मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल बेइमान बेइमान.. बेइमान है ... कुठलातरी डिओ ची जाहिरात आहे.
मला ३ वेळा पाहिल्यानंतर पण ही जाहिरात झेपली नाही... Sad नक्की काय सांगायच आहे जाहिरातकर्ताला ???

नक्की काय सांगायच आहे जाहिरातकर्ताला ? >>>>.तापसी पन्नु खुप सुंदर आहे ......
ज्या दिवशी पहिल्यांदा ही अ‍ॅड पाहिली त्याच दिवशी कोणत्या तरी साउथ चित्रपटात तिला पाहिलेलं. मला वाटलं चित्रपटात हा सिन मध्येच कुठुन आला Lol

सध्या एक बाइकची जाहिरात डोक्यात जाते. एक अती आखूड कपड्यातली मुलगी, गॅरेज मधे जाते , कसला आवाज येतो दचकते, मागून एक जण येतो , खुट्ट कण चावी काढतो ही परत दचकते. आणि मागे बॅकग्राउंड म्यूज़िक ....हा खेळ नाही हसीनांचा..... >>>> या जाहीरातीत हिंदी टु मराठी भाषांतर करताना भाषेवर अत्याचार झालेत अक्षरशः मायमराठी टाहो फोडतेय अस चित्र येत डोळ्यासमोर... आणि बाईकची चावी स्पेशल आहे, इतर कुठल्याही चाव्यांनी गाडी चालु होउन चोरता येणार नाही हा स्पेशल संदेश देण्यासाठी अर्ध्याहुनही कमी कपड्यातली बाई कशाला पाहीजे यांना??

इतर कुठल्याही चाव्यांनी गाडी चालु होउन चोरता येणार नाही हा स्पेशल संदेश देण्यासाठी अर्ध्याहुनही कमी कपड्यातली बाई कशाला पाहीजे यांना??
बाईक चोरायला चाबीची गरज कधीपासुन पडायला लागली ?

बाईक चोरायला चाबीची गरज कधीपासुन पडायला लागली ?>>> अर्ध्याहुन कमी कपड्यातल्या बाईला लागत असेल हो चावी बॉण्डभाउ... Wink

>>बाप म्हणतो त्याला टेनिस्मध्ये रुची आहे पण कोचिन्ग आमच्या घरापासून फार दूर आहे. काय कराव कळत नाही .
शिक्शिका म्हणतात ' व्हाय डोन्ट यु शिफ्ट टु निर्मल कलोजियम '

काय खालच्या बर्थ वरून वरच्या बर्थ वर झोपायला चालयात ?

+१००००००

मला ती सेट मॅक्सची टीव्ही अ‍ॅड फार आवडते. लाईट गेलेले असतात आणि ती वृध्द बाई मटार सोलता सोलता गाणं म्हणत असते 'हमने देखी है....'. एव्हढ्यात लाईट येतात आणि ती गायची थांबते.....पुढचं सांगत नाही. पण ही अ‍ॅड लागली की मी नेहमी पहाते.

स्वप्नाराज आणि ट्युलिप +1
मला "ऑरेंजी हा फँटा... चार वाजले घरी आणा.." खूप आवडते. गंमत म्हणजे 6 महिन्यांचं बाळही खेळणं सोडून ती जाहीरात बघतं. त्या कार्टून्समध्ये कुणलाच नाक नाहीये. Happy

कुठल्या तरी एका (फ्लॅट) स्किमची जाहिरात आहे,
फ्लॅटचा EMI "फक्त साठ हजार रुपये"
साठ हजार महिन्याला 'फक्त' म्हणतायेत म्हणजे त्यांचे ग्राहक ठरलेले असणार.. Wink

ती कुठली चहाची अ‍ॅड आहे? मुस्लिम शेजारीण त्या जोडप्याला चावी मिळत नसते म्हणून तिच्या घरात येऊन चहा घ्यायला सांगते. त्या जोडप्यातली बाई म्हणते 'चायकी अच्छी खुशबू आ रही है'.>>>>>>>>>>>>. ती बाई तस नाही म्हणत ...ती म्हणते चय की अछ्छी खुशबु आती है ईनके घर से....मग नवरा बोलतो आती होगी......मग त्याला तीने बनवलेल्या चहा ची खुशबु येते मग ते जोडीने चहा टाकायला जातात तीथे.........

मला आवडते ही अ‍ॅड....

उदय तुला ती तापसी पन्नु सुंदर वाटते??? कठिण आहे

उदय तुला ती तापसी पन्नु सुंदर वाटते??? कठिण आहे >>>>>>>> काय कठिन आहे .. ती.. अजिबात नाही Wink

जी सुंदर आहे तिला सुंदरच म्हणावे . या मताचा आहे Happy

प्रेस्टीजची जाहिरात आहे.ऐश्व्र्या आणि लंबुपुत्र बिन्डोक यांची.
त्यात अभिषेक हसताना आवाज सलमान खानच्या हसण्याचा आवाज मिसळला आहे जाहीरातीत.नीट ऐका पाहीलीत तर.शंका येऊ नये पण सलमानच्या हसण्याचा मिमीक टाकलाय बहुतक लंबुपुत्रामुखी... Happy Happy
Proud

मला सध्या कोटक महिंद्रा बँकची 'सिक्स पर्सेण्ट वाला अकाऊण्ट' ही जाहिरात खूप आवडते.
त्यातल्या छोट्या मुलीने एक्स्प्रेशन्स किती छान दिली आहेत !

तापसी पन्नु हे काय आहे? नाव?>>>>>>>>>>>>.. पंजाबण आहे पण साउथ मधली हिरेविन आहे ती...... डम्ब हा एकच शब्द सध्या सुचतोय तीच्यासाठी

>>ती बाई तस नाही म्हणत ...ती म्हणते चय की अछ्छी खुशबु आती है ईनके घर से

हो, काल इथे लिहिलं आणि मग संध्याकाळी ती अ‍ॅड पाहिल्यावर लक्षात आलं.

चहाची अ‍ॅड मला पण आवडते...

कोटक महिंद्राची ज्युनिअर अकाउंटची अ‍ॅड का ललिता-प्रीती? छान आहे ती पण.... त्याच छोटीला घेउन त्यांनी आधी "छोटी छोटी चिल्लर कल नोट बन जाने दो" अस जिंगल असणारी जाहीरात काढली होती

काल फेबुवर आणि नंतर घरी टीव्हीवर एका खाद्यतेलाची जाहीरात बघितली.. एक म्हातारी आपल्या आजारी मुलासाठी रोज डबा घेउन येत असते व नर्सला पटवण्याचा प्रयत्न करत असते की मी केलेली आमटी त्याला दोन चमचे खायला घालु दे... छान वाटली ती जाहीरात

टीवी वरच्या जहिराती म्हणजे बघणार्‍या मॅच किंवा कार्यक्रमामधे खंड पडु नये म्हणुन दिलेली 'टैम प्लीज' असं आपलं आम्हाला वाटतं. जहिराती मधे टीवी म्युट करुन सटरफटर कामं करणे - जसं कि ताटात दुसरी पोळी घ्यायला उठणे, भाजी वाढुन घेणे, पाणी प्यायचा ब्रेक किंवा आईबाबांनी विचारलेल्या प्रश्नांना लांबुन ओरडुन दिलेल्या उत्तराऐवजी जवळ जावुन बोलणे, बेडरुम मधे चालु राहिलेला एसी बंद करायला उठणे इ इ. जहिरातींना किंमत एवढीच.

टीवी म्युट करुन उठुन गेल्यामुळे वर लिहिलेल्या ८०% जहिराती माहितच नाहीत, पण ज्या पाहिल्या आहेत त्यातल्या - वुमनिया जहिरात बंडल कॅटेगरी, तोंड भरवुन चॉकलेट खाणारे दोन टीनएजर्स डिसगस्टींग, परदेमें रहेने दो बेबी चो च्वीट, इस्ट इंडियन दिसणारी दोन भावंडं कॅन्डी आणायला जातात आणि खिशातुन पैसे पडुन गेल्यामुळे दुकान काका फुक्कट कॅन्डी देतात ती जहिरात अतिशय सुंदर. आणि त्याचं गाणं पण भारीच.

बरं तर एवढी प्रस्तावना यासाठी कि काल एका कमर्शियल ब्रेकमधे एक लांआआआआआआअबलचक जहिरात पाहिली. एका ब्रेकमधे एकच फीट झाली एवढी मोठी जहिरात. खरं तर एक शॉर्ट स्टोरीच. तर त्यामधे - एक मध्यमवयीन बेड रिडन मुलगा हॉस्पीटलमधे असतो. त्याची अतिशय म्हातारी आई नर्सला रोज विनवण्या करते कि हॉस्पीटलचं जेवण देण्याऐवजी घरचं दोन चमचे वरण दे. नर्स रोज नाही म्हणते आणि आज्जी रोज विनवण्या करते. हे खुप दिवस चालु रहातं, मग एके दिवशी............... पुढची जहिरात बघा. Happy आम्ही पण शेवटपर्यंत पाहिली कारण उत्सुकता होती की ही जहिरात आहे कि अजुन काही? आणि जहिरात असेल तर कसली ? छान आहे एवढं नक्की.
Wink

मनिमाउ मी त्याच अ‍ॅडबद्दल लिवलय वरती...

बाकी वुमनिया जहिरात बंडल कॅटेगरी >>> अनुमोदन
परदेमें रहेने दो बेबी चो च्वीट, इस्ट इंडियन दिसणारी दोन भावंडं कॅन्डी आणायला जातात आणि खिशातुन पैसे पडुन गेल्यामुळे दुकान काका फुक्कट कॅन्डी देतात ती जहिरात अतिशय सुंदर. आणि त्याचं गाणं पण भारीच.>>>>> प्रचंड अनुमोदन
तोंड भरवुन चॉकलेट खाणारे दोन टीनएजर्स डिसगस्टींग >>> ही कोणती? नाही आठवत

Pages