ट्रिप स्वतंत्र की ट्रॅव्हल कंपनीबरोबर करावी?

Submitted by uma27 on 22 July, 2008 - 20:39

इथे कुणाला अमेरिकेत केसरि किंवा तत्सम tours चा अनुभव आहे का? माझे आई बाबा येणार आहेत पण आम्हाला त्यान्न Niagara , NY , Washington वगेरे दाखवायला जायला काही कारणाने जमेल असे वाटत नाही. तर त्यांन्ना एकटे जाउ देणे चांगले कि travel company बरोबर पाठवावे ? NY मधे कुणी देशीने असा business सुरु केला आहे का ? just curious.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच माझ्या एका मैत्रीणीचे आई वडील जावून आले. NY niagara, washington DC CA अशी ट्रीप करून.
आधी ते केसरीच बूक करणार होते पण शेवटी इथून केली.

niagara 2 days by gotobus run by chinese company ,
washington DC for 3 days again by gotobus ,
CA- SFO,LA,Las Vegas-Grand canyon,yosemite -12 days by gotobus ,

फक्त एकून एवढेच कळले की its like regime that you need to follow, get up early,leave at 6:30 AM, they dont wait if you are late. again, whole day is on schedule जसे मजा करण्याच्या एवजी एकदम वेळापत्रक सांभाळत करावे लागते.

बाकी Hotels वगैरे चांगली असतात. बसेस ने लोकली फिरवतात. खाण्याचे पैसे आपण नी LA पर्यन्त पण आपणच खर्च करायचा CA trip साठी.
जर आईवडील खूप hectic schduele सहन नाही करु शकत तर काही फायदा नाही कारण दगदगच ज्यास्त होईल.

कमी वेळात जास्त बघायचे असेल तर Travel Company योग्य. पण सगळ्या कंपन्यांमधे वेळेत उठणे वगैरे करावेच लागते. तसेच काही वेळा तुमच्या रहाण्याच्या ठिकाणाहून दूर जायचे असेल तर दूर राहून सगळे नीट आखता येतेच असे नाही. तेंव्हाही Travel Company चा पर्याय योग्य ठरतो. तुमच्या कडे भरपूर वेळ असेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वतः (किंवा जी व्यक्ती अमेरिकेत काही दिवस राहिली आहे) बरोबर जाणार असाल तरच स्वतः नियोजन करावे. सगळ्याच आईबाबांना इथल्या लोकांचा Accent कळून आपले आपण पटपट पाहता येईल असे नाही.

माझ्या सासूसासर्‍यांना बोस्टनच्या Sunshine Travels चांगला अनुभव आहे. आजुबाजुला सतत चायनीज ऐकायची तयारी असेल तर विश्वास बसणार नाही इतक्या कमी पैशात चांगल्या हॉटेलमधे उत्तम सोय केली होती. जेवणासाठीही चायनीज रेस्तराँसमोर थांबवतात. खाण्याची सोय आपण करायची असते. त्या दोघांनीच Washington DC, New York, Philadelphia ची टूर केली होती.

अजून एक उपाय म्हणजे दोन्हींचे एकत्रीकरण. तुमच्या गावापासून जिथे जायचे तिथला प्रवास, त्या गावातल्या Downtown मधले हॉटेल आपण स्वतः नोंदणी करायचे. पण त्या गावात उतरल्यावर तिथली स्थानिक प्रवास कंपनी एका दिवसाकरता (Sightseeing Tours) घ्यायची.
तुम्ही स्वतः जाणार असलात तरी नवीन शहरात कार भाड्याने घेणे पूर्ण टाळा. कारण Parking शोधण्यातच तुमचा वेळ जाऊन पहायला वेळ रहाणार नाही. प्रवासी कंपन्यांमूळे प्रेक्षणीय स्थळाच्या अगदी जवळ पायी जाता येते.

मनुस्विनि आणि अजय , धन्यवाद. मलाही अजुन काही नवीन महिती मिळाली तर टाकेन इथे.

मी ऐकलेले अनुभव (लासन टूर्स बद्दल) साधारण वरती मनुस्विनी, अजय यांनी लिहील्याप्रमाणेच आहेत. हॉटेल्स वगैरे चांगली होती, पण खाण्याचे प्रॉब्लेम्स आले कारण शाकाहारी फारसे मिळत नाही. चायनीज लोक जास्त असतात. नुकतेच भारतातून आलेले कोणी असेल तर त्यांना उच्चार वगैरे कळायला जड जाते. पण एकूण सर्व्हिस चांगली असलेली ऐकली.

नायगाराला अमेरिकेच्या बाजूच्या धबधब्याजवळच हॉटेल्स आहेत, तेथील बहुधा एक Travelodge भारतीय माणूसच चालवतो व (तेथे न राहता दुसरीकडे राहिले तरी) तेथेच एक भारतीय रेस्टॉ. पण आहे. बफेलो विमानतळावरून किंवा रेल्वे स्टेशन वरून (न्यू यॉर्क वरून आम्ही Amtrak ने गेलो होतो) कॅब घेऊन जातात येते व हॉटेल वरून नायगारा पाहायला चालत जाता येते (अमेरिकन बाजू). अर्थात किती चालणे सहज शक्य आहे त्यावर आहे. आणि आई बाबा वगैरे किती सहजपणे हे स्वतंत्ररित्या करू शकतात त्यावरही अवलंबून आहे.

नमस्कार.
मी १५/०८ आनि १६/८ ला.. पुन्याहुन गानगापुर , अक्कल्कोट , तुळजापुर , आनि पंढरपुर ला जायचे आहे..
गाडी ठरवली आहे.. मला या सन्धर्बात माहीती हवि आहे..
प्रवास कसा सुरु करावा.. मुक्कम कोठे करावा.. वैगेरे...

नमस्कार,

आम्ही (मी, पत्नी, मुलगा(१.५व्),मुलगी (४व)) florida, west coast जायचा विचार करतोय.(या / पुढच्या वर्षी)

florida - universal, disney
west coast- california, las vegas, grand canyon etc

मुलांची वये लक्षात घेता..कसे प्लॅन करावे? (स्वतः का गोटुबस तर्फे)..
दोन्हीचे फायदे/तोटे काय आहेत? (ट्रॅवल कंपनी चा एक तोटा..वेळेचे काटेकोर पालन करावे लागते, मुलांना घेउन ओढाताण होईल).
तुम्ही तुमचे अनुभव सांगाल का? (सल्ले, नवीन कल्पना सगळ्यांचे स्वागत)

धन्यवाद!

मी फ्लोरिडाचं सांगु शकते.
दीड आणि चार वर्षांची मुलं घेऊन ट्रॅव्हल कंपनी जरा गैरसोयीची आहे. स्वतंत्र ट्रिप काढली तर आपल्या वेळापत्रकानुसार (किंवा शिवाय Happy ) मजेत फिरता येतं. उन्हं वाढलीत. फिरून थकवा येतो लवकरच. तेव्हा पार्क हॉपर किंवा मल्टिपल एन्ट्री पास काढला आणि जवळपासच्या हॉटेलात उतरलं तर खूप सोयीचं पडतं. गर्दी, प्रत्येक राइडकरता भरपूर मोठ्या रांगा हे सगळं विचारात घेऊन एक टु सिटर स्ट्रोलर घ्यावं. पाणी, खायप्यायची सोय करून ठेवावी.
सकाळी ३-४ तास, दुपारी हॉटेलात आराम, संध्याकाळी पुन्हा येऊन फायरवर्क्स, उरलेल्या राइड्स असं बरं पडेल. इतक्या लहान मुलांसाठी युनिव्हर्सलला जरा कमी राइड्स आहेत. डिस्ने चं अ‍ॅनिमल किंगडम, मॅजिक किंगडम जास्त एन्जॉय करतात ह्या वयात मुलं.
इंटरनॅशन ड्राइव्हवरच्या 'अ‍ॅक्वाटिका' ह्या वॉटर्पारकला भेट द्या जमलं तर. खूप छान आहे असं ऐकलंय.

मृण्मयी,

तुम्ही लिहिलेय तसाच आम्ही विचार करतोय. emphasis on वेळापत्रकाशिवाय Happy

डिस्ने, युनिवर्सल वगैरे जवळजवळ आहेत का?(मी नेटवर शोधतोय पण कुणाचा firsthand experience
कळला तर आणखी चांगले.)४-५ दिवस पुरेसे होतील का?
या दोन्हीला जवळ असे कुठे पडेल?
हॉटेलमधुन शटल्स असतात का?

धन्यवाद परत एकदा.

डिस्ने, युनिवर्सल वगैरे जवळजवळ आहेत का? >> नाही..
हॉटेलमधुन शटल्स असतात का? >> बहुतेक हॉटेल्समधून असतात..

इंटरनॅशनल ड्राइव्ह पासून युनिवर्सल जवळ आहे. डिस्ने साठी तिथले रेसॉर्ट घेणे एकदम सोयीस्कर पडेल.

www.tripadvisor.com या साइटवर तुम्हाला खूप माहिती (first hand reviews, tips) मिळेल.

मला तरी ट्रॅव्हल कंपनी कडून जाणे फारसे पसंत नाही. कारणं बरीच आहेत... मला ड्राइव्ह करायला खूप आवडतं, US मध्ये इंटरनेटवरून खूप माहिती मिळते त्यामुळे प्लॅनिंग करणे खूप सोपे आहे, शिवाय स्वतःच्या इच्छेप्रमाणे फिरता येते. जर फक्त साइट सीइंग (प्रेक्षणीय/प्रख्यात जागांना नुसत टच करून यायचे असेल तर) करायचे असेल तर ट्रॅव्हल कंपनी बरी.

या दोन्हीला जवळ असे कुठे पडेल? >> दोन्हीकडे जाणार्‍या शटल्स मिळतील अशी हॉटेल्स माझ्या माहितीत नाहीयेत. त्यामुळे आम्ही २ दिवस International drive आणी २ दिवस डिस्नीजवळ असे हॉटेल बुक केले होते. गाडी घेतलीत तर तुम्हाला हवे तिथे रहाता येइल. पण आम्ही डिसेंबरात गेलो होतो तेव्हा गाडयांची भाडी बरीच होती.

४ जणांसाठी एखादा २ बेडरुम Fully furnished काँडो सुद्धा बुक करता येईल तुम्हाला. यामध्ये इबेवर बरिच डिल्स असतात कायम.

युनिव्हर्सलपासून डिस्ने आय-४ ने गेल्यास ७-८ मैलांपेक्षा दूर नाही.

सध्या फ्लोरिडात ८०-८३ जातय तापमान. ह्युमिडिटि पण फारशी नाही. तेव्हा बघा जमतंय का Happy . आय ड्राइव्हवर हॉटेल बघीतलंत अ‍ॅक्वाटिका तिथेच आहे. युनिव्हर्सल पण. आणि डिस्ने पण फार लांब नाही. सध्या हॉटेलचे रेट्स बरेच कमी आहेत असं ऐकलंय.

मनस्मी, वेगास आणि कॅनियन आत्ता एवढ्या एखाद्या महिन्यातच गेलात तर, नाहीतर मुलांना घेउन जाण्यासारखे नाही. प्रचंड गरम होते. त्यात वेगास मधे बर्‍याच ठिकाणी लहान मुलांना करण्यासारखे काही नाही (तशी काही ठिकाणे आहेत, पण त्या साठी आवर्जून वेगास ला जायची गरज नाही). जून जुलै मधे तर रात्री ११ वाजता रस्त्यावर उभे राहता येत नाही एवढी धग असते. आणि त्यात कॅसिनो मधे गेले की पुन्हा थंड.

कॅलिफोर्नियात कोठे? बे एरिया, लॉस एंजेलिस मधे स्वतःच्या गाडीने फिरणे सोयीचे. ठिकाणे लांब आहेत. किनार्‍याजवळ कोणत्याही सीझन ला चालेल.

धन्स नात्या, मृण्मयी आणि फारेंड..

आणखी काही प्रश्नः
१. कॅलि/वेगास मधे समर ऐवजी late fall or early winter or next jan..बरे पडेल?
२. LA मधे driving/parking न्यु यॉर्क सिटी सारखे आहे का? (मला Downtown मधे चालवायला/पार्किंग आवडत नाही).
२. फ्लॉरिडा मधे मे/जुन मधे बरे पडेल?
३. (फ्लॉरिडा)मला शक्यतो गाडी चालवणे टाळायचे आहे. (शटल आणि टॅक्सीस ने काम चालेल का? का टॅक्सी महाग पडेल?)
4. Baby seats टॅक्सी/रेंटल कार मधे देतात का इथुन न्यावी लागेल? (मी न्यु जर्सी मधे आहे).

धन्स परत एकदा..

१. कॅलि/वेगास मधे समर ऐवजी late fall or early winter or next jan..बरे पडेल?>> तु जर थंड हवेच्या ठिकाणी रहात असशील तर कधी पण हिवाळ्यात गरम ठिकाणी चेंज म्हणुन जाणे चांगले.

२. LA मधे driving/parking न्यु यॉर्क सिटी सारखे आहे का? (मला Downtown मधे चालवायला/पार्किंग आवडत नाही).>> तु जवळ पासच्या गावात राहुन मेट्रोने जाऊन येणे करु शकतेस.

4. Baby seats टॅक्सी/रेंटल कार मधे देतात का इथुन न्यावी लागेल? (मी न्यु जर्सी मधे आहे).>> आम्ही कॅलि/वेगास गेलो तेव्हा रेंटल कार वाल्यांकडे होते पण वेगळे चार्जेस लावतात. ८ दिवसाचा टुर असेल तर तिथे जाऊन नवीन घेणे परवडते.

>> ३. (फ्लॉरिडा)मला शक्यतो गाडी चालवणे टाळायचे आहे.
तुम्ही झक्कींच्या आणि माझ्या फ्लोरिडा भेटीचा वृत्तांत वाचलेला दिस्तोय. Happy

टॅक्सी घेणं महागात पडेल. त्यापेक्षा गाडी घेणं परवडेल. डिस्ने हॉटेलात उतरलात तर त्यांची शटल सर्व्हिस चांगली असते. पण त्यात काही गोच्या अश्या : हॉटेलला लागून असलेली त्यांची रेस्टॉरेन्ट्स रद्दी आणि महाग आहेत. बाहेर कुठे खायचं म्हंटलं तर मग टॅक्सीशिवाय पर्याय नाही. शटल फारतर डाउनटाउन डिस्ने ला आणेल.तेव्हा खायचे वांधे फार होतात स्वतःच्या गाडीशिवाय डिस्ने रिसोर्टात राहीलात तर.

फ्लोरिडामध्ये शक्यतो गाडी घेउच नका.. गाडीला पैसे तर जातीलच, पार्किंगला पण द्यावे लागतील कदाचीत.. शटल आणि टॅक्सी ने काम चालेल (पळेल)... जर ओरलँडॉ/नासा शिवाय अजून काही बघणार असाल (टँपा वगैरे) तर तेव्हापुरती रेंट करा... बेबी सीट्स मिळतात कार रेंटलवाल्यांकडे पण खूप महाग पडते.. बरोबर घेउन जावा.. फ्लाय करत असाल तर चेक्-इन करता येते..
आम्ही नासाला एक बस टूर घेउन गेलो होतो. बसवाले हॉटेलमध्ये घ्यायला आले होते. आम्ही इंटरनॅशनल ड्राइव्हवर होजो मध्ये राहिलो होतो.

शटल फारतर डाउनटाउन डिस्ने ला आणेल>> आम्हाला शटलने एप्कॉटजवळ सोडले होते तिथून ती छोटी ट्रेन घेतली होती.. फक्त संध्याकाळची शेवटच्या शटलची वेळ बघून घ्या...

कॅलि/वेगास मधे समर ऐवजी late fall or early winter or next jan..बरे पडेल? >> late fall would be better I guess.

>>शटल फारतर डाउनटाउन डिस्ने ला आणेल
हे मी खाण्याकरता, रेस्टॉरेन्ट्स शोधण्याकरता म्हंटलंय. बाकी डिस्ने शटल्स तर डिस्नेच्या सगळ्याच पार्कला ने आण करतात त्यांच्या स्वतःच्या हॉतेलांपासून.

आम्ही न्यु यॉर्कला असताना दोनदा फ्लोरिडाला भेट देऊन गेलो. एकदा गाडी रेंट करून, एकदा न करता. गाडी जवळ नसताना फार त्रास झाला. शिवाय टॅक्सी भरपूर महाग.

वेगास ला Daylight Savings बदलल्यानंतर एक दोन महिने सगळ्यात चांगले जाण्यासाठी. तेथे रात्र जितकी मोठी तितके चांगले. नाहीतर उन्हाळ्यात अंधार पडायची वाट बघावी लागते तेथील बाहेरचे शो पाहण्यासाठी Happy

Thanksgiving weekend सगळ्यात चांगला तेथे. नंतर थंडी वाढते.

छान माहिती..सर्वांचे आभार...

हे सगळे लक्षात ठेउन मग प्लॅन करता येइल.

आम्ही फ्लोरिडाला गेलो होतो मुलांना घेऊन तेंव्हा फक्त डिस्ने मधे राहिलो होतो . मुलं व्हायच्या आधी, आपापल्या आइ बाबांना घेउन व एकदा आम्ही दोघेच असे गेलो होतो. पाच वर्षांच्या आतली मुलं असतील तर युनिव्हर्सल मधे काही फारसं मिळणार नाही. तसंच स्पेस सेंटर पण बरंच त्यांच्या डोक्यावरूज जाईल ( त्यापेक्षा व्हर्जिनिया मधे जे नवीन एअर अ‍ॅन्ड स्पेस म्युझियम झालंय तिथे जाणं सोपं )

डिस्ने मधे राहिलात तर ते एअरपोर्ट पिकप अन ड्रॉप ऑफ पण करतात - आधी सांगावं लागतं.
किचनेट असलेल्या ठिकाणी रहाणं सोयीचं पडतं - घरुन पराठे, खिचडी साठी डाळ तांदूळ परतून असे नेता येतात. जवळपास प्रत्येक हॉटेलच्या जवळ दही, दूध, ब्रेड, अंडी मिळणार एक छोटसं दुकान असतं.
मुलांकरता पुडिंग वगैरे घरनं न्यायची, त्या दुकानात छोटे फ्लेवर्ड दह्याचे डब्बे मिळतात, फळं मिळतात.
शिवाय सगळ्या पार्कांमध्ये पीनट बटर जेली, मॅक अ‍ॅन्ड चीझ असले प्रकार मिळतात.

शटल ने ये जा केली तर पार्कच्या अगदी दारापाशी उतरायला मिळतं. पार्किंग लॉट मधे स्वतःची गाडी लावून पार्कच्या दारापाशी चालेपर्यंत इतकी लहान मुलं थकणार - अन त्यांचा स्ट्रोलर, खाणं पिणं , डायपर बॅग, कॅमेरा बॅग इत्यादीच्या ओझ्याने तुम्ही थकणार .

इतकी लहान मुलं असताना इतर मुलांच्या शाळा चालू असताना डिस्नेला जावं - त्यातल्यात्यात गर्दी जरा कमी असते.

लायब्ररी मधे ' हाउ टु सी डिस्ने फॉर चीप' अशी पुस्तकं मिळतील - त्याचा नीट अभ्यास करून मगच जावं. पुष्कळ फरक पडतो.

parking lot जवळून ticket window पर्यंत त्यांच्या trams असतात. त्यामुळे चालावं नाहि लागतं. जुन / जुलै मध्ये उन्हामुळये हालत खराब होते. कधीहि गेलात तरि कमीत कमी मुलांचे रेन जॅकेटस, स्ट्रोलर कव्हर वगैरे बरोबर ठेवावेत.

शोनू, इथे येऊन सगळ्यांचे सल्ले वाचले तरीही बरंचसं होमवर्क आटपेल. इतरत्र कुठे शोधायची गरजही रहायची नाही.;)

काल ८०-८२ तापमानाच्या बढाया मारल्या आणि आता नव्वदावर जातंय. Sad (त्यातून घराजवळ मोठ्ठी बुश फायर!)

आणखी एक महत्त्वाचं, युनिव्हर्सलला बेबी फॉर्म्युला आणि स्पेशल नीड्स चं अन्न सोडून काही नेऊन देत नाहीत असं ऐकलं. तेव्हा पार्कातलं दळभद्री खाणं नशिबी येणार. सध्या मुलांना फक्त डिस्ने आणि एखादा वॉटर पार्क दाखवला तर चालतंय का बघा.

शोनू म्हणते तसं केप कनाव्हरालचं स्पेस स्टेशन तर अगदीच रटाळ होतं इतक्या लहान मुलांना. त्यातून सगळीकडे काँक्रिट! गवत कमी. त्यामुळे तीथे मला तरी इतर ठिकाणांपेक्षा जास्तच गरम वाटतं. (तरी वर्षभराचे पास काढून का तडमडतो ते कळलं नाहीये.)

मुलांना घेऊन सेंट जॉन रिव्हरचा २ तासाचा क्रूज करून त्यांना मॅनिटी दाखवता येतील. गेटरलँडला पण मजा येते. स्वॉप्म मधल्या एअर्बोटराइड्स पण छान आहेत. मगरी अगदी जवळून बघायला मिळतात. Happy

आम्ही विचार करतोय फ्लॉरिडा ला डिस्नी मॅजिक किंगडम आणि अ‍ॅनिमल किंगडम आणि कॅलिफोर्निया ला जेव्हा जाउ तेव्हा युनिवर्सल करावे.
उगाच सगळे एकात करायला गेलो तर ओढाताण/फरफट होईल.

डिस्नी ची स्वतःची हॉटेल्स जरा महागडी आहेत का? त्याच्या जवळपासची हॉटेल्स असली तर फायदा/तोटा काय आहे?

हो जरा महाग आहेत. आजुबाजुला बरीच हॉटेल्स आहेत. तोटा हाच की गाडी भाड्याने घेणार नसाल तर टॅक्सीशिवाय पर्याय नाही. लोकल बस सर्विस (LINKS) जात नाही.
पण एकदा फोन करून विचारा. कदाचित चांगली डिल्स मिळत असतील. डिस्ने कोव्ह हा प्रकार चांगला आहे असं ऐकलंय.
तसंच टाइमशेअर ची घरं पण सध्या स्वस्त आहेत. गाडी भाड्याने घेणार असाल १० मैलांवर किस्सिमी ला २-३ बेडरुम्सचं मोठठं घर दिवसाला $७५-१०० ने मिळतं. अगदी सुसज्ज स्वयंपाकघर, वॉशर ड्रायर, जकुझी, स्विमिंग पूलसहीत. ते पण खूप परवडतं.

केप कनावरलहुन दोन-तीन दिवसाची क्रुझ पण करता येईल तुम्हाला. बहामाज ला वगैरे. जवळ जवळ $९९ प्रतिप्रवाशी इतकी कमी किंमतीतही होउ शकेल. (अर्थात बाकी खर्च असेल)

लहान मुलांसाठी नाही पण ज्या मोठ्यांना अवकाश संशोधन/अवकाश निरिक्षण या विषयात रस आहे त्यांनी एकदा तरि केनेडी स्पेस सेंटरला जावेच.. फारच मस्त आहे.

नमस्कार मंडळी,

या वेळेस ऑक्ट्-नोव्हेंबर कॅलिफोर्नियाला जायचा विचार आहे..(जुन २०१० मधे भारतात कायमचे परतण्यापुर्वी)

आम्हाला एकाने असे सुचवले आहे:
१. आधी लास वेगास ला जायचे तिथुन ग्रँड कॅनयन/हुवर डॅम ची एक दिवसाची ट्रिप करायची.
रात्री नाईट लाईफ बघुन दुसर्‍या दिवशी सॅन फ्रान्सिसको..
२. तिकडे दोन दिवस राहुन गोल्डन गेट इ बघुन लॉस अँजलीस (आणी काय बघण्यासारखे आहे सुचवा).
३. तिकडे युनिवर्सल, डिस्नी आणी हॉलिवूड इ बघुन परत..

हा प्लॅन ठीक वाटतो का? (वरील तिन्ही ठिकाणी बघायलाच हवे असे काय आहे? म्हणजे देसी लोक साधारण काय काय बघतात्..लेक टाहो ऐकलेय्..आणखी काय आहे) गोटु बस ची एक सहल आहे पण त्यांचे फार हेक्टीक असते..पहाटे सहा वाजता उठुन कुठे जाणे जमणार नाही).

मदतीबद्दल आभार.

वेगासचा प्लॅन फारच वेगवान आहे. Happy सगळे एका दिवसात? ग्रॅन्ड कॅनयन ची प्लेन राईड घेणार का? तरी हूवर आणि ते एका दिवसात होणार नाही. आणि वेगासला एकच रात्र? Happy

SF, लेक ताहो, योसेमिटी सगळे मिळून ४-५ दिवस.

तुमच्या एप्रिलच्या प्रश्नापासून पुढचे सगळे इथे हवे होते-
http://www.maayboli.com/node/7516 Happy

Pages