टॉप थ्री....

Submitted by हिम्सकूल on 21 July, 2008 - 08:02

एका माणसाकडे २५ घोडे असतात आणी त्याला त्यातील ३ सर्वात वेगवान घोडे निवडायचे असतात्..पण त्याच्याकडे फक्त ५ घोडे एका वेळी पळु शकतील असा रनिंग ट्रॅक असतो, आणी स्टॉप वॉच वगैरे काही नसते... तर त्याला ते तीन घोडे निवडायला कमीतकमी किती वेळा शर्यती घ्याव्या लागतील??
ह्या कोड्याचे उत्तर.. Ramchandrac ह्या आयडीला माहिती आहे.. त्यानी हे कोडे आज सिंहगड रोड बीबी वर विचारले होते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ठिक आहे रे, nobody is perfect
Yes.. n I am 'nobody'.. Happy
चला तर कूट प्रश्न आणि त्याचा काथ्याकूट संपला म्हणायचा..

matrix.jpg

पहिल्या पाच शर्यतीत पहिले पाच घोडे ठरतील. त्यामुळे चौथा व पाचवा column शर्यतीतून बाहेर.
सहावी शर्यत पहिल्या आलेल्या पाच घोड्यांत.
या शर्यतीत A(1.1) हा घोडा पहिला व A(5.1) हा घोडा पाचवा.
त्यामुळे चौथी व पाचवी row शर्यतीतून बाहेर.
आता आपल्याला तीनच घोडे निवडायचे आहेत. त्यापैकी A(1.1) हा पहिला आहे.
त्यामुळे A(2.3), A(3.2), A(3.3) हे घोडे आपोआप शर्यतीतून बाद.
सातवी शर्यत A(1.2), A(1.3), A(2.1), A(2.2), A(3.1) या चार घोड्यांत लावून त्यातील पहिले २ घोडे निवडायचे.
उत्तरः ७ शर्यती.

सातवी शर्यत A(1.2), A(1.3), A(2.1), A(2.2), A(3.1) या चार घोड्यांत लावून >> चार नाही रे .. पाच घोडे..
same logic as mine.. Happy
- अनिलभाई

अनिलभाई,
पाचवा घोडा कुठला?
शिल्लक तर चारच राहिले आहेत..:(

मी आपलं उत्तर वाचलं, पण गेले काही दिवस घोड्यांचा अतिरेक झाल्यामुळे डोकं पुरतं झांजाळलं आहे. त्यामुळे मी अगदी सुरुवातीला सांगितलेल्या या पद्धतीतसुद्धा कदाचित त्रुटी असू शकतील..

अरे हो.. मी A(2.2) हा घोडा विसरलोच होतो..
बरोबर, शेवटची शर्यत ५ घोड्यांत..

अनिल भाई अगदि बरोबर. अभिनन्दन.

व्वा! Happy

*********************
कंपून कंपूत सार्‍या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
Wink Biggrin

५ घोड्यांची एक अशा ५ शर्यती.
मग सगळ्या पहिल्या आलेल्यांच्या
सगळ्या दुसर्‍या आणि सगळ्या तिसर्‍या.
(सगळ्या तिसर्‍यांची घेण्याचं कारण - एकाच शर्यतीतल्या तीन घोड्यांचे वेग १-२ आणि ३ क्रमांकाचे असू शकतात)
अशा ८ शर्यती झाल्यावर ९ वी शर्यत खालील प्रमाणे:
पहिल्यांच्यातले दुसरे तिसरे, दुसर्‍यातले पहिले दुसरे अन तिसर्‍यातला पहिला अशी.

वर्स्ट केस सिनॅरियो धरून वरील प्रमाणे कमीत कमी नऊ शर्यती लागतीलच!

अर्थातच घोड्याचा वेग प्रत्येक स्पर्धेत सारखाच आहे हे गृहीतक!
७ शर्यती म्हणणार्‍यानो. गृहीत धरा की पहिल्या ५ शर्यती घेताना एकाच शर्यतीतले पहिले तीन घोडे पंचवीसच्या गृप मधे सगळ्यात वेगवान आहेत - आणि ७ शर्यतीत कसं शक्य आहे ते प्लीज सांगा.

एकाच शर्यतीत!
जर प्रत्येक घोड्याला एक ते पंचवीस पर्यंत क्रमांक दिले व त्यांना पहिल्या पाचामागे काही अंतराने पुढचे पाच या पध्द्तीने उभे करून पळविले तर कळू शकेल का?

ए़कूण शर्यती ११.

प्रत्येकी ५ घोड्यांच्या ५ शर्यती... या ५ पैकी प्रत्येक शर्यतींमधून पहीले ३ आलेले घोडे shortlist करायचे, म्हणजे राहीले १५.

या १५ घोड्यांच्या ५ शर्यती, प्रत्येक शर्यतींत ३ घोडे आणी परत प्रत्येक शर्यतींमधून पहीला आलेला १ घोडा shortlist करायचा म्हणजे झाले ५.

या ५ घोड्यांची १ फायनल शर्यत,आणी त्यात पहीले ३ आलेले घोडे हेच सगळ्यात वेगवान ३ घोडे

Pages