सारेगमप पर्व नव्हे गर्व - २०११

Submitted by आयडू on 21 June, 2011 - 00:03

'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. Proud ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया बापट "आयडिया सारेगमप च्या या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत" असं म्हणते! Lol 'बापट' या आडनावाला असल्या चुका शोभत न्हाईत वो! Happy

प्रिया बापट डोक्यात जातेय. किती जोरजोरात, प्रत्येक शब्दावर जोर देउन बोलते ती...अति लाडीक.
>>>
अनुमोदन

प्रिबा अगदीच वैताग आणतेय. काय विचित्र आवाज काढतेय बोलताना, लाडीक, माझ्या मुली बोलतात असलं. ती नसती तर बघायला मज्जा आली असती. आवाजाची पट्टी काय लावते, तोंडात हवा भरुन बोलल्यासारखे वाटते ते. असह्य.

उर्दू गझला तर कित्ती छान असतात. मायबोलीवरच पहा ना, 'सुखनवीर बहुत अच्छे' वाचले नाहीत का? खुद्द राज ठाकरे सुद्धा, 'हमने एकहि मारा....' वगैरे हिंदीत सांगतात. मराठीत त्या सारखा एक तरी प्रसिद्ध डायलॉग आहे का? प्रसिद्ध लेखक बेफिकीर, त्यांच्या बक्षीसपात्र, गौरवलेल्या कवितांमधे हिंदी, त्यांच्या लेखाचे शीर्षक हिंदी असा हिंदीचा वापर करतात, तरी त्यांना मराठी साहित्याबद्दल पुरस्कार मिळाल्याचे वाचले नाहीत का?>>.

झक्की, इथे माझा काय संबंध?

ते 'सुखनवर' आहे, सुखनवीर म्हणजे धरमवीरसारखे वाटले. Lol Happy

(मी आपले येतात ते स्मायली देतो बर का!)

पण बरे वाटले, तुमच्यासारख्या थोरामोठ्यांनी कोणत्याही कारणासाठी का हो़ईना गरीबाची नोंद घेतली हेच खूप!

Happy

हा धागा फक्त वाचत राहणार आपण, त्यातले काहीच समजत नाही. (काही सुटकेचे सुस्कारे ऐकू आले :हाहा:)

-'बेफिकीर'!

प्रिया बापट आणि स्पर्धक वगळता हे पर्व चांगलेच होईल याची खात्री आहे. तेव्हा मी तर डिस्कव्हरीवर जाहिरात आली की हे पर्व पाहणारच.

या पर्वात अजुन पर्यंततरी टाळ्या मागितल्या नाहीत प्रिबाने नको तिथे Lol
'माझिया मना' गायलेली मुलगी मराठी नाहीये का? पण काहीही म्हणा 'माझिया मना' आशाबाईंच्या आवाजात ऐकायलाच आवडत.
'झन झन झननन छेडिल्या तारा' - मस्तच गायल गेल.

शेवटचा 'ग' खात होती >> मलाही नवल वाटलं जेव्हा तिने भावसरगम मधे गाते असं सांगितलं तेव्हा. बाळासाहेब मंगेशकर लगेच चुका काढतात आणि ६ वर्ष सावनी असं गात होती?? असो.

काल ३ जणांना नी मिळाले का?
'झन झन झननन छेडिल्या तारा' गाणारा, गोपालन आणि लास्टला आलेली कोमल कनकिया यांना नी मिळाले ना!

'बापट' या आडनावाला असल्या चुका शोभत न्हाईत वो!
मला वाटत आता ती कामत झालेय म्हणून तिला हे क्षम्य असाव

बाकी प्रिया बापट दिसते चांगली

प्रिबा कामत कधी झाली? पण ती बघवत , ऐकवत नाही खरचं. असो.
अजून सगळ्या स्पर्धकांची नावं लक्षात राहिली नाहीयेत. सावनी रवींद्र चं रडणं मला पण अजिबात आवडलं नाहीये. प्रोफेशनल गायिका, परदेशात सुद्धा कार्यक्रम करते , तिने सारेगमप च्या मंचावर रडावं हे काही पटलं नाही.
नेहा वर्मा, स्वरूपा बर्वे छान आहेत.

पल्लवीची सर प्रिबाला येत नाही. पल्लवीचे फक्त सूत्रसंचालन चांगले होते असे नाही तर ति स्वतः उत्तम गायिका आहे. तसेच तिला गाण्याची समज ही चांगली आहे तिचे संगीतक्षेत्रातले नॉलेज भरपूर आहे. म्हणून ति व आयडिया सारेगमप गाजला.

सावनीचं 'ग' खाणं मलाही खटकलं आणि मग भावसरगम वगैरे समजल्यावर अजूनच खटकलं. रडणंही खटकलं. आज दुसरा भाग (मंगळवारचा) आपलीमराठीवर बघेन. एक बरंय, बहुतेक नुसती गाणी आणि कॉमेंट्स ठेवून बाकीचं एडिटलेलं असतं बहुतेक. त्यामुळे अजूनतरी अतिरेकी बडबड कोणाचीच ऐकली नाही. पण प्रिबा प्रत्येक शब्दावर जोर देत बोलते ते नाही आवडत.
मग काल मी जरा जुनं म्हणून प्रथमेश ची गाणी ऐकत होते. काय गातो हा मुलगा! अप्रतिमच!

प्रथमेश ची गाणी ऐकत होते. काय गातो हा मुलगा! अप्रतिमच!

तेच आज मी आणि आई बोलत होत. त्या मुलानी सारेगमप संपवल. त्यांच्यानंतर कोणीच नाही.
मला तरी नंतर एकही पर्व एकही एपिसोड बघवला नाही

प्रिया बापट डोक्यात जातेय. किती जोरजोरात, प्रत्येक शब्दावर जोर देउन बोलते ती...अति लाडीक.
>>>
मला ही अगदि हेच वाट्ते.

झक्की, इथे माझा काय संबंध?
आं?!

अहो मराठी भाषेबद्दल बोलायचे नि मराठीतल्या प्रथितयश, पुरस्कार मिळालेल्या नि प्रसिद्ध अशा थोर व्यक्तीची आठवण नाही काढायची? आज मायबोलीवर एकहि दिवस असा जात नाही ज्यात तुमची कविता, लेख, यापैकी काही नाही !! किती त्या कविता, त्या लांबलचक कादंबर्‍या!

जसे विनोद म्हंटले की अत्रे, पु ल. यांचे नाव आपोआप समोर येते, तसे मायबोलीवर मराठी भाषेची चर्चा म्हणजे तुमचे!

तेंव्हा विनय सोडा. अभिमान बाळगा! मराठी भाषेचे भविष्य तुमच्या हातात.

तर ते सोडा - सारेगमप - उत्तम कार्यक्रम, कशाला उगीच कुणाला नावे ठेवायची, किती छान आहे सगळे.
आता मी नेहेमी बघणार! कारण आता मायबोलीवर येण्यात काही अर्थ नाही.

झक्की,

निदान मी लिहून नंतर 'माझे लिखाण उडवा की हो' अशा पश्चात्तापदग्ध भावनेने प्रशासकांना नवस बोलत नाही. Lol

कृपया नोंद घ्या -

हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठीच आहे!

जेव्हा धागा काढल्यानंतर पहिलीच असंबद्ध प्रतिक्रिया येते तेव्हाच हे लिहायला हवे ना ड्यु आय? Happy

असो, नेहमीप्रमाणे हेमाशेपो.

-'बेफिकीर'!

कालच्या भागात कुणी कुणी कुठली कुठली गाणी म्हंटली?? मी अगदी शेवटी शेवटी बघितला भाग एलिमिनेशन झालेल्या मुलिच्या गाण्यापासुन. Sad

Pages