सारेगमप पर्व नव्हे गर्व - २०११

Submitted by आयडू on 21 June, 2011 - 00:03

'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. Proud ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्यातली आणि ह्या आठवड्यातली गाणी बघितली.. काही जणांना दिलेले मार्क कै च्या कै होते.. !
सावनीच्या मालवून टाक दीपला नी का दिला ते कळलं नाही.. मधे मधे गंडल्यासारखं वाटत होतं..

लोकसंगीताच्या भागात तीनही मुलं चांगली गायली.. खरतर ती कोळी गीत गाणारी मुलगी बरी गायली होती.. तिला ठेवलं असतं तर पुढच्या भागात सुधारणा झाली असती असं वाटलं..
"काठी न घोंगडं" आवडलं..

बाकी अजय हा पुढच्या पिढीतला "पंडीतजी" होणार असं वाटतय !! Uhoh

.

ती प्रिबा अजय-अतुलला अरे-तुरे का करते?? ते तिच्यापेक्षा वयाने, कर्तुत्वाने मोठे आहेत शिवाय या स्पर्धेचे परिक्षकही आहेत त्यामुळे ते खटकते(मलातरी) ...........
शब्दांवर जोर देऊन बोलणं अजुनही कमी झालेल नाही तिला तिच्या चुका कोणी सांगत नसेल का? विशेषतः ब्रेकवर जाय्च्या आधीचे संवाद ती फारच किंचाळत बोलते कदाचित विसरत असेल की ती अ‍ॅन्करींग करतेय, हातात माईक आहे. नाटकातल्या स्टेज पर्फॉमन्सची(मोठ्या आवाजात बोलण्याची) सवय असल्यामुळे ही असेल.

प्रिबा बद्दल - >>>ती फारच किंचाळत बोलते १००% खर.
सोमवारी मॄण्मयी फारच बेसूर गायली. एलिमीनेशन बरोबर होते. Sad नेहा वर्मा छानच. दीपिका जोग ठीक ठीकच. किर्तीचा आवाज खूप गोड आहे. पण का कुणास ठावूक पण नीट नाही गायली.
जितेन्द्र तुपेचा आवाजाचा पोत फार आवडला. पण त्याला सुरांचा सराव नाही वाटला फारसा. कदाचित त्याचे गाणे धुडगूस प्रकारातले होते म्हणून असेल. पण तो द्वंद्व गीतामधे खूप छान गायला. उमराणी पण ठीक आहे. रविन्द्र साठेंनी हे गाणे फारच भावूक करण्याजोग गायलय त्यामुळे मला खूप नाही आवडल याच. प्लेन वाटल खूप. Sad
मंगळवारचा एपिसोड बघायचाय अजून.

>>बाकी अजय हा पुढच्या पिढीतला "पंडीतजी" होणार असं वाटतय !!
अगदी अगदी!!! फार बोर होत कधी कधी. Sad मी तर फा. फो. करते.

त्या पूजा गोपालन नामक मुलीला राहूल सक्सेना, अपूर्वा गज्जला ह्यांच्यासारखं डोक्यावर चढवणं सुरु झालय..
परवा अंबाबाईचं गाणं म्हंटलं तिने.. बर्‍याच शब्दांचे उच्चार चुकीचे केले तिने.. गाण्यात काही जोष नाही.. आणि अतुल म्हणे.. तू कोल्हापूरला जाऊन आली आहेस असं वाटतय.. आणि नी दिला.. Uhoh

मला स्वरूपा बर्बे आणि श्रीरंग भावे दोघेही आवडतात. लंबी रेस की घोडे आहेत दोघेही.
स्वरूपा तार सप्तकात गावू शकते, गाईल हे नक्की. तिचे आपरता अफाट होते आणि अबिर गुलाल पण. अबिर मध्ये काही थोड्याच चुका झाल्या पण त्या माफ. देव तिचे भले करो!
श्रीरंग मध्ये एक काम नेस आहे. त्याचे मन हो राम रंगी आणि पठ्ठे बापूरावांचे गाणे हे दोन्ही अफाट. एकदम विविधता.

त्या जाज्वल्य अभिमानाचे गाणे यथातथाच होते. . पूजाचे उच्चार चुकीचे होते हे तिला सांगणे आवश्यक आहे. पण तिच्यात पोटँशियल आहे.

सावनी रविंद्रला मागच्या वेळच्या स्वरदा गोखले सारखे चढवू नका म्हणजे झाले Proud
पूजा गोपालन अभिलाषा व्हायला बघते का ? होऊ देऊ नका . Proud
नेहा वर्मा , स्वरूपा बर्वे , विश्वजीत बोरवणकर हे माझे या पर्वातले फेव्हरीट्स आहेत . अजून तरी छान गाताहेत . Happy
धवल चांदवडकर कधीतरीच चांगलं गातो , २८ जूनला " घन आज बरसे मनावर " चांगलं गायला होता , पण
काठीनं घोंगडं ठीकठाकच होतं . उच्चार ग्रामीण न वाटता शहरीच वाटत होते Sad

अरे, जास्त लोक बघत नाहीत का? का, लिहित नाहियेत? Uhoh
कालचं स्वरूपा बर्वेचं 'कांदेपोहे' ऐकलं की नाही? भाऽऽऽरी गायली Happy एकदम अ‍ॅटिट्यूड वगैरेने. सर्प्राईज पॅकेज आहे टोटल. काय रेन्ज आहे आणि सॉलिड! मा. दीनानाथ ते सुनिधी चौहान! Happy पाहिलं नसेल, तर युट्यूबवर शोधा, पण पहाच.
श्रीरंग बर्वे हातचं राखून गातो असं वाटतं. 'चिन्मया..'पेक्षा 'म्हातारा इतुका..' जास्त चांगलं झालं.
अभिषेक मोराटकर बिचारा डेन्जर झोन मध्ये का येतो काय माहित!

कांदेपोहे स्वरूपा मस्त गायली एकदम.. फक्त काही काही ठिकाणी तिने सुनीधी सारखं गायचा प्रयत्न न करता स्वतःच्या आवाजात गायला हवं होतं असं वाटलं..
आणि कांदेपोहे अवंती पटेलचं इतकं डोक्यात बसलय की अगदी मूळ गाणंही मला कधी कधी कमी वाटतं. Happy

केदार.. पूजा गोपालन एकूणातच ठिक ठिकच आहे.. आत्तापर्यंतची सगळी गाणी अर्थ न समजता, फक्त सिडी वर ऐकून तांत्रिकदृष्ट्या जशीच्या तशी कॉपी केलेली वाटतात.. अपूर्वाही बरीच गाणी अशीच गायची.. चेहेर्‍यावरच्या, गाण्यातल्या एक्सप्रेशन्स वरून आपण काय गातो आहोत हे गायिकेला कळत नाहीये हे समोरच्याला कळतं...

धवल चांदवडकरचं काठीनं घोंगडं गाणं चांगलं होतं की तसं... उच्चारांवर बर्‍यापैकी काम केलय हे कळत होतं.. दोन नी मिळण्याइतकं भारी होतं की नाही हे माहित नाही अर्थात.. Happy

स्वरूपा छान गाते. आवडली मला. श्रीरंग भावे फार कंट्रोल्ड गातो.
कोरसचं काहीतरी केलं पाहिजे! चांगलं गाणार्‍याच्या चांगल्या गाण्याची चांगली वाट लावतायत कोरसचे कलाकार!
आणि आता अमराठी असून छान गाते वगैरे पुरे करा! दरवेळी तेच ते!
यावेळी सेमिफायनलला मान्यवर असणार का? की अजय-अतुलच? कधी कधी ते इतकं जास्त बोलतात की मान्यवर आलेच तर बिचारे गप्प राहून याच दोघांचे बोल अमृताचे ऐकावे लागतील असं वाटतं. म्हणजे मला त्या दोघांची गाणी आवडतात, पण प्रत्येक गाण्यावर निरुपण वगैरे द्यायला सुरुवात झाली आहे आता!

प्रज्ञा.. आधी तुझ्या पोस्ट मधलं एक एक वाक्य काढून "अगदी अगदी" लिहितं होतो पण पूर्ण पोस्टचं कॉपी पेस्ट झाली.. Proud (मग ती डिलीट करून) तुझ्या पूर्ण पोस्टलाच अनुमोदन.. Happy

स्वरूपाचे कांदेपोहे मस्त!

पराग काठी नी घोंगड बरे गायले त्याने कारण त्यात त्याचे शहरी उच्चार (ब्राह्मणी म्हणावे का? ) थोडेसेका होईना खटकले होते) परत ऐकले नाही.

कौतुक करणे चूक नाही पण सगळ्याच मातृभाषा नसलेल्यांनी इतर भाषेत ( हिंदी सोडून फार तर)गायलं कि कौतुक करावं मग :).
पंजाबी सोडून इतर भाषेतली गाणी ती मातृभाषा नसलेल्यांनी गायली कि नेहेमीच उल्लेख करतात , पण नॉन पंजाबी मुलं पंजाबी गातात तेंव्हा हिंदी इतकीच पंजाबी कॉमन असल्याची 'टेकन फॉर ग्रँटेड' अ‍ॅटिट्युड असतो बहुदा.
परवा लिट्ल चँप्स (हिंदी) मधे वेदा नेरुरकरनी 'वाजले कि बारा' गायलं, कोरस द्यायला एक उ.प्र. + १ हिमाचली मुलगा होता तेंव्हा त्यांचा विशेष उल्लेख केला कि भाषा येत नसून इतका चांगला कोरस दिला ( लहान मुलं म्हणून कौतुकच अर्थात त्यांचं पण 'बाजारी' ला 'बझारी' म्हणत होते Happy )

असो, अजय अतुल सारख्या संगीतकारां मुळे आणि इतर काही 'मराठी अग्रही' धमक्यांमुळे का होईना मराठी गाणी सगळीकडे गायली जातात आणि ऑडियन्सला बर्‍यापैकी अपिल होउ लागली आहेत हे ही नसे थोडके.
असो, हे वेदाचं गाणं मला तरी नाही आवडलं, पब्लिक्नी डोक्यावर घेतलं पण

http://www.youtube.com/watch?v=ETwOQLYM6Pc

पराग, धन्यवाद! Happy
तरी मी आपलीमराठीवर बघते, त्यामुळे प्रिबाच्या थोड्याफार गप्पा आणि कदाचित इतर काही एडिट होत असावं हा अंदाज. अजय-अतुलचं बोलणं मात्र सगळं असतं.

मी २५ तारखेचा भाग बघितला. अपेक्षाभंग!

दीपिकाच्या गाण्यात ठसका आणि जोष नाहीच दिसला. पूजा गोपालन अजिबात खास नाही गायली. दोन नी तर नक्कीच नको होते असं वाटलं. धवल चांदवडकर मस्त! जर पूजा गोपालन ला २ नी तर धवलपण जास्त छान गायला. फक्त त्याने त्याची शब्दांची चूक मान्य केली त्या चुकीचे म्हणून मार्क्स कापले असतील तर ओके. नाहीतर तोही मस्त गातो.

जितेंद्र तुपे डोक्यात जायला लागलाय. तो जेव्हा गायला लागला तेव्हाच मी म्हटलं की
"आता हा मंगेशकर-वाडकरांनंतर मीच अशा अ‍ॅटिट्युडने गाईल. नको तिथे गायकी दाखवेल. आगाऊ आहे. मराठी पाऊल पडते पुढेच्या प्लॅटफॉर्मने ओव्हर कॉन्फि वाटतो. आणि निर्जीव वस्तूंतून वाद्यांचे आवाज काढत असल्यामुळे आपल्याला गाण्यातलं सगळं कळतं अशा भावात गातोय तो!"

मी एका दमात हे बोलल्यावर थोडासा घरचा आहेर मिळाला, पण माझा प्रत्येक शब्द त्या मुलाने खरा ठरवल्यावर अर्धांगही मला सामील झालं. अजय-अतुलने त्याला जे सांगितलं त्यासाठी मी त्या दोघांची त्या भागातली पुढची बडबड माफ केली होती, पण तरी त्याला मार्क्स मात्र भरपूर दिले म्हणून पुन्हा अक्षम्य चूक! काल दोघं खिरापतीची वाटी घेऊन बसले होते का? खरंतर त्याने "दयाघना" इतकं चुकीचं गाऊनही २ ध का? त्यापेक्षा मग हर्षवर्धन पहिलं गाणं खूप चांगलं गायला! उगीच दोघांत टाय, मग टायब्रेकर, मग हर्षवर्धनला निरोप.....

मला अजिबातच नाही पटलं.

आणि काल अ-अ म्हणाले "आज आमचं भाग्य म्हणून बाबूजी, मंगेशकर अशा थोरामोठ्यांची गाणी ऐकायला मिळतायत.."
मी: "मग आमचं इतर वेळी दुर्भाग्य म्हणायचं का जेव्हा स्पर्धक तुमची गाणी गातात?"
अर्थात ही सहज जरा गंमत होती. अ-अ ची गाणी मला आवडतात. पण आता परीक्षण करताना त्यांनाही जमिनीवर यायला हवंय असंही वाटलं. बोलतानाही शब्दांवर जोर देऊन बोलायची नवीन फॅशन आली आहे सगळीकडे. काय साध्य होतां त्याने? साध्या शब्दांत, सरळ टोनमधे, नीट समजावून सांगायचं तर बोलण्यात जोर-बैठका कशाला?

असो. हे सगळं मी मनात कोणताही आकस/ पूर्वग्रह न ठेवता लिहिलंय. कोणाच्याही कसल्याही भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व, माझा तसा हेतू नाही. जे वाटलं ते स्वच्छ लिहून टाकलं झालं! Happy

कोणाच्याही कसल्याही भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व, >>>> LOL !!! हे असं लिहित बसशील तर कसं होणार तुझं ह्या बाफ वर ? Proud

पूजा गोपालन अजिबात खास नाही गायली >>>> ये वाक्य तो हर आठवडे वैसे के वैसेईच बोल सकते है.. Wink

ह्या आठवड्यातले भाग पाहिले नाहीत अजून.. पाहिले की लिहिनच..

पराग Lol
मी तसं काही स्फोटक बिटक लिहीलं नाही म्हणून. आता याच बाफवर सवय झाली की प्रश्न मिटेल Proud
आज आपलीमराठीवर मंगळवारचा भाग आला असेल तर रात्री बघेन आणि उद्या लिहेन इथे. विथ नो डिस्क्लेमर!

प्रज्ञा, १००% अनुमोदन तुझ्या पोस्ट्ला फक्त अपवाद धवल चांदोडकर. मला तरी तो ॠषिकेश रानडेचा भाउ वाटतो - ॠषिकेशच्या तमाम पंख्यांची माफी मागुन हे लिहितेय. पण मला तरी हे दोघे कमी तयारीचे वाटतात - अर्ध्या हळकुंडाने पिवळे टाइपचे वाटतात. मुळात नैसर्गिक आवाजच नाजुक आहे त्याचा. दम नाही पण मंगेशकर-वाडकर कॄपेमुळे जिंकला. देवकी प्रमुख पाहुणे म्हणुन आल्या होत्या तेव्हा त्यांनी हेच सांगितल होत की आवाजात ताकद पाहीजे आणि धवलचा सुद्धा तसाच आवाज आहे. धवलची हात उंचावण्याची स्टाईल पण डिक्टो ॠषिकेश सारखी आहे. पुणेरी बाणा - काय बोलणार त्याच!! उगिच वेगळा वाद नको इथे. Happy
सावनी रविन्द्र == स्वरदा गोखले १००% अनुमोदन. विनाकारण डोक्यावर बसणार अस वाटतय.
बाकी स्वरूपा आणि श्रीरंग बेस्ट म्हणजे बेस्ट्च!! जाम आवडतात मला. श्रीरंगने अजुन मोकळ होउन गायल पाहिजे. आवाज खूप चांगला आहे त्याचा पण थोडा बिचकल्यासारखा वाटतो. स्वरुपा काय सोल्लीड जबरी!! खूप कष्ट केले आहेत तिने हे स्पष्ट दिसत.

स्वरूपा (१) किंवा श्रीरंगच (२) विजेते व्हायला हवेत. त्यातही स्वरूपाच जास्त. बाकी सावनी, नेहा वगैरे तिच्यासमोर किरकोळ आहेत. माझी मैना मुळे प्रसेनजीत पण बर्‍यापैकी वर येईल. त्याने पोवाडे, लोकगीते गावीत, मस्त गातो तो. शिवाय उच्चारही कोल्हापुरी असल्यामूळे बरोबर (त्या गाण्यासाठी वाटतात) तसा तो ही अ‍ॅव्हरेज आहे हे नक्कीच.

आज मंगळवारचा एपिसोड पाहिला. ती पूजा "माझिया" हा शब्द ईतका सदोष गात होती, तरी कसे काय दोन दोन नी? पहिल्या शब्दालाच गाणं खटकत होतं. साऊथ ईंडियन झाक पण स्पष्ट कळते उच्चारांमध्ये.पण अगदी उदो उदो चालला होता.
एक तो अजय जाम डोक्यात जातो. प्रत्येक वाक्याचे सुरवातीचे दोन शब्द ईंग्रजीत आणी मग पुढे काय बोलावं हे न कळल्याने गाडी मराठी वर.
स्वरूपा आणी श्रीरंग माझे पण फेवरेट.

पब्लिक वोटींग घेउन प्रिबा यांना एलिमीनेट करता येउ शकते का?

परवा झी हिंदी सारगमाच्या वेळी वोटींगची माहिती स्क्रिनवर दाखवताना 'Dial' चे स्पेलिंग 'Dail' असे केले होते.

मंगळवारी अजय देवगण आणि रोहित शेट्टी आल्यामुळे सर्व गाणी हिंदी!! Uhoh
आता बोला मराठी बाण्याबद्दल! Angry प्रिबा त्या दिवशी इतकं हिंदी झाडत होती!! देवा रे!! आणि हिंदी येत नव्हतं तिथे इंग्लिश. मराठी कार्यक्रम आहे ना??? Uhoh

अजय खूप (जास्त) बोलतो, पण पुष्कळदा तो ज्या चुका काढतो त्या आपल्या (माझ्या) सामान्य कानांनाही खटकलेल्या असतात, त्यामुळे त्याला सहन करता येतं Happy अमेय जोगचं एलिमिनेशन झालं. त्याच्याबरोबर डेन्जर झोनमध्ये जी आली होती (नाव लक्षात नाही) तिला तिच्या न पुरणार्‍या श्वासाबद्द्ल इतकं बोलले, इतकं बोलले, की तिचा साधा श्वासही अडकला असेल नंतर Proud Light 1

मंगळवारी अजय देवगण आणि रोहित शेट्टी आल्यामुळे सर्व गाणी हिंदी!! <<<< मी हा भाग थोडासा पाहिला. त्यात अजय देवगणाचा क्लोज-अप दाखवत होते. त्यात त्याला कोणीतरी 'इथे बस नाहीतर दोन रट्टे देईन' अशी ताकीद करून आणल्यासारखा दिसत होता.

प्रज्ञा९ १००% अनुमोदन <<जितेंद्र तुपे डोक्यात जायला लागलाय>> एक्दम बरोबर लिहिल आहे. किति त्या शब्दांवर जोर.

ह्या आठवड्यातले भाग बघितले..

सोमवारचा ठिक ठिक होता.. स्वरुपा बर्वेचं नभ उतरू आलं छान होतं.. ती स्वतःच्या स्टाईलने गाते तेव्हा भारी वाटते एकदम.. सोमवारचं एलिमीनेशन एकदम अपेक्षित होतं..
रच्याकने.. दिस जातील दिस येतील.. गाण्यानंतर अजय ला एकदम झालं काय तेच कळलं नाही आधी.. !! माझ्यामते गायकांनाही कळलं नसणार.. की हा आपल्या गाण्यामुळे असा झालाय की इतर काही कारणाने..

मंगळवारची गाणी बरी होती.. नेहा वर्माचं दिवाळी हुकलं.. गोविंदा ठिक ठिक होतं..
त्या मारोटकरला उगीच घालवलं आणि.. तो बरा होता खरं.. पण अर्थात जितेंद्र तुपे आणि पूजा गोपालनला घालवणं शक्य नव्हतं..

अजय- अतुल जरा बोर करायला लागलेत आजकाल.. सुरुवातीला बरे होते.. फायनलला मान्यवर जज असतील तर बरे बोलतील कदाचित..

पराग, पूर्ण अनुमोदन!

पण मारोटकर मनात म्हणाला असेल, की दरवेळी डें.झो. मधे जाऊन येण्यापेक्षा एकदाच काय तो नारळ मिळाला! प्रत्येक भागाला टेन्शन नको! आता कुठेही गाताना तो जास्त मोकळेपणी आणि छान गाईल. काल एलिमिनेट झाल्यावर विनंतीवरून 'तू ही रे' गायला...काय आवाज लागलाय त्यात त्याचा!

बाकी एक नक्की, प्रथमेश, अनिरुद्ध, अभिलाषा (क्रम हाच) यांच्या सारखं कोणी नाहिये या प/गर्वात. त्यांचे आवाज ऐकले कीच जाणवायचं, हे फायनलपर्यंत असतील असं!

आत्ताचे लोक कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्म वर चमकले आहेत, अगदी खूप प्रसिद्ध नसले तरी बर्यापैकी सरावलेले आहेत, तरी एकाचीही तयारी १००% दिसत नाही. स्वरूपा अजूनतरी अपवाद म्हणायला हरकत नाही. श्रीरंगने वेळीच मोकळेपणी गावं. 'घन घन माला..' रंगलं नाही.

खरंय पराग. हल्ली ते जरा जरूरीपेक्षा जास्तंच बोलतात. आणि ते रडणं मला तरी खूप ऑड वाटलं, सगळीकडे ड्रामा आलाच पाहिजे का, असं वाटलं. कितीही भावनाविवश झालात तरी जज म्हणून तरी कंट्रोल युअरसेल्फ, असं म्हणावसं वाटत होतं. हिंदी कार्यक्रमांमध्ये स्पर्धक रडारड करतात ते पण बघवत नाही, जजनी करणं तर अगदीच ऑड वाटलं.
बायदवे, तो श्रीरंग भावे सुबोध भावेचा कोणी आहे का?

Pages