१०/१२ वी नंतर काय?

Submitted by चित्रा on 18 June, 2011 - 12:57

मंडळी,

१०/१२ वी नंतर च्या वेगवेगळ्या वाटांच्या चर्चेसाठी हा बीबी.

इथे अशा वाटा, त्यांचे उपयोग वगैरे ची चर्चा अपेक्षीत आहे.

आपल्या आजूबाजूला किंवा नात्यात बरीच हुशार मुले असतात. पण परिस्थितीमुळे त्यांना फार उच्च शिक्षण घेता येत नाही. ते short course करून लवकरात लवकर घरच्यांना हातभार लावायचा विचार करतात. असे काही courses इथे discuss केले तर अशा मुलांना काही मार्गदर्शन करता येईल असे वाटले म्हणून हा बीबी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दहावीत असताना अशी टेस्ट दिलेली. त्यावरुन तरी माझं मत फार चांगलं नाही या प्रकाराबद्दल. हल्ली कसं असतं माहित नाही.
तेव्हा तरी फारच ढोबळ आकडेमोड जमत्येय मग कॉमर्सला जा. विज्ञानाची माहिती आहे तर हे करा. लॉजिकल थिंकिंग आहे ते दुसरं करा असलं काही तरी सांगितलेलं.
एका सामान्य मुलाला हे सगळं बर्‍यापैकी ठीक जमत असेल तर त्याला काय करायचं हे अशा टेस्ट कसं सांगतात किंवा कसा डेटा गोळा करतात ते माहित करुन त्यावर कितपत विश्वास ठेवायचा ते ठरवा. फारतर काय नको हे त्या टेस्ट सांगतील. ते सुद्धा स्टाँगली तशी नावड दिसली तर बरोबर सांगतील. नाही तर गणितात ते काय म्हणतो आपण, की कॉन्फिडन्स लिमिट का काय... ते काय आहे हे सुद्धा समजलं पाहिजे.
मुलीला सध्या एक आवडलं आणि मग ते शिकू लागल्यावर दुसरंच काही आवडू लागलं तर धरसोड न म्हणता सपोर्ट करा. तुम्ही करालच, पण आपल्या लहानपणी सर्रास धरसोड शिक्का मारला जायचा. ती चुक आपण केली नाही पाहिजे म्हणून लिहिलं.
शुभेच्छा!

चारपाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेला नी aptitude test घेऊन दहावीच्या निकालासोबत या चाचणीचा निकाल द्यायला सुरुवात केली होती. पण त्यातून फार काही कळत नसे. ते वय. कल कळण्यासाठी फार कमी असावं आणि आता इतकी करियर चॉइसमध्ये विविधता आली आहे ते सगळं त्यात येत नसावं.
माझ्या काही विद्यार्थ्यांना एकच असा कल दिसला नव्हता. एकाला शेती करायला सांगितलं होतं.

दहावीत करू नका.
बारावीत करा.
तोवर सायन्स घेउन मेडिकल अथवा engg च्या दृष्टीने तयारी करू दे. कॉम्पिटीशन मध्ये राहण्याची सवय असुदे.
नंतर त्याचा कल बघून पुढे काय ते करू दे.
असा।शिक्षण क्षेत्रात खूप वर्षे घालवलेल्या व्यक्तीच मत.
अर्थात ज्याचे गोल दहावीत सेट आहेत त्याला हा मार्ग योग्य नव्हे.
आवडीनिवडी बदलतात ह्याबाबत सहमत.

दहावीनंतर सायन्स घेऊन चूक केली असं पुढे वाटलं तर. मेडिकल इंजिनीयरिंग न करणाऱ्या सगळ्यांना राइट ऑफ करून टाकलं

मलाही तेच वाटलं भरत.
दहावीत आपली आवड आणि त्यातच करियर करेन इथवर खात्री असलेली मुलं विरळाच.

समजा 12 वी पर्यंत सायन्स केले.
आणि नंतर कॉमर्स करायचं ठरलं तर FY ला नक्कीच असं वाटलं की 2 वर्षे आपण नको तिथे मेहनत वाया घालवली.

यूट्यूबवर एक थिंक बँक नावाचा मराठी चॅनल आहे. त्यावर डॉ श्रीराम गीत यांच्या काही मुलाखती आहेत गेल्या महिन्यात झालेल्या. त्या बघा. उत्तम आहेत. व्यवसाय मार्गदर्शन कुणाचं चांगलं, कुठल्या चाचण्या काय निकष वापरतात इथपासून व्यवसायात काय अपेक्षा ठेवाव्यात, काय ठेऊ नयेत, कुठल्या गोष्टींची तयारी असावी इत्यादी अनेक महत्त्वाच्या गोष्टींची त्यांनी चर्चा केली आहे.

दहावी मध्येच पुढे काय करायचे हे ठरवणारी मुले फारच कमी असतात हे खरे आहे. पण ११-१२ वी मध्ये घेतल्या जाणाऱ्या विषयांवर पुढे graduation कशात करायचे ते ठरते.
आपल्या वेळी तुलनेने सोपे होते, ११-१२ सायन्स असेल तर नंतर कॉमर्स, आर्ट्स पण घेता येत होते. आता
सगळीकडे तसे नाही आहे. आमच्याकडे डी यु मध्ये यावर्षी नियम होता. ११-१२ वी मध्ये जे विषय निवडले आहेत त्यांचीच entrance exam देता येईल.
आमच्या शाळेत ११-१२ वी साठी खूप कमी विषयांचा ऑप्शन आहे.
पी एच आणि ज्ञान प्रबोधनी या दोन्हींच्या aptitude test बद्दल ऐकले आहे. दहावी संपताना टेस्ट करावी असे ऐकले आहे.

थँक्यू लोकहो.
अमितव , ऋ , भरत , झकासराव पटतय म्हणणं. पण आता भरपूर जास्त ऑप्शन असल्यामुळे आणि आजूबाजूचा माहोल बघितल्यावर आपण मागे नको पडायला असे वाटते .
आमच्याकडे डी यु मध्ये यावर्षी नियम होता. ११-१२ वी मध्ये जे विषय निवडले आहेत त्यांचीच entrance exam देता येईल.>> अल्पना याबद्दल माहिती नव्हती.
थँक्यू हपा, बघते मुलाखत.

Aptitude test कितपत उपयोगी आहे, याबद्दल मला दाट शंका आहे. >> सहमत. मला सुद्धा हाच अनुभव आला आहे. शेवटी मुले जे स्वतः ठरवतील त्याच फिल्डमधे ती पुढे जातात. आपण त्यांना फक्त ऑप्शन दाखवायचे.

Pages