मिसळ पाव

Submitted by varshac on 20 July, 2008 - 23:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप मोड आलेली मटकी
१ च. काळा मसाला पावडर
१ च. लाल मिरची पावडर
२ च. लाल काश्मीरी मिरची पावडर
५-६ लसूण पाकळ्या
२ मोठे च. सुके खोबरे किसलेले
८-१० कडी पत्ता पाने
१ च. जिरे
१ च. मोहरी
कोथिंबीर
१ कांदा

क्रमवार पाककृती: 

लसूण पाकळ्या आणि सुके खोबरे चांगले बारीक वाटून घ्यावे.
तेलात फोडणीला कडीपत्ता, जिरे, मोहरी टाकणे.
काळा मसाला, लाल मिरची पावडर, कश्मिरी मिरची पावडर तेलात परतून घेणे. मग लसूण-खोबर्‍याचे वाटण त्यात टाकून परतून घेणे.
फोडणीत मटकी टाकून परतून घेणे. जवळपास ३ ग्लास पाणी टाकून मटकी चांगली शिजवून घेणे. चवीनुसार मीठ टाकणे.

वाढताना एका प्लेटमध्ये फरसाण घेऊन त्यावर ऊसळ वाढणे. वरतून कच्चा कांदा व कोथिंबिर टाकणे.

पावासाठी पाव ह्या लिंकवरील रेसिपी वापरलेली आहे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

misalpav_007.jpg

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! तोंडाला पाणी सुटलं.. अगं पण यात पोहे / चिवडा पण घालतात ना? आणि कट वेगळा असतो झणझणीत.. त्याची दे ना पाककृती
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

आशु, मी फरसाण वापरते आणि कट वेगळा नाही करत. मटकीची उसळ करतानाच त्यात हवे तेवढे पाणी ,तिखट ,मिठ घालुन शिजवुन घेते त्यामुळे झटपट होते उसळ आणि कटाला उसळीतिल कडधान्यांची चव पण येते.

पाव सुधा घरि केलेस? लिन्क पाहिलि पण ओवेन चे तापमान कळले नाहि. ओवेन किति वर ठेवला? पाव किति वेळ भाजला?

हा पाव घरी केलेला असेल तर मलाही रेसिपी हवीय लवकरात लवकर. तोंडाला पाणी सुटलंय फोटो बघूनच. Happy

थॅन्क्स वर्षा. मिळाली रेसिपी. नक्की बघणार करुन.
पिंकू, अवन ३७५/४०० फॅरनहाईट वर ठेवून साधारण अर्धा तास बेक करायचं असं म्हटलंय.

रेसीपी लिहुन घ्यायच्या घाईत ह्या महत्वाच्या गोश्टी राहुन गेल्या. Blush
थॅन्क्स सायोनारा.