Submitted by कमलाकर देसले on 26 June, 2011 - 06:52

तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
ऊन माळते असे की ,जसा गजरा माळते
वाळवणासारखी तू बये उन्हात वाळते
कुणी वाचत का नाही तुझ्या दु:खाची कहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
ऊन वारा पावसाळा ,किती सोसणार माती
किती स्वभावाची बये तूच सांभाळते नाती
वेड्यासारखी राबते अशी कशी तू शहाणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
कधी आटतच नाही तुझ्या वात्सल्याचा झरा
तुला जाणता जाणता होतो देवही बावरा
कधी राधेचा वसंत,कधी मीरेची विराणी
तुझ्या डोळ्यामध्ये पाणी , आणि ओठावर गाणी
चित्रकाव्य- कमलाकर देसले
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर आहे
सुंदर आहे
विनायकजी,धन्यवाद .
विनायकजी,धन्यवाद .
खुप छान
खुप छान
चित्र आणि कविता समर्पक
चित्र आणि कविता समर्पक आहेत.छान
सुंदर चित्र!
सुंदर चित्र!
मनिश ,सुलेखा ,शामली धन्यवाद
मनिश ,सुलेखा ,शामली धन्यवाद
चित्र आणि काव्य दोन्हीही
चित्र आणि काव्य दोन्हीही अप्रतीम! अजुनही पहायला आवडतील.
छान...
छान...
खूप सुंदर आहे चित्र
खूप सुंदर आहे चित्र
छानच !
छानच !
शांतिसुधा ,शामराव ,अनघा -मीरा
शांतिसुधा ,शामराव ,अनघा -मीरा ,रावी
आपणा सर्वांचे खूप खूप आभार ,चांगलं चित्र काढून झालं की नक्की मायबोलीवर टाकीन .
Pages