी येणार्‍याला जागा सुचवणे अवघड होते.. त्यांचे मेन अ‍ॅट्रॅक्शन असते थीम पार्क्स.. असो..
मला असे वाटते की हॉलिवूडबरोबरच रोडिओ ड्राईव्ह, बेव्हर्ली हिल्स हा एरिआ पाहून घ्या..
LAX च्या जवळचेच हॉटेल पहा, म्हणजे थीम पार्क्स, हॉलिवूड जवळ पडते तसेच बर्‍याच टूर्स त्याच भागातून निघतात.. गोटूबस किंवा अजुनही असतील, त्यांच्या टूर्स घ्या सरळ.. पब्लिक ट्रान्स्पोर्ट 'बेकार' असल्याने कार लागेलच.. आणि गर्दीमुळे वेळ आणि डोकं कामातून जाईल.. Happy
getty center सुद्धा चांगले आहे.. तिकिट खूप कमी आहे.. शनीवारी उशीरापर्यंत उघडे असते..
ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी, आहे.. तिथेच एले झू आहे.. ठीक ठाक आहे ते..

सॅन फ्रान्सिस्कोवरून येताना वाटेत वेळ असेल तर सॅन्ता बार्बरा मस्ट! निवांत संध्याकाळ घालवायला मस्त जागा ! शिवाय व्हेनिस बीच, झूमा बीच, मालिबू आहेच...
तसेच एसेफो - एले च्या वाटेत हर्स्ट कॅसल आहे.. तो ही पाहण्यासारखा..

जमले तर एसेफो - एले पॅसिफीक वन वरूनच या ! आयुष्यभर विसरणार नाहीत तुम्ही तो ड्राईव्ह ! Happy

सॅन डिएगोला -> सीवर्ल्ड तर असेलच.. त्याला एक दिवस लागेल.. शिवाय तिथे वाईल्ड पार्क, झू वगैरे आहे.. त्यामुळे तिथे २ दिवस तरी लागतीलच..

असो.. काही मदत लागली तर सांगा.. मी एले डाऊनटाऊन पासून तासावर राहते..

मनस्मी साउथ रिम GC ला जायचे तर एका पूर्ण दिवस दिला तर बरे पडते. ६ + ६ तासांचा प्रवासाचा वेळ सोडून. वेस्ट रिम जवळ आहे वेगास पासून. (साधारण २ ते २.५ तास) त्यामूळे कॅनियन, वाटेत हुवर डॅम बघता येईल.

मंडळी,

सॅन फ्रांसिस्को, एल ए आणि लास वेगास इथे कुठल्या एरीयात हॉटेल घेणे सोयीस्कर..
(मी ड्राईव करणार नाही आहे..सो पब्लिक ट्रान्सपोर्ट/कॅब च्या द्रूष्टीने)
उदा एल ए मधे लॅक्स च्या जवळ घ्यावे का डिस्नी च्या जवळ घ्यावे.

(आमचा कार्यक्रम ३ दिवस लास वेगास, ३ दिवस एल ए (डिस्नी, युनिवर्सल आणि हॉलिवूड) आणि २ दिवस सॅन फ्रान्सिस्को नी परत असा ठरला आहे)

धन्यवाद.

येत्या मे मधे लेह्-लडाख किंवा उत्तर्-पुर्वं यातलं एक काहीतरी करायचा विचार आहे. स्वतंत्र करावं की कुणाबरोबर?
आराधना टुर्स वाले उत्तर-पुर्वं करवतात.
कुणाला अनुभव आहे का?

गेल्या वर्शि आम्हि थायलनन्ड ला स्वतन्त्र गेलो होतो. ५ दिवसाची ट्रिप आखुन घेतली होती. खुपच मस्त झाली. सगळे बघुन झाले. आणी कमी खर्चात .
अर्थात सगली भावन्ड गेलो असती तर जास्त मज्जा आली असती. पण सग्ल्याना खर्च करणे जमतेच असे नाही.
तरी ट्रिप चान्गली झाली.छोटा सा ब्रेक.

Pages