लावणी महोत्सव..(भातशेतीतला..)

Submitted by गिरिश सावंत on 5 July, 2011 - 05:15

कोकणात हे दिवस भातशेतीचे ...

विस्तिर्ण शिवारात सर्वत्र चिखल केला जातो..त्या चिखलात भातची १५ ते २० दिवस वाढलेली रोपे
(तरवा) लावली जातात..
यालाच तरवा लावणे म्हणतात..धो धो पडणारा पाऊस ..शेतात साठलेले पाणी..ढोपरापर्यंत केलेला चिखल..त्यात रंगणारा

कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" !

तरव्याच्या अशा जुड्या बांधल्या मग वाहतुक सहज होते..

tarava_1 copy.jpg

शेतात वाढलेला तरवा... आणि शेतकर्याला क्षणभर विश्रांती घेण्यासाठीची खुर्ची !

tarava_9 copy.jpg

चिखलात खेळायची मजा कोण सोडेल!!!!!!!
tarava_4 copy.jpgtarava_6 copy.jpgtarava_7 copy.jpgtarava_3 copy.jpgtarava_11.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शिर्षक आणि फोटो दोन्ही झक्कास Happy

लावणी महोत्सव म्हणल्यावर मला उगिचच वाटलं होतं की नऊवारीतल्या नटलेल्या बायांचे फोटो काढलेत का काय >>>अगदी अगदी Proud

गिरिश, तुम्हाला शतशः धन्यवाद! खूप जुनी गावाची आठवण करुन दिलीत. मी लहान असताना गंमत म्हणून अशा प्रकारे भात लावणी केलेय , ही प्र्.चि. पाहिल्यावर ते एकदम आठवले.
फारच सुंदर!
मी सुद्धा शीर्षक पाहून जर फसलेच बरं का! Happy

छान प्रचि!
चिखलामुळे पाय भेगाळू नये म्हणून पायाला कसला तरी पाला/गवत जाळून धूर देतात ते काय असते? पायाचे तळवे मेंदी लावल्या प्रमाणे लाल होतात.

सगळेच फोटो एकसे एक सुंदर आहेत.
शीर्षक बघून वृत्तपत्रातली एखाद्या महोत्सवाची बातमी असेल असे समजून मी इकडे फिरकलेच नव्हते.

अरे काय, माका वाटलो खरच लावणी मोहोत्सव हा की काय.. म्हणुन मी युवूकच नाय हयसर.. मग ४० प्रतिसाद बघुन म्हंतलय काय हा त बघू तरी. तर ह्या.. कमाल केलीत सावंतानू. Happy

सावतानु, तुमची लावणी आवाडली. अगदी मस्त.

गिरीविहार, माड हे शक्यतो समुद्र जवळ आहे अशा ठिकाणी विपुल प्रमाणात आढळतात.

माका वाटलो खरच लावणी मोहोत्सव हा की काय.. म्हणुन मी युवूकच नाय हयसर..]]]]]]]]

शीर्षक बघून वृत्तपत्रातली एखाद्या महोत्सवाची बातमी असेल असे समजून मी इकडे फिरकलेच नव्हते.]]]]]]]]]]]]]]]]

म्हनुनच नावात थोडोसो बदल केलय आता...

मस्त! भाताच्या कोवळ्या रोपांचा हा नितांतसुंदर हिरवा पोपटी रंग मेस्मेराईझिंग असतो अक्षरश: Happy

सावंत मस्त फोटु!! मीपण एकदा ढोपरभर चिखलात गेले होते लावणी करायला. मजा येते त्या चिखलात. ती खोळ वगैरे घेवुन चिखल, पाऊस न आपण. Happy ते बसण्याचं असतं त्याला काय म्हणतात? आता लक्षात येत नाहिय. शिर्षकहि छान Happy

Pages