लावणी महोत्सव..(भातशेतीतला..)

Submitted by गिरिश सावंत on 5 July, 2011 - 05:15

कोकणात हे दिवस भातशेतीचे ...

विस्तिर्ण शिवारात सर्वत्र चिखल केला जातो..त्या चिखलात भातची १५ ते २० दिवस वाढलेली रोपे
(तरवा) लावली जातात..
यालाच तरवा लावणे म्हणतात..धो धो पडणारा पाऊस ..शेतात साठलेले पाणी..ढोपरापर्यंत केलेला चिखल..त्यात रंगणारा

कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" !

तरव्याच्या अशा जुड्या बांधल्या मग वाहतुक सहज होते..

tarava_1 copy.jpg

शेतात वाढलेला तरवा... आणि शेतकर्याला क्षणभर विश्रांती घेण्यासाठीची खुर्ची !

tarava_9 copy.jpg

चिखलात खेळायची मजा कोण सोडेल!!!!!!!
tarava_4 copy.jpgtarava_6 copy.jpgtarava_7 copy.jpgtarava_3 copy.jpgtarava_11.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझे बाबा आताच राजापुर ला जाउन आले, शेतात लावणी करायला गेले होते पण पायावर फोड आले मग घरि आले. कदाचित गवताची alergy झालि असणार सोप्प काम नाहिये शेतात राबायच म्हणजे...मला वाटत नाहि शहरात राहणार्या लोकांना शेताचि काम जमतिल.

धन्यवाद गिरिश, बालपणाच्या आठ्वणी ताज्या झाल्या..... आई, आजी, आजोबा शेतात काम करत असताना मी आणि आत्या शेतावर चहा, न्याहरी, पाण्याचा माठ घेऊन जायचो, आणि तिथेच शेताच्या बांधावर बसुन भाकरी खायचो...... आता गावी जाणं होत पण आता शेतीचं दुसर्‍यांकडुन करुन घेतो, त्यामुळे ती मजा राहिली नाही...

Photo0544.jpgPhoto0545.jpgPhoto0584.jpg

कोकणातलो पाऊस ...आणि लावणी महोत्सव ...
दोन्ही प्रकाशचित्रे मायबोलीच्या मुखप्रुष्टावर आणल्याबद्द्ल मायबोलीकरांचे खुप खुप आभार..
एकाच वेळी दोन्ही प्रकाशचित्रे मुखप्रुष्टावर येणे हा माझ्यासाठी दुग्ध्-शर्कराच योग...

तुमच्या प्रतिक्रिया मनाला आनंद देतात्..आणि प्रकाशचित्रे काढण्यासठी प्रोत्साहन देखील !

khairle he photo
?amchya kadchech distat.phoyography matra apratim.camera kuthcha ahe

Pages