सारेगमप पर्व नव्हे गर्व - २०११

Submitted by आयडू on 21 June, 2011 - 00:03

'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. Proud ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगीतकार प्रभाकर जोगांची दोन्ही नातवंड पण आहे यंदा... अमेय जोग आणि दीपिका जोग.. काल लागोपाठ गायले ते दोघं...

ह्या वेळी सगळे स्पर्धक एकदम तयारीचे/ ऑलरेडी व्यावसायिकरीत्या गायला लागलेले आहेत, त्यामुळे गाणी छान वाटत आहेत ऐकायला.

नेहा वर्मा मस्तच. क्लियर आणि थेट आवाज! 'मुद्रामॅन' एकदम संयमित गायला. त्याची बहिण व्हायोलिन काय खास वाजवते! आणि 'खेळ मांडला'ही मस्त. त्यातली इम्प्रोव्हायजेशन्स त्यांना आवडली हे विशेष! कारण संगीतकारांना आवडत नाही सहसा असं कोणी केलेलं! त्या गाण्यात गुरूचं ५०% श्रेय (शुभांगी म्हणाली तसं, सगळ्या मुलांची नावं अजून लक्षात येत नाहीयेत)

सावनी आणि धवल- ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नावाच्या कार्यक्रमात असतात. परदेश दौरेही असतात त्यांचे. त्या दोघांचीही गाणी अजून व्हायची आहेत.

मला ही कालचा भाग आवडला....
नि जितेन्द्र ने गायलेल 'खेळ मांडला' खुपच आवडले नी अर्थाथच 'एकाच या जन्मी जणू' हे ही छान होत...
अजय-अतुलच्या....कमेंट्स छान आहेत्....ऊत्सुकता लागुन राहीलीय या पर्वाची....बघुयात काय होतय ते......पल्लवीला मिस करतोय हे ही खरच्....तिच्या सुत्रसन्चालनाला तोड नाही....

सावरी

'सरणार कधी' फसले असे वाटले. >>>> अनुमोदन !! बर्‍यापैकी वाट लावली त्या गाण्याची असं वाटलं.. आणि तरी त्या गाण्याचं फारच कौतूक केलं !

नेहा वर्माचा आवाज मस्त आहे.. ही माणिक वर्मांची कोणी आहे का ? तिचं गाणं एकदम व्यवस्थित होतं.. पण काहितरी थोडसं कमी पडल्यासारखं वाटलं. मे बी पहिलचं गाणं असेल म्हणून असेल कदाचित..

मुद्रामॅन' एकदम संयमित गायला >>> अगदी.. Happy खेळ मांडला पण आवडलं..

सावनी आणि धवल- ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नावाच्या कार्यक्रमात असतात. >>>> सावनी रविंद्रचे ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीयो तिच्या फेसबूक वर आहेत.. पब्लिक आहेत.. पाहू शकता तिथे.. धवलचा आवाज छान आहे..

सिंडी.. ह्या सारेगमपचे भाग झी मराठीच्या युट्यूब चॅनलवर मिळतील..
http://www.youtube.com/user/zeemarathi

इथे उजव्या बाजूल अपलोड्स मध्ये बघ..

प्रभाकर जोगांच्या नातीने सरणार कधी गायलय म्हणल्यावर थोडंतरी जास्तीच कौतुक करणारच ना... आणि नातू असूनही अमेय डेंजर झोन मध्ये आहे... यंदा अगदीच नवखे स्पर्धक कमी वाटताहेत... थोडे फार प्रसिद्ध असलेले पण अजून सगळ्यांना माहिती नसलेले असेच स्पर्धक आहेत..

तो अमेय जोग आधीच्या कुठल्या पर्वात येऊन गेलाय का?
या पर्वात अवंती पटेल परत येईल असं वाटलं होतं..... उगाचच Happy

कालचा भाग आवडला. सगळ्यात जास्त आवडले ते, सुरेश वाडकरांचे "झन झन नन छेडिल्या तारा" (गायक-अभिषेक मारोटकर बहुतेक). त्यानंतर त्याने हरिहरनचे "तु हि रे" पण गुणगुणले.... सहीच गायला.....नक्की शेवटच्या ५ मध्ये असेल असं वाटतंय!

प्रिया बापट छान दिसतीये, पण अजून त्याच त्याच चुका करतीये... जरा तिला माबोवर डोकावून जा म्हणाव ! Happy

जरा तिला माबोवर डोकावून जा म्हणाव !>> जन्मात परत काँपेरिंग करणार नाही ती Proud
पण एकडोळ्या पल्लवीचा कंटाळा आला होता त्यामुळे बदल चांगला आहे.

सारेगमपचे लेखक तरी मायबोलीचे वाचक असावेत असावेत असं वाटतंय. काल धवल चांदवडकर म्हणाला, 'मी पुणेकर आहे आणि मला त्याचा जाज्वल्य अभिमान आहे' Proud

अभिषेक अ प्र ति म!!

सोमवारी सावनी रविंद्र थेट डोक्यात गेली. रडाबिडायचं काय नाटक करतात बावळट लोक आहेत अगदी Angry

मंजुडी : सावनी नाटक करणार्‍यातली नाहीये खरेच... ओळखतो तिला बर्‍यापैकी. जेन्युइन रडायला आले असावे तिला... आता झीवाल्यांच्या सांगण्यावरून काही केले असेल तर माहित नाही Happy

अवघड गाणे चांगले गायली पण शेवटचा 'ग' खात होती Happy

मला तरी नाही आवडलं मिल्या. ती पाच सहा वर्ष भावसरगमसारखा कार्यक्रम करतेय तोही इतक्या मोठ्या व्यक्तीबरोबर.. तिची कुवत तिने सिद्ध केलेली आहे. इथे पहिल्याच गाण्याला, असे काही भारीभक्कम प्रतिसाद वगैरेही मिळालेले नसताना तिने असं रडणं वगैरे मला खरंच नाही आवडलं. ती भावूक झालीही असेल, नाही असं नाही, पण गाणं, प्रतिसाद, टीपा, मार्क, पुढच्या भागासाठी फर्माईश वगैरे सगळं संपल्यावर प्रिबाने तिला 'थांब जरा! पूर्ण रडून जा' असं म्हणणं आणि तिनेही रडणं फारच कृत्रिम वाटलं मला.

अभिषेकने त्याचं गाणं मस्तच गायलं, पण हरिहरनची अगदी कॉपी केली असं नाही वाटलं 'तूही रे' मध्ये? गायक चांगले आहेत. सावनीचं गाणं सुरेख झालं.
पुढचं 'चॅलेन्ज' म्हणून एकीलाही 'लावणी' दिली नाहीये, हे नोटिस केलं? Happy भक्तीगीत, लोकगीत, भावगीत इतकेच!

भक्तीगीत, लोकगीत, भावगीत इतकेच! >>
अगदी अगदी. मी सुद्धा हेच लिहायला इथे आले होत्ये. मराठी संगीतात नाट्यसंगीत, गझल, लावणी, गोंधळ, बैठकीची लावणी, भारुड इ. असे कितीतरी प्रकार आहेत की. तेच तेच संगीत प्रकार रीपीट केलेत.

अजय्-अतुल पैकी अतुलचे आडनाव काय आहे? तू मूळचा मराठीच आहे ना? मग त्याचे उच्चार तो फार प्रयासाने करतोय असं का वाटतं??

अजय गोगावले आणि प्रिबा या दोघांमध्ये "सर्वात जास्त जिवणी कोण ताणू शकतो? आणि जबडा कोण वाईड ओपन करू शकतो?" याची काँपीटिशन चाललेली असते.

धन्यवाद पूनम Happy

मी पहील्या एपिसोडमधे टायटल साँग मधे त्याला पाहीलं असं वाटलं आणि आज अभिषेकचा उल्लेख आला म्हणून विचारलं , तो गेला का पुढच्या फेरीत ?

आधी प्रिबा म्हणजे कोण ते कळलेच नाही. Proud
या आठवड्यात सारेगमप ऐकायला मिळाले नाही.

जिवणी ताणायची म्हणजे काय?

<अजय्-अतुल पैकी अतुलचे आडनाव काय आहे? तू मूळचा मराठीच आहे ना?<> अजय आणि अतुल हे दोघेही गोगावले बंधु, पण "जेवित नसल्याने दहि-भात -लिंबु" मराठी उच्चार आसे.......

मंजुडी बरोबर आहे. ते तुझे मत झाले आणि त्याचा आदर आहेच.. पण मी तिला जे काही थोडेफार ओळखतो त्यावरुन ती असले काही करणार नाही असे माझे मत आहे... कितिही वर्षे कार्यक्रम केले जरी असले.. तरी तिने जे गाणे निवडले त्या गाण्याविषयी काही आठवणी असू शकतील ज्यामुळे तिला रडायला आले असावे असे वाटले...... गातागाताच ती भावूक झालेली दिसतच होती...

निंबुडा अगं अतुल पण गोगावलेच.. ते दोघे भाऊ आहेत Happy

मिल्या, ओके Happy

काल कोणाला तरी लोकसंगीत सांगितलं आहे नं?

गजा, रविवारी सकाळी 10 ते 12 दोन्ही भाग दाखवतात, कालचा भाग तरी नक्की बघ.

प्राजक्ता, या वेळी एलिमिनेशन झाले नाही, सर्व २४ जणांना एक एक गाण्याचा प्रकार दिला आहे.. पुढच्या आठवड्यात गायला. अभिषेकचे कालचे गाणे ऐकता त्याच्यावर एलिमिनेशनची वेळ येणार नाही इतक्यात तरी Happy

इतक्यात तरी <<< हे महत्त्वाचं.
शेवटी ते कायतरी म्हणत्यात की नाय मायबाप प्रेक्षकांच्या समसांवर वगैरे.

सध्या तरी कोणीच एलिमिनेट झालेले नाहीत. फक्त डेंजर झोन मध्ये गेलेत... कालच्या भागात कोणीच डेंजर झोन मध्ये नाही... आधीच्या प्रत्येक भागात दोन जण डेंजर झोन मध्ये..

हे पर्व एकंदरित चांगले होईल असे वाटते आहे. तो धवल जरा अतिशहाणा वाटतो. आभिषेक जबरी गायला. टॉप ५ मधे असेल असे वाटते. सावनी ड्रामा काय पटला नाही. जर ती एवढी प्रोफेशनल असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. Wink स्वरूपा बर्वे जबरदस्त गायली. सोमवारी अमर ओकांची बासरी पण फारच छान झाली.

प्रिया बापट डोक्यात जातेय. किती जोरजोरात, प्रत्येक शब्दावर जोर देउन बोलते ती...अति लाडीक.
तुनळी वर बघताना तिच बोलण फॉर्वर्ड करून फक्त गाण बघते मी. Happy

नाही, काल ज्याने 'झन झन झननन छेडिल्या तारा' गायला तो अभिषेक. काऊबॉयला आम्ही मराठी रणबीर म्हणालो, नाव लक्षात नाही Proud Light 1

>>परवाच्या भागात काऊबॉय वेषात आला होता तो अभिषेक पाळंदे का>>असेल कदाचित. त्याचा व्हिडीओ दिसत नाहीये. Private content अस काहीतरी येतय. Sad

Pages