लावणी महोत्सव..(भातशेतीतला..)

Submitted by गिरिश सावंत on 5 July, 2011 - 05:15

कोकणात हे दिवस भातशेतीचे ...

विस्तिर्ण शिवारात सर्वत्र चिखल केला जातो..त्या चिखलात भातची १५ ते २० दिवस वाढलेली रोपे
(तरवा) लावली जातात..
यालाच तरवा लावणे म्हणतात..धो धो पडणारा पाऊस ..शेतात साठलेले पाणी..ढोपरापर्यंत केलेला चिखल..त्यात रंगणारा

कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" !

तरव्याच्या अशा जुड्या बांधल्या मग वाहतुक सहज होते..

tarava_1 copy.jpg

शेतात वाढलेला तरवा... आणि शेतकर्याला क्षणभर विश्रांती घेण्यासाठीची खुर्ची !

tarava_9 copy.jpg

चिखलात खेळायची मजा कोण सोडेल!!!!!!!
tarava_4 copy.jpgtarava_6 copy.jpgtarava_7 copy.jpgtarava_3 copy.jpgtarava_11.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" ! >> वा सावंतांनु.. काय मस्त नाव दिलास.. आवडला.. नि फोटो तर आहाहा. !१ ला नि ४ था खासच !!

लावणी महोत्सव म्हणल्यावर मला उगिचच वाटलं होतं की नऊवारीतल्या नटलेल्या बायांचे फोटो काढलेत का काय Lol
इथे येऊन पाहिलं तर भातलावणी...

पण फोटो छान आहेत.

जॉब ओपनिंग आहे का इथे, त्या बायांबरोबर? किती लकी आहेत त्या बायका, मस्त मोकळ्या वातावरणात, हिरव्यागार शेतात काम करताहेत. मी तर माझ्या या अमेरिकन कंपनीला लाथ मारुन, AC मधुन बाहेर पडुन शेतात काम करायला उत्सुक आहे.

सावतांनू लईच झ्याक अदाकारी पेश केलीत.

शेतात वाढलेला तरवा... >>> मे महिन्यात शेत जमिनीत जो जाळ पेटवतात त्याला मी तरवा समजायचो.

चालेल, चालेल. स्वच्छ आहे तो पर्यंत चिखलाची घाण नाही वाटणार.

दिवसभर artificial lights च्या झगमगाटाने थकुन जाते नजर. त्या हिरव्या रंगाने, चित्रात बघुनही डोळे काय शांत झाले. प्रत्यक्षात काय स्वर्ग असेल. आणि ताजी स्वच्छ गार हवा. Heaven !!

सावंतानु.. ह्या एकदम बरा केलात.. तरवाचे फोटो डकवले ते.. मस्तच फोटूज !! एकापेक्षा एक !! नि शिर्षक तर सह्हीच Happy

गिरिश, सुंदर प्रचि...:-)
पण प्रचि कोकणातले वाटत नाहीत... नेहमी डोळयाला दिसणारी नारळाची झाडे दिसत नाहीत...

गिरिश, मस्त शिर्षक आणि फोटो. अस वाटल पटकन त्या चिखलात उतरून तरवा लावावा. किती वर्षे झाली अस दृश्य पाहून. कोणतं गाव आहे हे?
पण प्रचि कोकणातले वाटत नाहीत... नेहमी डोळयाला दिसणारी नारळाची झाडे दिसत नाहीत...>>>>>गिरीविहार, शेताच्या बांधावर तुम्हाला कोठून दिसणार माडाची झाडे?

<<लावणी महोत्सव म्हणल्यावर मला उगिचच वाटलं होतं की नऊवारीतल्या नटलेल्या बायांचे फोटो काढलेत का काय >> मलाही तेच वाटले Lol

पण हाही महोत्सव फार आवडला मस्त हिरवागार Happy

...>>>>>गिरीविहार, शेताच्या बांधावर तुम्हाला कोठून दिसणार माडाची झाडे? बांधावर नाही, पार्श्वभुमीवर...

गिरीविहार, शेताच्या बांधावर तुम्हाला कोठून दिसणार माडाची झाडे? बांधावर नाही, पार्श्वभुमीवर.,,,,,,,,,,,,

अहो राव, कोकणात जळी स्थळी माड नाहीत...

Pages